Posts

Showing posts from May, 2026

" प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा " या थीमवर यंदाचा कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हल

Image
" प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा " या थीमवर  यंदाचा कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हल मुंबई / रमेश औताडे  मुंबईत ३ ते ७ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या १७ व्या कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हलची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यंदा  " प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा "  ही थीम जाहीर करण्यात आली आहे. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर आणि इतर लैंगिक ओळख असलेल्या समुदायाच्या भावना, संघर्ष, ओळख आणि सामाजिक वास्तव अधोरेखित करणाऱ्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे.  मुंबईतील लिबर्टी सिनेमा, अलायन्स फ्राँसेज द बॉम्बे आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे हा महोत्सव रंगणार असून यंदा ४३ देशांतील तब्बल १५३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये फीचर फिल्म्स, माहितीपट, लघुपट आणि विविध सामाजिक विषयांवर आधारित कलाकृतींचा समावेश आहे.  फेस्टिव्हलमध्ये भारतासह नेदरलँड्स, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इराण, लेबनॉन, नामिबिया, निकाराग्वा, ट्युनिशिया आणि इतर अनेक देशांतील एल जी बी टी क्यू प्लस विषयांवरील चित्रपट प्रेक्षका...

इंडियन ऑईलकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत

Image
मुंबई / रमेश औताडे  जगभरातील सप्लाय चेनमधील अडचणींनंतर महाराष्ट्रात मे २०२६ मध्ये इंधनाची मोठ्या प्रमाणात अधिक मागणी होऊनही इंडियन ऑईलने इंधन पुरवठा सुरळीत राखला आहे. इंडियन ऑईलने महाराष्ट्रातील सर्व आऊटलेटवर नियोजनबद्ध कार्यप्रणाली आणि प्रभावी लॉजिस्टिकचा समन्वय राखत प्रत्येक ग्राहकाला दररोज पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा सुरळीत व अखंड पुरवठा सुनिश्चित केला आहे. ग्राहकांना दररोज २४ तास इंधनाचा पुरवठा करण्यासाठी इंडियन ऑईलने विशेष कार्यप्रणाली विकसित केली असल्यामुळे मागणीत वाढ होऊनही त्याचा पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. मे २०२६ मध्ये महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली असून, डिझेलच्या किरकोळ विक्रीत ३३ टक्क्यांची भक्कम वाढ नोंदविण्यात आली आहे. या वाढीमागे इतर पुरवठादारांच्या तुलनेत किंमतीतील फरकामुळे संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचा इंडियनऑईलच्या रिटेल आऊटलेट्सकडे वाढता कल तसेच हंगामी शेतीसंबंधित उपक्रमांमुळे निर्माण झालेली वाढती मागणी हे प्रमुख घटक आहेत. असे असले तरी मागणीत वाढ होऊनही इंधन पुरवठ्यात कोणता...

नवी मुंबई महानगरपालिकेकडून जनतेच्या जीवाशी खेळ

Image
      कंत्राटदारांच्या भल्यासाठीच मोबाईल टॉवर उभारणीचा घाट? मुंबई / रमेश औताडे  नवी मुंबई महानगरपालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू असून, स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही प्रशासन मात्र कंत्राटदारांच्या हितासाठीच काम करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रहिवासी भाग, शाळा, रुग्णालये आणि गर्दीच्या परिसरात मोबाईल टॉवर उभारले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र जनतेच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत पालिका अधिकाऱ्यांनी “डोळेझाक” केल्याचा आरोप होत आहे. पालिकेच्या लोकेशन कराराप्रमाणे संबंधित मोबाईल टॉवर हा सेक्टर ११ टी-जंक्शन परिसरात उभारणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हा टॉवर सेक्टर १० मधील संत निरंकारी चौक परिसरातील मेघमल्हार सोसायटीजवळ उभारण्यात आला. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयुक्त कैलास शिंदे यांना व संबंधित अधिकाऱ्यांना रितसर पत्रव्यवहार करण्यात आला असून अद्याप कार्यवाही नाही. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी मोबा...

