Posts

Showing posts from April, 2026

दर्पण, आरसा, मिरर आणि आता आईना ....

Image
मुंबई / रमेश औताडे  दर्पण आरसा आईना आणि आता मिरर....सर्वसामान्य माणसाच्या जीवनात रोज शंभर वेळा येणारी वस्तू एका नाटकाच्या माध्यमातून मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळाली.  पुण्यातील जागर नाट्यसंस्थेने निर्मित ‘आईना’ हा मराठी-अहिराणी भाषेतील दीर्घांक नुकताच मुंबई मराठी पत्रकार साहित्य संघात यशस्वीरीत्या सादर केला. ‘जागर’ या संस्थेची स्थापना वासुदेव पाळंदे यांच्यासह माधव वझे, श्याम भुतकर, गजानन परांजपे, सुधीर भडकमकर आणि आनंद घाणेकर या रंगकर्मीनी केली होती. संस्थेचे सध्या  अविरत ४८ वे वर्ष सुरू आहे. ‘आईना’  हा दीर्घांक एका जपानी लोककथेवर आधारित आहे. जंगलात साधे, स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या एका चौकोनी कुटुंबाच्या आयुष्यात अचानक आलेला एक साधा आरसा त्यांच्या भावविश्वात कुतूहल, भीती, आनंद आणि गंमत निर्माण करतो. स्वतःचे प्रतिबिंब पहिल्यांदाच अनुभवताना उलगडणारी ही कथा निरागसता, विनोद आणि भावनिक खोली यांचा सुंदर मिलाफ घडवते.  मूळ  जपानी लोकथेवरील हे नाटक चिओमी हारा ह्यांनी लिहिले आहे. या नाटकाचे हिंदी भाषांतर अशोक चतुर्वेदी ह्यांनी केल...

" राजा शिवाजी " चित्रपटाच्या नावात " छत्रपती " उल्लेख असावा

Image
मुंबई / रमेश औताडे  "राजा शिवाजी" हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाबाबत श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनने  आक्षेप घेतला आहे. चित्रपटाच्या नावातून "छत्रपती" हा मानाचा किताब वगळणे अजिबात मान्य नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा, प्रतिष्ठेचा व वारशाचा अवमान होत आहे असे फाउंडेशनचे अध्यक्ष सी. एस. चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. चित्रपटाचे निर्माते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख आहेत. त्यांना आम्ही लेखी पत्र दिले आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन्मानपूर्वक व ऐतिहासिकदृष्ट्या अचूक चित्रण करण्यात यावे,  जर निर्माते व संबंधित प्राधिकरणांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. आम्ही कायदेशीर पावले उचलण्याची आम्ही तयारी केली आहे. आवश्यक असल्यास देशभरात आंदोलन व निषेध करण्यात येईल असा इशारा दिला. या चित्रपटाचे निर्माते म्हणून रितेश व जेनेलिया देशमुख यांनी जबाबदारीने वागून हा विषय तात्काळ मार्गी लावावा असे चव्हाण यांनी सांगितले.

घणसोलीत मोबाईल टॉवरवरून वाद; रहिवाशांचा आक्रमक पवित्रा

Image
नवी मुंबई / रमेश औताडे  घनसोली सेक्टर १० परिसरातील मेघ मल्हार सिडको सोसायटीजवळ उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरवरून रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित टॉवर मनमानी पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आल्याचा आरोप करत रहिवाशांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एअरटेल कंपनीकडून हा टॉवर उभारण्यात आला असून यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले गेले आहे. “नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी एअरटेल कंपनीचे काम करत आहेत का?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच, हा टॉवर रहिवासी भागाच्या अत्यंत जवळ उभारण्यात आल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. चुकीचे सर्वेक्षण करून हा टॉवर बसवण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. “लवकरात लवकर हा टॉवर हटवण्यात आला नाही, तर कायदेशीर मार्गाने पुढील पावले उचलू,” असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. दरम्या...

जोगेश्वरीत भव्य भीम जयंती महोत्सव उत्साहात

Image
मुंबई / रमेश औताडे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत त्रिपुरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित १३५ वी भीम जयंती महोत्सव जोगेश्वरी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जयंतरावजी पाटील,  जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजितदादा रावराणे, माजी नगरसेविका रूपालीताई रावराणे, त्रिपुरा फाउंडेशनच्या अध्यक्षा करिश्माताई सुरती, तसेच विकासक राजेश सुरती आदी मान्यवर उपस्थित होते. शिवनाथ खलसे, भगवान ढालवाले, प्रशांत नेब, उल्हास कसबे, सचिन म्हात्रे, सुरेखा लोंढे, स्वप्नील पाटील, रोहित कांबळे, सुरज मिश्रा, राजेश सकट, विजय कसबे, निलेश लोंढे, रोहित लोंढे, दिनेश राखपसरे आदी उपस्थित होते. या जयंतीचे आयोजन व संकल्पना सचिनभाऊ लोंढे जिल्हा अध्यक्ष युवक आणि निलेश लोंढे वॉर्ड अध्यक्ष युवक यांनी केले.  “माता रमाई जीवन संग्राम पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अमरजी कसबे, सुरेशजी सकट, राजू बोरसे, माणिकराव कसबे, उत्तम सकट, गणेश लोंढे, रमेश कसबे, दीपक लोंढे, किसन कसबे, शाम खनपटे, रामू सकट आदींना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

