Posts

Showing posts from July, 2026

महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मा. खाजाभाई शेख यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले साहेबांचा सत्कार

Image
मुंबई – संविधान बंगला पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  आज ३१ जुलै २०२६ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले साहेब यांची मुंबई येथील संविधान बंगला येथे अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुष्पहार अर्पण करून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा सत्कार अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मा. खाजाभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, सामाजिक न्याय, संघटन मजबुती, पक्षविस्तार तसेच जनहिताशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी हाजी वकार खान, मौलाना रशीद अन्सारी, इरफान शेख, कलाम भाई, असलम शेख, मुबीन अलालखान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. समाजातील सर्व घटकांच्या न्याय, समानता आणि सर्वांगीण विकासासाठी संविधानाच्या मूल्यांनुसार कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जय भीम! जय संविधान! जय रिपाइं (आठवले)!

आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन राय आणि भारत अनमोल पार्टीचे शिवप्रकाश तिवारी यांची मागणी

Image
मुंबई / रमेश औताडे  नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा झाली, किती नवीन बँक खाती उघडण्यात आली, संशयास्पद व्यवहारांवर काय कारवाई झाली आणि जुन्या नोटांची नेमकी कशी विल्हेवाट लावण्यात आली, याची सविस्तर माहिती केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन राय आणि भारत अनमोल पार्टीचे शिवप्रकाश तिवारी यांनी केली.  या मागणीसाठी १५ ऑगस्टनंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. नोटाबंदीनंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत अवघ्या पाच दिवसांत जुन्या ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटांद्वारे सुमारे ७४५.५८ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली होती. या व्यवहारांची अंतिम चौकशी, निष्कर्ष आणि त्यानंतर झालेल्या कारवाईचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. २०१६ ते २०२६ या कालावधीतील नोटांची वर्षनिहाय व मूल्यवर्गनिहाय छपाई, वितरण, परतावा आणि नष्ट केलेल्या नोटांचा संपूर्ण हिशेब भारतीय रिझर्व्ह बँक  आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ज...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन

Image
               नरसिंग सोपान सूर्यवंशी  यांची माहिती मुंबई / P R NEWS  भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी "लेखन प्रेरणा दिन" विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने डॉ. साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमात साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांशी संबंधित मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. भारतीय लहुजी सेनेचे मुंबई विभागीय प्रमुख नरसिंग सोपान सूर्यवंशी यांनी कार्यकर्ते, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लेखन प्रेरणा दिन यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.  विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनीही डॉ. अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने नवी मुंबई महानगरपालिकेकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबईत उभारण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी १५ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास पालिका मुख्यालयासमोर पदयात्रा व मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही अनेक वेळा या विषयावर पत्रव्यवहार करण्यात आला असून  अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. असे चंदू पाटील,  दत्तात्रय निंबाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने योग्य जागा निश्चित करून पुतळा उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विठुरंग.......

Image
मुंबई / P R NEWS  *२६ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी* निमित्त *प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आणि नृतनाट्य प्रोडक्शन्स* आयोजित *“विठुरंग”* अत्यंत दिव्य, भक्तिरसपूर्ण आणि आध्यात्मिक कार्यक्रम अटळ स्मृती उद्यान, बोरिवली येथे मोठ्या दिमाखात पार पडला.  *प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनचे सर्व विश्वस्त एड. रुपाली ठाकूर, सौ वैशाली भिडे बर्वे, श्री महादेव गोविंद रानडे आणि नृतनाट्य प्रोडक्शन्सच्या संचालिका वैष्णवी बर्वे*, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि या कार्यक्रमास सहकार्य करणारे सर्व *प्रायोजक (गिरगाव कट्टा, एलिट्स कॅपिटल, लोकमान्य मल्टीपर्पज कॉ-ऑप सोसायटी, ग्रंथ तुमच्या दारी, पीएमसी, सौ रिद्धी खुरसंगे, सौ सोनाली पाटील)* यांनी अत्यंत निस्वार्थ, प्रामाणिक आणि समर्पित भावनेने सहकार्य केले.  कार्यक्रमात गायन करणारे सौ. वैशाली भिडे बर्वे, कु. सिद्धांत पाटकर आणि कु. स्वरा डबीर या कलाकारांनी आपल्या अप्रतिम गायनाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातील प्रत्येक भक्तिगीत हे मनाला स्पर्शून जाणारे होते. प्रत्येक गायक-गायिकेने केवळ संगीत सादर केले नाही, तर आपल्या भक्तिभावातून श्री प...