प्रार्थनास्थळांवरील हल्ल्यांविरोधात ५ जूनला आझाद मैदानात विराट आंदोलन

Image
मुंबई  / रमेश औताडे  राज्यातील विविध भागांमध्ये ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांवर वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी ‘रॅपिड अॅक्शन टीम’च्या वतीने येत्या ५ जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे विराट आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील ख्रिस्ती बांधवांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख महेंद्र उर्फ बबन कोळवे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोळवे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “राज्यात काही विशिष्ट प्रवृत्तींकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले जात आहे. मात्र अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे,” असा आरोप त्यांनी केला. गेल्या तीन महिन्यांत मुंबईसह राज्यातील अनेक भागांत प्रार्थनास्थळांवर धाड टाकणे, तोडफोड करणे, श्रद्धाळूंना धमकावणे अशा घटना घडल्याचा दावा यावेळी करण्यात आला. काही संघटनांकडून प्रार्थनास्थळांम...

खाजगी ठेकेदारांसाठी कामगार मंत्री आहेत का ?

Image
मुंबई / रमेश औताडे  रायगड जिल्ह्यातील स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर राज्य सरकार आणि विशेषतः कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर गंभीर नसल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. उद्योगांच्या नावाखाली रायगडमधील जमीन, संसाधने आणि पर्यावरण वापरले जात असताना स्थानिक युवकांना मात्र रोजगारापासून दूर ठेवले जात असल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. रायगडमध्ये मोठमोठे उद्योग उभे राहिले, कंपन्यांना कोट्यवधींच्या सवलती देण्यात आल्या, मात्र रोजगाराच्या बाबतीत स्थानिक तरुणांना फक्त आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्यांमध्येही मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल २५० हून अधिक बाहेरील लोक कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे “रायगडच्या मुलांना रोजगार नाकारून बाहेरच्यांना संधी का?” असा सवाल आता उपस्थित होत आहे. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर तब्बल २ हजार ५३२ स्थानिक तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना सरकार आणि कामगार खात्याची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक तरुणांना रोजगार देण्याऐ...

अशोक टाव्हरेंच्या प्रेरणादायी कामाचे नेहमीच कौतुक राहील - नितीन गडकरी

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  गेली अनेक वर्षे साहित्य, समाजकार्य आणि पक्षनिष्ठेच्या माध्यमातून अशोकराव टाव्हरे करीत असलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे अस केंद्रीय रस्तेविकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नितीन गडकरी यांच्या सार्वजनिक कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांचे लेखन टाव्हरे यांनी केले असून गेली सात वर्षामध्ये शासकीय कार्यालये, ग्रंथालये, शाळा,पदाधिकारी, अधिकारी यांना पुस्तकांचे वितरण केले आहे.गडकरी यांचा २७ मे रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त टाव्हरे मोफत पुस्तके  वाटपाचा उपक्रम राबवित आहेत,त्याबद्दल गडकरी यांनी टाव्हरे यांना लेखी पत्र पाठवून सदर उपक्रम निश्चितच महत्वपुर्ण ठरेल असा विश्वास असल्याचे नमुद आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,भाजपचे राज्याचे अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य,विधानपरिषद विरोधी पक्षनेते ते केंद्रीय मंत्री हा प्रवास अशोकराव टाव्हरे यांनी पुस्तकांतून उलगडला आहे.मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पुस्तके असून गडकरींसारख्य...

सुवर्णकार समाजाच्या प्रश्नांवर शासनाने ठोस भूमिका घ्यावी – संयुक्त ज्ञातीबंधव सुवर्णकार समाजाची मागणी

Image
मुंबई / रमेश औताडे  पिढीजात सुवर्णकार समाजाच्या उद्योग, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी संयुक्त ज्ञातीबंधव सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत समाजाच्या समस्या आणि भविष्यातील रचनात्मक वाटचालीबाबत भूमिका मांडण्यात आली. यावेळी अध्यक्ष सुधीर गंगाराम सागवेकर यांनी सांगितले की, १९५५ ते २०२६ या कालावधीत सुवर्णकार समाजाने अनेक आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना केला आहे. बदलत्या परिस्थितीत पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाकडून विशेष सहाय्याची गरज आहे. पत्रकार परिषदेत उद्योगवाढीसाठी सुलभ कर्जपुरवठा, PM विश्वकर्मा योजना आणि संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुवर्णकार कारागिरांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच असंघटित क्षेत्रातील सुवर्णकार कारागिरांना EPF, ESIC आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सामाजिक सुरक्षा कवच देण्याची मागणी करण्यात आली. असंघटित सुवर्णकार कारागीर व वेल्डर्ससाठी विशेष विमा ...

राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या उंबरठ्यावर

Image
सरकार मात्र खरिप पिकाच्या जाहिरातीत व्यस्त सरकारच्या खोट्या घोषणामुळे बळीराजा आक्रमक  मुंबई / रमेश औताडे  राज्यातील खरीप हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या अडचणींनी गंभीर रूप धारण केले असून सरकारच्या निष्क्रिय धोरणांमुळे ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. पावसाचा लहरीपणा, खत-बियाण्यांचा तुटवडा, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. मात्र सरकारकडून केवळ बैठका, घोषणा आणि जाहिरातींचा पाऊस पडत असल्याची टीका होत आहे. रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले, तरी पुरवठा अपुरा बियाण्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. पाऊस अनियमित होत असल्याने काही भागात दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. डिझेल, वीज आणि औषधांच्या दरवाढीमुळे शेती परवडत नाही. पीकविम्याचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत. बँकांच्या वसुली नोटिसांमुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत. सरकारला उद्योगपतींची जात काळजी आहे. असा आरोप करत शेतकरी संघटनेचे अभ्यासक असे म्हणतात की, हजारो कोटींची कर्जमाफी उद्योगपतींसाठी सहज जाहीर होते; मात्र अन्नदाता शेतकरी मदतीसाठी ...

मानवतेच्या पवित्र आध्यात्मिक नवीन युगाचा उत्सव

Image
मुंबई / रमेश औताडे  अत्यंत भक्ती, आध्यात्मिक आनंद आणि शांत आदराच्या वातावरणात, मुंबईतील बहाई समुदाय २३ मे रोजी सायंकाळी बहाई केंद्रात बाब यांच्या घोषणेचा पवित्र उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमला होता. हा तो क्षण होता ज्याने मानवतेच्या आध्यात्मिक इतिहासात एका नवीन युगाच्या पहाटेची घोषणा केली. या कार्यक्रमात १८४४ सालच्या त्या ऐतिहासिक रात्रीचे स्मरण करण्यात आले, जेव्हा इराणमधील शिराझ येथील एक तरुण व्यापारी असलेल्या बाब यांनी आपले दिव्य कार्य घोषित केले आणि जगातील धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये सांगितलेले प्रतिज्ञात पुरुष, बहाउल्लाह यांच्या लवकरच होणाऱ्या आगमनाची घोषणा केली.  तीव्र छळ, तुरुंगवास आणि अखेरच्या हौतात्म्यानंतरही, त्यांच्या शिकवणींनी मानवतेला बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांच्या आगमनासाठी तयार केले, ज्यांच्या दूरदृष्टीने मानवजातीच्या एकतेची आणि सार्वत्रिक शांततेच्या स्थापनेची मागणी केली. स्त्री-पुरुषांची समानता, विज्ञान आणि धर्माचा सुसंवाद, पूर्वग्रहांचे निर्मूलन, सार्वत्रिक शिक्षण, न्याय आणि सर्व लोक व राष्ट्रांची मूलभूत एकता. सहभागींनी आशा व्यक्त केली...

ख्रिस्ती समाज मालमत्ता विक्री विरोधात देशव्यापी मोहीम

Image
मुंबई / रमेश औताडे  मेथडिस्ट चर्च इन इंडिया या संस्थेच्या बिशप आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देशभरातील चर्चच्या मौल्यवान जमिनी आणि स्थावर मालमत्ता कवडीमोलाने विकल्या जात असल्याचा आरोप करत ख्रिस्ती समाज बांधवांनी याविरोधात तीव्र एल्गार पुकारला आहे.  मुंबईतील आग्रीपाडा येथील मोक्याच्या जागेवरील बिशप हाऊस बेकायदेशीरपणे बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप समाज बांधवांनी केला असून, याविरोधात देशभरातून मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अशोक नायर, अशोक मासिदास, फिलिप मकासरे, अविनाश गायकवाड, अजय गायकवाड, सतीश नायर, येशूराज बेली , प्रणिल शिंदे आणि जसपर ख्रिश्चन हे करत आहेत. त्यांनी संपूर्ण भारतातील ख्रिस्ती समाज बांधवांना या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचे आणि पत्र मोहिमेत मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. मेथडिस्ट चर्च इन इंडिया या नावाने कोणतीही संस्था कुठेही अधिकृत नोंदणीकृत नाही. या संस्थेचा संपूर्ण कारभार मुंबई धर्मदाय आय...

ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी प्रवीण तोरणे

Image
मुंबई / रमेश औताडे  सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तोरणे  यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश निरीक्षक सेलचे अध्यक्ष धनंजय भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब साळवे , खासदार निलेश लंके  जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे, तसेच जनसेवक धामोरकर, संजय भिमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.  विविध पक्षीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रवीण तोरणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रवीण तोरणे यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत जनसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी खासदार निलेश लंके म्हणाले की, ख्रिस्ती समाजाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. बाळासाहेब साळवे यांनी ज्या मागण्या चे पत्र दिले आहे त्यासाठी  पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.

लोकसंख्या, सामाजिक समतोल आणि राष्ट्रीय धोरणांवर चर्चा आवश्यक –

Image
       महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांचे आवाहन  मुंबई  / रमेश औताडे  देशातील लोकसंख्या वाढ, संसाधनांचे नियोजन, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समतोल या विषयांवर व्यापक राष्ट्रीय चर्चा होण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संस्कार, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक जबाबदारी महत्त्वाची असते. कुटुंब व्यवस्थेबाबत निर्णय घेताना प्रत्येक नागरिकाने आपल्या परिस्थितीनुसार जबाबदारीने विचार करावा. लोकसंख्या धोरणाबाबत केंद्र सरकारने सर्व समाजांना समान निकष लागू होतील अशी स्पष्ट आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात समान नागरी संहिता, समान शिक्षण व्यवस्था, समान कायदे आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर संसदेच्या माध्यमातून चर्चा व्हावी, असेही त्यांनी नमूद केले. लोकशाही मार्गाने नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना निवेदन, पत्र किंवा संदेश पाठवून विविध विषयांवर भूमिका मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. सेंगर यांनी सामाजिक सलोखा, स...

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चेची गरज

Image
मुंबई / रमेश औताडे  महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, समाजात या विषयावर व्यापक आणि संवेदनशील चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, बलात्कारासारख्या गंभीर घटनांनंतर समाजात संतापाची लाट उसळते, मोर्चे आणि निषेध आंदोलन केले जातात तसेच सरकारवर कठोर कारवाईची मागणी होते. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि व्यावहारिक उपाययोजनांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सेंगर यांनी सामाजिक माध्यमांवरील अश्लील सामग्री, इंटरनेटवरील अनियंत्रित प्रवेश आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे तरुणांवर मानसिक परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यांनी असे मत मांडले की, लैंगिक आरोग्य, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर अधिक जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. याच संदर्भात त्यांनी देहविक्री व्यवसायात कार्यरत महिलांना कायदेशीर संरक्षण आणि “सेक्स वर्कर” म्हणून अधिकृत दर्जा देण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालय...

कडक उन्हावर हिरवागार उपाय

Image
कडक उन्हावर हिरवागार उपाय ट्री आर्मी करतेय पर्यावरण संवर्धन मुंबई / रमेश औताडे  पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास  पाहता उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ झाल्याने त्यावर उपाय म्हणून  हरित क्रांती उपक्रम आमदार सुहास बाबर यांनी ग्रीन आर्मी नावाने सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण होत आहे.  आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ सकारात्मक बदल घडवू पाहत आहे. जनता स्वयंप्रेरणेने जागा, पाणी, झाडं, श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ट्री आर्मी असं नामकरण लोकांनीच केलं असल्याचं आमदार बाबर म्हणाले. आपल्या मातोश्रींच्या श्राद्ध दिवशी ५३०० आंब्याची कलमे रुजवल्याची माहिती त्यांनी दिली. वन विभाग यांच्या माध्यमातून जपानी पद्धतीचा मियावकी जंगल तसेच गायरान जमिनीवर, रस्त्यालगत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम सुरु आहे.   ५ जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरु आहे. व्यक...

आंधळ दळतंय अन् कुत्रं पिठ खातंय ....