....तर आमचे राजवाड़े परत दया :- अजय सिंह सेंगर

Image
....तर आमचे राजवाड़े परत दया :- अजय सिंह सेंगर मुंबई दि.22 SC/ST Act , Ugc Act, आरक्षण सारखे कायदे देशात जातीवाद व विषमता निर्माण करत आहे जर देशातील ही विषमता दूर झाली नाही तर आमचे राजवाड़े परत दया असे "महाराष्ट्र करणी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यानी भाषणात मत व्यक्त केले, पुढे ते म्हणाले की देशात सामिल होताना  जे 400/450 राजवाड्याच्या राजासोबत भारत सरकारने केलेले एग्रीमेंट पाळल्या गेले नाही. एससी एसटी Act, यूजीसी Act, आरक्षण सारख्या कायद्याने क्षत्रियांची मुस्कट दाबी झालेली आहे, या कायद्यामुळे देशात विषमता निर्माण झालेली आहे या संविधानाने समानतेचे अधिकार दिलेले असताना  समानता या मूलभूत अधिकाराचे अर्थात संविधानातिल आर्टिकल 14,15 चे हनन करण्यात आले. ज्या क्षत्रियांनी या देशाकरता या धर्माकरिता प्रार्णाचे बलिदान इतिहासामध्ये दिलेले आहे, हिंदूच्या सर्वश्रेष्ठ गीता या धर्मग्रंथेमध्ये क्षत्रियांनी राज्यकारभार करावे असे नमूद केलेले असताना क्षत्रियांना बाजूला सत्तेतून बाहेर केलेले आहे.  राजकारणाच व्यापारीकरण झालेले आहे. व्यापारी सत्तेत जाऊन बसल्यामुळे पैसा हाच ...

एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँड शुभारंभ

Image
एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँड शुभारंभ  मुंबई / रमेश औताडे  होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते.  हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि  पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे . होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे.  या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत  संतोष कुमार जे म्हणाले, नवी मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आता संघटित इंटीरियर सोल्यूशन्सला अधिक पसंती दिली जात आहे.  या लाँचसह, होमलेनने शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच सुलभ उपलब्धता, स्थानिक भागीदारी आणि तंत्रज्ञानावर आधारित सुव्यवस्थित इंटीरियर अ...

प्रकाश खंडागळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रामदास आठवले यांच्या पार्टीत प्रवेश

Image
मुंबई / रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत, रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षाला वाढता पाठिंबा मिळत असून, याचे स्पष्ट उदाहरण काल ​​दिसून आले.  मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडगळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील गटबाजी संपवून एकसंध रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक गट असले तरी देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकच रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळे नवीन गट तयार करण्याऐवजी सर्वांनी एकत्र यावे. त्यांच्या या आवाहनाला समाजात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश खंडगळे यांनीही आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि वेग...

निदा खानवरील आरोप एकतर्फी व तथ्यहीन असल्याचा दावा

Image
मुंबई / रमेश औताडे  नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस  प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या समर्थनार्थ गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे  ए पी सी आर संस्थेने पत्रकार परिषद घेतली.  निदा खानवर लावण्यात आलेले आरोप तपासाअंती खरे खोटे बाहेर येईल, त्यामुळे माध्यमांनी व सरकारने दोन्ही बाजू पाहून बोलावे व छापावे अशी मागणी केली. या प्रकरणाला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देण्यात येत असल्याची टीका करत, ए पी सी आर संस्थेचे महासचिव शाकीर भाई शेख म्हणाले, “हे प्रकरण तपासाआधीच ‘कॉर्पोरेट जिहाद’ किंवा ‘धर्मांतर’ अशा स्वरूपात सादर केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. वक्त्यांनी सांगितले की, सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून अनेक बाबी अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत. काही सामाजिक संस्थांच्या अहवालांचा दाखला देत, “पुरावे आणि सार्वजनिक चर्चेत मोठा फरक आहे,” असेही ते म्हणाले.  यावेळी पत्रकार निरंजन टकले, तिस्ता सटेलवाड, संध्या गोखले, ॲड, नदीम खान, डॉल्फी डिसुझा, शाकीर भाई शेख उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांवरही टीका करत, “काही मीडिया ट्रायलमुळे आरोपींच्या बाजूने असलेले मुद्दे...