रीगल इयर साठी रोटेरियन नर्गिस गौर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती

Image
मुंबई / रमेश औताडे  रोटरी क्लब ऑफ मुंबई साउथ कफ परेड या विभागात  २०२६-२७ या रीगल इयर साठी रोटेरियन नर्गिस गौर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती (इन्स्टॉलेशन) मोठ्या अभिमानाने बहाई सेंटर, न्यू मरीन लाइन्स, मुंबई येथे साजरी केली. हा कार्यक्रम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन राजन दुआ, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स, जिल्ह्यातील मान्यवर, रोटरी नेते, प्रतिष्ठित पाहुणे, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला.  ८० हून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा म्हणजे स्नेहभाव, मैत्री आणि सेवाभावाचा एक उत्साही उत्सव होता. या संध्याकाळचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ११ नवीन सदस्यांचा क्लबमध्ये झालेला समावेश; यामुळे 'स्वतःपेक्षा सेवा' (Service Above Self) या क्लबच्या ब्रीदवाक्याप्रती असलेली कटिबद्धता अधिक दृढ झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणात रोटेरियन नर्गिस गौर यांनी "दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणे" (Creating a Lasting Impact) या आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, शिक्षण, आरोग्यसेवा, नेत्रसेवा, समाजकल्याण...

सार्वजनिक मोकळ्या जागा जतन करण्याची वेळ

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात सार्वजनिक मोकळ्या जागा या नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण, सामाजिक संवाद आणि जीवनमानासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भविष्यातील नागरी विकासात या जागांचे संरक्षण, प्रभावी व्यवस्थापन आणि सर्वांसाठी समान उपलब्धता सुनिश्चित करणे ही अत्यावश्यक बाब आहे. अशी माहिती " अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूट " आणि  " नगर "  या सामाजिक संस्थेने मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील प्रत्येक नागरिकासाठी सध्या केवळ १.२८ चौरस मीटर सार्वजनिक मोकळी जागा उपलब्ध असून, राष्ट्रीय नियोजन निकषानुसार ही उपलब्धता १० ते १२ चौरस मीटर प्रति व्यक्ती असणे अपेक्षित आहे. मुंबईची समस्या केवळ मोकळ्या जागांच्या कमतरतेपुरती मर्यादित नसून त्या जागांचे नियोजन, व्यवस्थापन आणि देखभाल यांच्याशीही संबंधित असल्याचे अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूट  आणि  नगर या सामाजिक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई विकास आराखडा २०३४ नुसार प्रत्येक नागरिकासाठी ६.१३ चौर...

प्रज्ञा जांभेकर लिखित 'उधार का उजाला’ या हिंदी कवितासंग्रहाचे गुरुवारी प्रकाशन

Image
      किशोर कदम, डॉ. किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती मुंबई / पी आर न्यूज  सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’ या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ गुरुवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजतां प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. प्रकाशक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी ही माहिती दिली. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक विनय हर्डीकर हे भूषविणार असून ज्येष्ठ कवी आणि अभिनेते किशोर कदम, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘उधार का उजाला’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्ताने काव्यरसिकांसाठी विशेष काव्य अभिवाचनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सुनील कांबळे, राजेश शिरभाते आणि सानिका गोडसे हे पुस्तकातील निवडक कवितांचे अभिवाचन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे करणार आहेत.  संवेदनशील भावविश्व मांडणाऱ्या ‘उधार...

जीवन किती मोठे जगलो यापेक्षा, आपल्या जीवनामुळे किती जणांच्या चेहऱ्यावर हसू फुलले हे अधिक महत्त्वाचे

Image
रमेश औताडे / P R NEWS  मुंबई : "माणूस एकदाच जन्माला येतो, पण मृत्यूनंतरही अनेकांच्या जीवनात पुन्हा जन्म घेऊ शकतो," हा संदेश अवयवदानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होतो. आज देशात हजारो रुग्ण हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि इतर अवयवांच्या प्रतीक्षेत जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. योग्य वेळी अवयव उपलब्ध न झाल्याने अनेकांचे प्राण जातात. अशा परिस्थितीत समाजातील विशेषतः तरुण पिढीने अवयवदानाबाबत जागरूक होणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे. आजचे तरुण हे उद्याच्या समाजाचे आधारस्तंभ आहेत. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून त्याची वैज्ञानिक माहिती स्वतः समजून घेणे आणि ती इतरांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक तरुणाची सामाजिक जबाबदारी आहे. अवयवदान म्हणजे केवळ एखादा अवयव देणे नाही, तर एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलवणे आहे. मृत्यूनंतर दान केलेले हृदय दुसऱ्याच्या छातीत धडधडू शकते, डोळे अंध व्यक्तीला जग पाहण्याची संधी देऊ शकतात, तर मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि इतर अवयव अनेकांचे प्राण वाचवू शकतात. एका अवयव...