Image

नटसम्राट मधील एक आठवण

Image

कुणी घर देता का घर असा नारा देत आंदोलनाचा इशारा

Image
 मुंबई / रमेश औताडे  सरकारने बेघर कोणी राहणार नाही असा आदेश निर्गमित केला आहे. मुंबई भाडेकर रहिवासी संघामध्ये जिथे भाडेकरू आहेत, त्या सर्वांना घरी मिळाले पाहिजेत. मुंबई शहरात गेल्या अनेक पिढ्यांपासून जुन्या चाळी, इमारती आणि झोपडपट्टी या वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने भाडेकरू राहत आहेत पुनर्वसनाच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी विखुरलेल्या वैयक्तिक घर मालकांकडे राहणारे भाडेकरू मात्र या योजनांपासून वर्षानुवर्ष वंचित राहतात. त्यामुळे मराठी भूमिपुत्र बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे, प्रभाकर कांबळे मुंबई भाडेकरू संघ अध्यक्ष, वनिता कांबळे मुंबई भाडेकरू महासंघ जिल्हाध्यक्ष, वनिता निकाळजे  मुंबई जिल्हा सचिव भाडेकरू रहिवासी संघ, संकल्पना कांबळे मुंबई कोषाध्यक्ष भाडेकरू रहिवासी महासंघ यांनी सरकारकडे याबाबत मागणी केली आहे. म्हाडा व एस आर ए च्या पुनर्विकास योजनांमध्ये विखुरलेल्या भाडेकरूनना स्वतंत्र घटक म्हणून समाविष्ट करावे. पुनर्विकासातून निर्माण होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी किमान २० टक्के सद...

अन्यायाविरोधात दिव्यांग नागरिकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Image
              हक्कासाठी लढतोय , पण ऐकणार कोण !  मुंबई / रमेश औताडे  अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची  खेडचे तहसीलदार यांनी  अंमलबजावणी करून आदेश पारित केल्यानंतर खेडच्या उपविभागीय अधिकाऱ्याने  तातडीने स्थगिती दिली. यामुळे  खेड तालुक्यातील सायगाव येथील जमीनप्रकरणी अन्यायग्रस्त दिव्यांग नागरिक सुदाम शंकर बोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषण सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी,खेड यांचा आदेश १२ एप्रिल २०१६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी रद्द केला होता. तहसीलदार खेड यांना फेरचौकशी आदेश दिले होते. त्यानंतर अप्पर विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे स्थगिती नसतानाही नऊ वर्षे अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. तहसीलदार खेड यांनी २५ मार्च २०२६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचा आदेश कायम ठेवल्याने प्रतिवादींनी खेडचे उपविभागीय अधिकारी, प्रांत यांचेकडे अपिल दाखल केले. स्थगिती दिली नाही तर जमीनीची विक्री सुदाम बोरकर व इतर करतील हा मुद्दा ग्राह्य धरून खेडचे उपविभागीय अधिकारी, प्रांत ...

सुसंवादाने जगण्यासाठी आंतर-धार्मिक एकता परिषद

Image
मुंबई / रमेश औताडे    सर्व धर्मांमधील वाईट विचारधारेला नाकारणे आणि निसर्गाशी सुसंवादाने जगणे या दोन मुद्यावर आंतर-धार्मिक एकता परिषद होत आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते टी. एम. कृष्णा हे या परिषदेत प्रमुख भाषण देणार आहेत. आंतर-धार्मिक एकता परिषदेचे  संयोजक आणि इस्कॉनचे पदाधिकारी केशव चंद्र दास , आयआरएससीचे सह-संयोजक आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे  संचालक इरफान इंजिनिअर, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, रामकृष्ण मिशन, मुंबई धर्मप्रांत आणि अजमेर शरीफ दर्गा यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी, धार्मिक नेते परिषदेत सहभागी होणार आहेत. जेसुइट धर्मगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ फादर फ्रेझर मास्कारेन्हास, डॉ. सुरिंदर कौर, अभिनेते जॉय सेनगुप्ता, टी. एम. कृष्णा आणि त्यांच्या चमूच्या कर्नाटकी संगीताच्या सायंकाळच्या कार्यक्रमाने याची सांगता होईल. सत्य बोला आणि आपल्यातील प्रामाणिकपणाचा स्वीकार करा. असा संदेश देण्यात येणार आहे. आपण एकमेकांच्या श्रद्धा समजून घ्यायला आणि स्वीकारायला शिकले पाहिजे. जेव्हा धर्मामागे दुष्ट हेतू असतो, तेव्हा तो अतिरेकी बनतो. आम्ही टप्प...