ब्रँड ॲम्बेस्टर बदलले… पण ‘लाल परी’ अजूनही रुग्णालयातच!

Image
मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) पुन्हा एकदा आकर्षक चेहरा पुढे करत अभिनेता रितेश देशमुख यांची ब्रँड ॲम्बेस्टर म्हणून नियुक्ती केली. मात्र, प्रत्यक्षात ‘ लाल परी ’ची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ब्रँड ॲम्बेस्टर बदलून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत असताना, जमिनीवरची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. बसस्थानकांवर स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद, डेपो मधील पंखे बंद अवस्थेत, तसेच इंडिकेटरनुसार बस न लागल्याने प्रवाशांना बॅगा घेऊन धावपळ करावी लागत आहे. परिणामी प्रवाशांचा त्रास वाढत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अधिकच कष्टदायक ठरत आहे. याशिवाय, वाढलेले अपघात, कंत्राटी पद्धतीने भरती केलेले वाहक चालक आणि कर्मचाऱ्यांवरील ताण यामुळे एस टी सेवेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार विविध सवलतींचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवण्यातच प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, याआधीही अनेक ...

वाहन चालक मालकांच्या अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये हप्ते वसुलीबाबतचा मोठा भ्रष्टाचार तसेच वाहन चालक मालक यांची आर्थिक लूट, वाहन चालकांवर होणाऱ्या अन्याय त्वरित बंद करावा अशी मागणी ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कामगार नेते रमेश समुखराव यांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.  राज्यातील सर्व जिल्हयामध्ये आर. टी. ओ. अधिकारी ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन चालक मालकांकडून प्रती महिना सर्रास हप्ते वसुली करीत असतात. आर.टी. ओ. कार्यालयामध्ये वाहन चालक व मालकांची गाडी पासिंग व ड्रायव्हर लायसन्स रिनिव्ह करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. राज्यातील सर्व चेक पोस्ट वर वाहन पेपर तपासणीच्या नावाखाली वाहन चालक व मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. राज्यामध्ये वाहन चालक एन्ट्री देत नाही म्हणून वाहन चालकास गंभीर मारहाण केली जाते. गाडी मालक व वाहन चालक यांनी आर.टी.ओ. अधिकारी किंवा वाहतुक पोलिस यांना एन्ट्री नाही दिली तर अक्षरशा पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गाडीला आग लावले...

स्वच्छता दूत फाउंडेशनची राज्यभर स्वच्छता मोहीम

Image
मुंबई / रमेश औताडे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १४ दिवसांपासून स्वच्छता दूत फाउंडेशन तर्फे राज्यभर स्वच्छता प्रशिक्षण व जनजागृती मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे यांनी दिली. स्वच्छता मनाची स्वच्छता घराची स्वच्छता परिसराची स्वच्छता देशाची अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा संदेश घुमला. या मोहिमेत गावपातळीपासून शहरांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके आणि जनजागृती केली. आपला परिसर स्वच्छ मोहीम कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश पाखरे, रिविका पाखरे व मार्गदर्शक रीना राव यांनी केले. राज्याच्या विविध भागांत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, तसेच वस्ती भागांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.  डॉ. आंबेडकर यांच्या समतेच्या आणि स्वच्छ समाजाच्या विचारांना अभिवादन म्हणून ही मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनीही याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  संस्थापक संपादक ...

उद्याच्या सक्षम व प्रतिभावान महिला क्रिकेटपटू

Image
उद्याच्या सक्षम व प्रतिभावान महिला क्रिकेटपटू पी आर न्यूज मिडिया नेटवर्क दहिसर येथे मागील चार दिवस अत्यंत शिस्तबद्ध व काटेकोर पद्धतीने पार पडलेल्या निवड चाचण्यांची  यशस्वी सांगता झाली. एकूण 115 खेळाडूंमधून MCA अंडर-15 निवड समिती, प्रशिक्षक व निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 22 मुलींची अंतिम संघासाठी निवड करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी  नंदू पाटील, योगेश पुजारी, नजुका दवणे तसेच निरीक्षक श्री. विकास पाटील यांचे विशेष योगदान लाभले असून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. *या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) तसेच दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन (डीएसएफ) यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत* . पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी ते दहिसर परिसरातील होतकरू मुलींना क्रिकेट क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एमसीएचे सचिव प्रा. डॉ. उन्मेष खानविलकर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. *तसेच, एमसीए अंडर-15 उन्हाळी शिबिरासाठी आवश्यक असलेली नेट्सची सुविधा अल्पावधीत उभारून दिल्याबद्दल दहिसर स्पोर्ट्स ...