अनेक आघाड्यांवर इतिहास रचणारा भागवत एकादशी दिवशीचा अनोखा वारकरी महोत्सव ….

Image
P R news  / रमेश औताडे  आज मुंबई उपनगरात एक अभिनव उपक्रम घडला …  हजारो मुंबईकरांना त्यांच्या ऑफिस मधे अविरतपणे आणि वेळेत घरगुती जेवण पोचवणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांसाठीचा …  महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत तर ह्या डबेवल्या बांधवांचा वैद्यकीय तपास आणि उपचार झालेच पण केवळ त्यावर न थांबता ह्या सर्व डबेवाल्यांचे पाद्यपूजन सुद्धा संपन्न झाले !!! नागरिकांनी ह्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच शिवाय अनेक मान्यवरांनी सुद्धा अत्यंत तन्मयतेने डबेवाल्यांची पाद्यपूजा केली … बोरिवली विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय उपाध्याय , दहिसर विधानसभेच्या कर्तुत्ववान आमदार मनीषा चौधरी , डबेवाल्यांचे आमदार अशी अनोखी ओळख असलेले आमदार श्रीकांत भारतीय तसेच जेष्ठ नाट्यकलावंत श्री प्रदीप कबरे आणि सिनेनाट्य कलाकार श्री अरुण नलावडे हे देखील सहभागी झाले . उपक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागसंघचालक डॉ मकरंद शिंदे तसेच भाग कार्यवाह उदय आंबावकर यांची सुद्धा उपस्थिती लाभली .  भागवत एकादशी निमित्ताने उपस्थित सर्वांना साबुदा...

महाविद्यालयांमध्ये अवयवदान फेस्टिव्हल भरविण्याची गरज

Image
        तरुण पिढीतून उभी राहू शकते जीवनदानाची चळवळ मुंबई / रमेश औताडे  देशात दरवर्षी हजारो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत मृत्यूशी झुंज देत असतात. दुसरीकडे, अवयवदानाबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने अनेकांना वेळेवर जीवनदान मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये दरवर्षी "अवयवदान फेस्टिव्हल" आयोजित करण्याची गरज आहे असे आवाहन पर्यावरण रक्षक समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी केले. आजची तरुणाई ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. समाजात नवीन विचार रुजविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे अवयवदानाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी महाविद्यालयांपेक्षा प्रभावी व्यासपीठ दुसरे असू शकत नाही. अवयवदान फेस्टिव्हलमध्ये अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञांची व्याख्याने, प्रत्यारोपणानंतर नवजीवन मिळालेल्या रुग्णांचे अनुभव, अवयवदान केलेल्या कुटुंबांचा सत्कार, चित्रकला, घोषवाक्य, निबंध, रील व लघुपट स्पर्धा, रॅली, पथनाट्य आणि अवयवदान प्रतिज्ञा अभियान असे विविध उपक्रम आयोजित करता येतील. इच्छुक विद्यार्थ्यांना अवयवदानाबाबत वैज्ञानिक माहिती देऊन त्यांची नोंदण...

समाजसेवेच्या कार्याची दखल; सचिन लोंढेंवर मोठी जबाबदारी

Image
समाजसेवेच्या कार्याची दखल; सचिन लोंढेंवर मोठी जबाबदारी मुंबई / प्रतिनिधी युवकांच्या सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने मोर्चे, आंदोलने आणि जनजागृती करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक नेते सचिन लोंढे यांची पक्षाच्या मुंबई जोगेश्वरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सचिन लोंढे यांनी युवकांच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने संघर्ष करत अनेक जनआंदोलने उभी केली आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सचिन लोंढे म्हणाले, "मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हाध्यक्ष अजितदादा रावराणे तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. या विश्वासाला न्याय देत पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन." लोंढे यांच्या नियुक्तीमुळे जोगेश्...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