मनसेचा तीव्र निषेध, चौकशीची मागणी

Image
नवी मुंबईत वादग्रस्त नियुक्तीवरून संताप मनसेचा तीव्र निषेध, चौकशीची मागणी पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  रमेश औताडे , नवी मुंबई  नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी (MOH) पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. राजेश म्हात्रे यांना देण्याच्या निर्णयावरून शहरात तीव्र वाद निर्माण झाला असून, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मनसेच्या वतीने नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. मनसे विभाग अध्यक्ष श्री. सागर विचारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना हे पत्र सादर करत प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सादर करण्यात आलेल्या निवेदनात डॉ. म्हात्रे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये एका कंत्राटदार संस्थेला ब्लॅकलिस्ट करून काही महिन्यांतच ती कारवाई मागे घेण्याचा संशयास्पद निर्णय, प्रशासनिक पारदर्शकतेचा अभाव, तसेच सत्तेचा मनमानी वापर केल्याचे आरोप समाविष्ट आहेत. या प्रकारातून संभाव्य फसवणूक, विश्वासघात आणि संगनमताची शक्यता व्यक्त करण्य...

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध; कंत्राटी कामगारांसाठी 'हरियाणा पॅटर्न'चा अभ्यास करणार*

Image
*कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध; कंत्राटी कामगारांसाठी 'हरियाणा पॅटर्न'चा अभ्यास करणार* *कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर* मुंबई, दि. १६ :   रमेश औताडे महाराष्ट्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, विशेषतः कंत्राटी कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 'हरियाणा पॅटर्न'चा अभ्यास करण्यासाठी लवकरच एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले. भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने आज वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर 'कामगार आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे यांनी केले. आंदोलनानंतर कामगार मंत्र्यांनी कामगार नेत्यांसोबत सविस्तर चर्चा केली आणि संघटनांच्या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे जाहीर केले. कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले,   महानगर पालिका आणि विविध मंडळांमधील कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी हरियाणा राज्याच्या धर्तीवर धोरण राबवण्याबाबत विचार केला जाईल. त्यासाठी अभ्यास गट त्वरित स्...

*ग्रेट भेट*

Image
*भीम जयंती महोत्सव 2026* *ग्रेट भेट* पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  आज दिनांक 16/04/2026 रोजी मा जलसंपदा मंत्री मा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जेष्ठ नेते आमदार *आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब* यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन *आयोजक जिल्हा अध्यक्ष युवक सचिनभाऊ लोंढे* यांच्या वतीने भीम जयंती महोत्सव 2026 चे निमंत्रण दिले उपस्थित *मुंबई सचिव ब्लेस डिसोजा तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील कार्यकर्ते विजय कसबे* धन्यवाद 🙏💙 आपला  नितीन लोंढे  वॉर्ड अध्यक्ष 79 युवक

शेतकऱ्यांचे भर उन्हात न्यायासाठी आमरण उपोषण

Image
मुंबई / रमेश औताडे वारंवार निवेदन देऊनही तसेच मंत्री स्तरावर आदेश होऊनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले. भाऊसाहेब नळकांडे, अविनाश नळकांडे, रेखा नळकांडे, लीलाबाई नळकांडे, विठ्ठल नळकांडे, बापूसाहेब नळकांडे, सविता वाळके, विद्या टेमगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय, उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ०४/०९/२०२५ व दि. ०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रितसर चौकशी करून नियमानुसार मुदतीत उचित कार्यवाही करावी असे लेखी निर्देश दिले होते.सदर प्रकरणी बोगस धरणग्रस्तांना जमीन वाटप केलेली आहे. उपअधि...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्सवाने साजरी

Image
मुंबई / रमेश औताडे  त्रिशरण बुद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, कफ परेड, कुलाबा,मुंबई ,येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती  माता रमाई समृद्धी सेवा सहकारी संस्था व उम्मीद अपनी फाऊंडेशन यांच्या तर्फे मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली , त्या करिता प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगर सेवक श्री मकरंद नार्वेकर साहेब, श्री नरसिंग सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी. ओमकार जैस्वर व स्थानीक नागरिकांनी सुद्धा हजेरी लावली. कार्यक्रम व्यवस्थापक श्री देवानंद अंबादास वरघट (अध्यक्ष)यांनी केला व सूत्रसंचालन सुद्धा केले

देणं समाजाचे ....!

Image
*प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा*                   P R NEWS MEDIA NETWORK  मुंबई, दि. १२ एप्रिल २०२६  प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थापक, सदस्य, मान्यवर अतिथी आणि समाजकार्यात रुची असलेले अनेक प्रतिष्ठित यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्वस्त सौ. वैशाली भिडे बर्वे यांच्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर त्यांनी PPT सादरीकरणाद्वारे फाउंडेशनच्या दोन वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. Youth Athletic स्पर्धा व पराक्रम दिवस यांसारख्या उपक्रमांची माहिती देत, संस्थेचे कार्यक्षेत्र क्रीडा व संस्कृतीपलीकडे साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांनी स्वतःची ओळख करून देत आपल्या कार्याचा परिचय दिला. ६२ व्या वर्षी मॅरेथॉन सुरू करून ८२ व्या वर्षीही अविरत धावणाऱ्या धावपटूंच्या प्रेरणादायी प्रवासाने उपस्थितांना प्रेरित केले. तसेच आदिवासी भागात सोलर पॅनल, रोजगारनिर्मिती व युवक प्रबोधनासाठी कार्य कर...

राज्यातील कामगारांच्या प्रश्नावर आक्रोश मोर्चा

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने १६ एप्रिल २०२६ रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.  हा मोर्चा मुंबईतील बांद्रा पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार असून यात सुमारे पाच हजार कामगार सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल डुमणे व महामंत्री किरण मिलगिर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात उद्योग, ऊर्जा, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी धोरणे असली तरी कामगारांसाठी स्वतंत्र धोरण नाही, राज्यातील कंत्राटी, बांधकाम, घरोघरी काम करणारे कामगार, आशा व अंगणवाडी सेविका, फेरीवाले, बीडी कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, पेन्शनधारक तसेच विविध उद्योगांतील कामगार यांच्या मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन २२ संघटनांच्या मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चाच्या माध्यमातून राज्यासाठी स्वतंत्र कामगार धोरण तयार करणे, शासनातील कंत्राटी कामगारांसाठी ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोनार समाज्याच्या मागण्याबाबत सकारात्मक

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सोनार समाज्याच्या मागण्याबाबत सकारात्मक -       गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती मुंबई  / रमेश औताडे  राज्यांतील गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून काही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. लवकरच एक बैठक घेऊन मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने मुंबईत आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार चित्राताई वाघ यांनी विधान भवनात सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सोने गहाण ठेवण्याच्या प्रकियेत हा घटक खूप महत्त्वाचा असतो. असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. प्रमुख मार्गदर्शक संजीव खडके, अध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, कार्यकारी सचिव  सतीश पितळे, खजिन...

बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कोर्टात चेंडू

Image
बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कोर्टात चेंडू महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा प्रकल्प निविदा प्रकरण  मुंबई  /  रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या रस्ता सुरक्षा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर गंभीर आरोप होत असून, निविदेतील अटींमुळे स्पर्धा मर्यादित केली जात असल्याचा दावा संबंधित घटकांकडून करण्यात आला आहे. आमदार किसन कथोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिल्याने त्यांच्या या निविदेत थर्मोप्लास्टिक मार्किंग, रोड स्टड्स, डेलिनेटर्स, कर्ब पेंटिंग यांसारख्या विविध रस्ता सुरक्षा कामांचा समावेश आहे. मात्र, काही अटी विशिष्ट कंपन्यांनाच लाभदायक ठरत असल्याने इतर पात्र आणि सक्षम उत्पादकांना सहभागापासून दूर ठेवले जात आहे. निविदेत ओ ई एम / ओ एम साठी विशिष्ट पूर्व-पात्रता पी क्यू सी अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये एन ए बी एल  मान्यताप्राप्त प्रयोगशाळेची अटही समाविष्ट आहे. छोट्या घटकांसाठी अशा अटी लावल्याने लहान व मध्यम उत्पादकांसाठी प्रवेश कठीण होत आहे. निविदेतील काही घटकांचा...

"My Vote, My Right "

Image
P R NEWS MEDIA NETWORK 12 April 2026 / RAMESH AUTADE The Bombay Catholic Sabha , Orlem Unit organized an orientation session on  SIR , ( Special Intensive Revision) with the tagline : "My Vote, My Right " How do I secure my Vote". While we are waiting for the Official Notification from the Maharashtra Chief Electoral Officer (CEO) Mr. S. Chockalingam on  when the SIR process with guidelines will start in Mumbai / Maharashtra ,  this awareness session was organised for the benefit of citizens to make them aware of the processes , what elements and different type of  forms to be kept in mind, various documents to be kept ready and the Booth Level Officer , ( BLO) visits to their homes. Some of them are highlighted below: 1. To start searching details of self or parents or grandparents names in 2002 electoral part. 2. To fill the enumeration form and keep it ready. 3.  To keep maximum documents ready as asked by the Election Commiss...

जनतेला अंधारात कधीच ठेवणार नाही

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील वीज समस्येबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरणकडून अंधार पडल्यानंतर अचानक वीज बंद करणे व लोडशेडिंग लावणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात देशमुख यांनी थेट ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोन न उचलल्याने त्यांच्या पीए नी तातडीने प्रतिसाद देत लगेचच संबंधित महावितरणच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क जोडला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून लोडशेडिंग थांबवावे, अशी ठाम मागणी देशमुख यांनी केली आहे. पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  रमेश औताडे   संस्थापक संपादक 7021777291

Second Case of Bahá’í Subjected to Mock Executions and Torture in Iran Raises Alarm Over Escalating Persecution

Image
Mumbai / P R NEWS MEDIA NETWORK  Disturbing new reports have emerged of the brutal torture of Mr. Borna Naimi, a 29-year-old Bahá’í and father of a three-year-old, who has endured at least two mock executions, electric shocks causing severe burns, and sustained physical and psychological abuse since his arrest in Kerman on 1 March. His case, along with that of his cousin Peyvand Naimi, signals a deeply troubling escalation in the persecution of Bahá’ís in Iran—the country’s largest non-Muslim religious minority. In the initial days of detention, Borna was subjected to repeated beatings, with blows to his ribs, chest, back, and sides. He was also moved between undisclosed locations and threatened relentlessly—particularly with harm to his wife and young daughter, including warnings that his child would be placed in a state orphanage if he refused to comply. Under extreme duress, Borna was forced to sign a pre-written false confession implicating himself and Peyvand i...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण इशारा

Image
महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण इशारा मुंबई / रमेश औताडे  महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून दिलेल्या लेखी आदेशाला सरकारी बाबू केराची टोपली दाखवत असतील तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार !  मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय,उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची  उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या  प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी  भाऊसाहेब बाजीराव नळकांडे हे शेतकरी बुधवार १५ नोव्हेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार आहेत. राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन निवेदने दिली होती तसेच भेटही घेतली होती,त्यानुसार दि.०४/०९/२०२५ व दि.०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रि...

महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली

Image
महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार ! मुंबई / रमेश औताडे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून दिलेल्या लेखी आदेशाला सरकारी बाबू केराची टोपली दाखवत असतील तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार ! मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय,उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची  उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या  प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी  भाऊसाहेब बाजीराव नळकांडे हे शेतकरी बुधवार १५ नोव्हेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार आहेत. राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन निवेदने दिली होती तसेच भेटही घेतली होती,त्यानुसार दि. ०४/०९/२०२५ व दि. ०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रितसर चौ...

इराणमध्ये ' बहाई ' पंथाच्या व्यक्तीवर वाढते अत्याचार

Image
मुंबई / रमेश औताडे ' बहाई ' पंथाचे २९ वर्षीय अनुयायी बोर्ना नईमी यांच्यावर इराणमध्ये झालेल्या क्रूर छळाबाबत बहाई समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १ मार्च रोजी केरमान येथे अटक झाल्यापासून, बोर्ना यांना किमान दोनदा फाशी देण्याचा केवळ आभास निर्माण करण्याचा प्रकार व विजेचे धक्के देऊन आणि शारीरिक व मानसिक छळ सुरू केला आहे.  या अगोदर त्यांचे चुलत भाऊ पयवंद नईमी यांची घटना अशीच होती. या दोन्ही घटना इराणमधील 'बहाई' पंथाच्या अनुयायांवरील अत्याचारांमध्ये अत्यंत चिंताजनक वाढ झाल्याचे संकेत आहे. 'बहाई' हा इराणमधील मुस्लिमेतर धार्मिक अल्पसंख्याकांचा सर्वात मोठा गट आहे. जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील 'बहाई आंतरराष्ट्रीय समुदाया'च्या प्रतिनिधी, सिमिन फहांदेज यांच्या मते "केवळ आपल्या श्रद्धेसाठी इतक्या क्रूर छळाला सामोरे जाणाऱ्या या कुटुंबाबद्दल मनात असीम वेदना आणि दुःख न वाटणे अशक्य आहे. इतिहास केवळ या निर्दय कृत्यांचीच नोंद घेणार नाही, तर अकल्पनीय दबावाखालीही आपल्या श्रद्धांवर ठाम राहणाऱ्या लोकांच्या धैर्याचीही नोंद घेईल."  बोर्ना यांन...

Second Case of Bahá’í Subjected to Mock Executions and Torture in Iran Raises Alarm Over Escalating Persecution

Image
Mumbai / Ramesh Autade  Disturbing new reports have emerged of the brutal torture of Mr. Borna Naimi, a 29-year-old Bahá’í and father of a three-year-old, who has endured at least two mock executions, electric shocks causing severe burns, and sustained physical and psychological abuse since his arrest in Kerman on 1 March. His case, along with that of his cousin Peyvand Naimi, signals a deeply troubling escalation in the persecution of Bahá’ís in Iran—the country’s largest non-Muslim religious minority. In the initial days of detention, Borna was subjected to repeated beatings, with blows to his ribs, chest, back, and sides. He was also moved between undisclosed locations and threatened relentlessly—particularly with harm to his wife and young daughter, including warnings that his child would be placed in a state orphanage if he refused to comply. Under extreme duress, Borna was forced to sign a pre-written false confession implicating himself and Peyvand in the alleged...

सामाजिक बांधिलकी जपणारे प्रतिष्ठान

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त पवना हाॅस्पीटल सोमाटणे फाटा येथे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या वतीने आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागातील २५० रूग्णांना फळे व बिस्कीटे यांचे वाटप  पवना हाॅस्पीटलचे कार्यकारी संचालक डाॅ.सत्यजित वाढोकर, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष लेखक अशोकराव टाव्हरे, डाॅ.भाऊसाहेब फुके, सुरेखा टाव्हरे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य, सार्वजनिक बांधकाम,पाणीपुरवठा,महिला व बालविकास, उर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. रूग्णांना फळे व बिस्कीटे वाटप करून शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली असे मत डाॅ.सत्यजित वाढोकर यांनी व्यक्त केले.   पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  संस्थापक संपादक रमेश औताडे  7021777291

मातंग समाजाला सरकारने अद्याप आश्वासनावरच ठेवले

Image
मुंबई / रमेश औताडे  अनेक वर्षांपासून मूलभूत हक्कांसाठी झगडणारा मातंग समाज आजही आश्वासनांच्या सावलीत उभा आहे. प्रत्येक वेळी आंदोलन, निवेदन, बैठका आणि घोषणा होतात. पण प्रत्यक्षात बदल मात्र काहीच नाही. सरकारकडून वारंवार दिली जाणारी आश्वासने आता केवळ शब्दांचे ओझे बनली आहेत, असा संतप्त सवाल भारतीय लहुजी सेनेचे मुंबई विभागीय प्रमुख नरसिंग सोपान सूर्यवंशी यांनी सरकारला केला आहे. ३० ऑगस्ट २०२२ रोजी आझाद मैदानात आंदोलन केले. अ ब क ड उपवर्गीकरण  करावे अशी मागणी केली. शिक्षण, नोकरी, घरे, आरोग्य आणि सामाजिक सन्मान या सर्व बाबतीत मातंग समाज आजही मागेच आहे. अनेक कुटुंबे अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये, असुरक्षित परिस्थितीत जीवन जगत आहेत. तरुणांच्या डोळ्यांत स्वप्न आहेत, पण त्या स्वप्नांना आधार देणारी ठोस योजना दिसत नाही. समाजातील तरुणाईत रोष आणि अस्वस्थता वाढत चालली आहे. काहींनी तर आयुष्यभर लढा देऊनही हातात काहीच न लागल्याची वेदना व्यक्त केली. “आम्ही किती वर्षे थांबायचं?” हा प्रश्न आता अधिक तीव्र होत आहे. जर सरकारने लवकरच ठोस निर्णय घेतला नाही, तर महाराष्टभर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने...

४०० कोटी चा घोटाळा. ..... 400 crore sca

Image
४०० कोटी चा घोटाळा 400 crore sca m 

पुढील पिढीला प्रेरणा देणारा ग्रंथ

Image
*भालावलीकर सारस्वत*                                                        स्मरण ग्रंथाचे प्रकाशन  *उत्कृष्ट व माहितीपूर्ण ग्रंथ*  - दा. कृ. सोमण *पुढील पिढीला प्रेरणा देणारा ग्रंथ* -प्रा. हेमंत सामंत मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  *भालावलीकर सारस्वत* या  स्मरण ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध खगोलतज्ज्ञ व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपऩ्न झाले. सारस्वत हितवर्धक मंडळाच्या शतकपूर्तीनिमित्ताने ज्ञातीचे मूळ, श्रद्धास्थाने आणि जीवनमूल्ये यांनी प्रेरित; स्थलांतरे आणि स्थित्यंतरे याचा बोलका मागोवा घेणा-या या स्मरण ग्रंथाचे संपादन अशोक जनार्दन सिनकर, प्रमोद यशवंत तेंडुलकर, सुधाकर वसंत लोटलीकर यांनी केले आहे. हा समारंभ कै. श्रीपाद दत्तात्रय तेंडुलकर मंगल कार्यालय, माहीम येथे संपन्न झाला.  व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ सिनकर, विशेष वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार ...

श्रीधर फडके यांची सुवर्ण महोत्सवी कारकीर्द उत्साहात साजरी

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  सुप्रसिद्ध संगीतकार, गायक  आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व श्रीधर फडके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त  त्यांचा पाच दशकांचा म्हणजेच सुवर्ण महोत्सवी सांगीतिक प्रवास उलगडून दाखविणारा 'येथोनि आनंदु रे' हा कार्यक्रम कल्याण येथील  अत्रे रंगमंदिरामध्ये रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात पार पडला.  सुस्वर क्रिएशन्स (संचालिका सुकन्या जोशी) अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान ( संस्थापक योगेश जोशी) आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय रचना शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी साकुरीकर, सुराज सोमण यांनी सादर केल्या. तसेच श्रीधर फडके यांनी ओंकार स्वरूपा, जय शारदे , तुला पाहिले मी, तोच मी, फिटे अंधाराचे जाळे ही गाणी सादर करून अविस्मरणीय सांगीतिक अनुभव रसिकांना दिला. तसेच श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले हिंदू सामर्थ्य गीत आणि  डॉ  दीपक वझे लिखित शंकर महादेवन यांनी गायलेले गीत स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले, त...

घणसोलीच्या समस्यावर नगरसेविका वैशाली मस्कर यांची महासभेत मुद्देसूद मागणी

Image
घणसोलीच्या समस्यावर नगरसेविका वैशाली मस्कर यांची महासभेत मुद्देसूद मागणी  प्रतिनिधी / नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय  नवी मुंबईतील घणसोली परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मूलभूत समस्यांकडे नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत नगरसेविका वैशाली मस्कर यांनी नागरिकांच्या प्रश्नांना जोरदारपणे वाचा फोडत महापौर उपमहापौर आयुक्त व संबंधित यंत्रणांना समस्या दूर करण्याची आपल्या भाषणातून सविस्तर मागणी केली.  रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटी, वाढती घाण व आरोग्यविषयक समस्या, तसेच पार्किंग समस्या, नामकरण विषय , नागरिक हॉलमधील परिपूर्ण किचन, सेंट्रल पार्क मधील अनधिकृत गर्दी, अनधिकृत फेरीवाले, वाढत्या डासांच्या समस्येसाठी धूर फवारणी, मुलांचे खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मैदान, पार्किंगसाठी मोकळ्या भूखंडाची मागणी, दुर्गंधीयुक्त नाल्यांचा बंदोबस्त, या सर्व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी यावर सविस्तर भाषण करत  नगरसेविका वैशाली मस्कर यांनी सभागृहात महापौर यांच्या निदर्शनास आणून देत रेकॉर्डवर आणल्या.  “घणसोलीती...

Maharashtra State Mango Growers Association (MSMGA)

Image
Maharashtra State Mango Growers Association (MSMGA) proudly represents Tata Motors at Agri-Conference 2026!  Mumbai / Ramesh Autade  P R News  We are thrilled to showcase the strategic participation of Tata Motors Commercial Vehicles in our recently concluded Agriculture Conference. Together, we are committed to providing farmers with reliable transport solutions that ensure safety and higher profitability. As part of our commitment to the farming community, we featured the 'Desh Ke Trucks' campaign and the 1916 Demo Vehicle (13200 kg payload), demonstrating how modern logistics can transform the agricultural supply chain. Key Highlights from the MSMGA-Tata Motors Showcase:  Driver Safety: Prioritizing the well-being of those who move our produce.  Damage-Free Transport: Specialized space design for fruit and vegetable crates to prevent transit loss.  Growth-Focused: Living up to the promise—'Ab Profit Hoga, Aur Bhi Zyaad...

गाईवरील कारवाईविरोधात गोसेवक आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे  मंदिरांसमोर पूजेसाठी ठेवण्यात येणाऱ्या गाईवर होणाऱ्या  कारवाई विरोधात नाथपंथी डवरी गोसावी समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी भटक्या व विमुक्त जाती संघ, मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भोसले यांनी सांगितले की, मुंबईतील मलबार हिल, नाना चौक, ग्रँट रोड, चिराबाजार, गावदेवी पोलीस ठाणे परिसर, व्ही.टी., एल.टी. मार्ग, कुलाबा, मुंबई सेंट्रल आदी भागांतील मंदिरांसमोर पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या सुमारे शंभर गाईंवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत प्रत्येकी १,२५० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून काही ठिकाणी गाईंना ताब्यात घेण्यात आले आहे. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील गोसेविका माता-भगिनी अनेक वर्षांपासून मंदिरांमध्ये भक्तांना पूजेसाठी गाई उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहेत. भक्तांकडून मिळणाऱ्या दानावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अलीकडे स...