Image
मुंबई / रमेश औताडे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कनेरसर येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व लेखक अशोकराव टाव्हरे यांनी दिली. खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे,तहसीलदार प्रशांत बेडसे,नितीन सुर्यवंशी,उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीराची केलेली प्रभावी अंमलबजावणी,कायदा व सुव्यवस्थेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे,महावितरणशी निगडीत समस्येबाबत कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी,सहा.महसुल अधिकारी निलेश घोडके हे  नागरिकांच्या समस्या निवारणार्थ करीत असलेली कार्यवाही यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रशांत बेडसे तहसीलदार खेड, महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी,सहा.महसुल अधिकारी नीलेश घोडके हे वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबीर व वह्या वाटप व सन्मान समारंभास उपस्थित होते,तसेच उपविभागीय अधिकारी (प्रांत), उपविभागीय पोलीस अधि...

त्वचा, केस आणि एस्थेटिक उपचारांसाठी योग्य तज्ज्ञ शोधणे होणार सोपे

Image
 देशभरातील प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञांना जोडणारे ‘XELIX’ व्यासपीठाचे अनावरण -  मुंबई  / रमेश औताडे  त्वचा, केस आणि सौंदर्यविषयक उपचारांसाठी योग्य तज्ज्ञ शोधणे अनेकदा रुग्णांसाठी आव्हानात्मक ठरते. याच गरजेची दखल घेत मुंबईस्थित आकार मेडिकल टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ‘XELIX’ हे देशातील पहिले क्युरेटेड राष्ट्रीय व्यासपीठ सुरू केले आहे. या व्यासपीठाद्वारे रुग्णांना देशभरातील प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञ आणि एस्थेटिक तज्ज्ञांशी एका विश्वासार्ह माध्यमातून जोडले जाणार आहे. कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी आणि मेडिकल एस्थेटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेली तसेच एनएसई इमर्ज मंचावर सूचीबद्ध असलेली आकार मेडिकल टेक्नॉलॉजीज ही कंपनी या उपक्रमामागे आहे. XELIX चे उद्दिष्ट हे रुग्णांना सुरक्षित, वैज्ञानिक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्वचा व केसांच्या उपचारांपर्यंत उपलब्ध करून देणे हे आहे. त्वचारोग आणि एस्थेटिक मेडिसिन क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञांच्या उपस्थितीत एफएएचए (FAHA) डर्मेटोलॉजी परिषदेत ‘XELIX’चे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. जेरिल बनाइट, डॉ. सय्यद नाझिम, डॉ. व्ही. एस. राठोड आणि डॉ. व...

कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत न्याय द्यावा

Image
मुंबई / रमेश औताडे  अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात न्याय द्यावा, अशी मागणी वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्रीशक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गितांजली कोळी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी आदी अनुसूचित जमातींना जात व वैधता प्रमाणपत्र देताना त्यांच्या पूर्वजांच्या १९५० पूर्वीच्या "कोळी" अथवा तत्सम मूळ नोंदी ग्राह्य धराव्यात. तसेच ओटीएसपी (OTSP) क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय अनुसूचित जमातींच्या क्षेत्रबंधन आणि "जनरिक टर्म" (Generic Term) संदर्भातील गोंधळ दूर होईपर्यंत तसेच ६१ टक्के लोकसंख्येला न्याय मिळेपर्यंत राजकीय दबावातून आणण्यात आलेल्या सुधारणा विधेयक २०२६ ला मंजुरी देऊ नये, अशी विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे. हे विधेयक पुनर्विचारासाठी राज्य शासनाकडे परत पाठवावे, अशीही मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेत कोळी समाजाच्या...

घणसोलीचे जनसेवक नितीन नाईक यांचे आवाहन

Image
एफ विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त घणसोली,माननीय *वसंत मुंडावरे साहेब* व *बालाजी भोईर* यादी भाग क्रमांक 203/204/205/206 चे सुपरवायझर यांच्या सोबत *मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष नितीन नाईक,रोहन पाटील* यांनी मनपा शाळा क्रमांक 42/44 तलवली, घणसोली गाव येथे S,I,R म्हणजे विशेष सखोल पूनर्निरीक्षण,मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू आहे, याची पाहणी करण्यात आली, *घणसोली  विभागातील सर्व मतदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनंती करण्यात येते* की आपलं नाव मतदार यादीत शाबूत ठेवण्यासाठी *केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम घणसोली, तलवली गाव शाळा क्रमांक ४२ व ४४ येथे राबविण्यात आलेली आहे. तरी आपण तिथे जाऊन आपली  S.I.R प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी*.

पद्मश्री मिलिंद कांबळेंची स्वच्छता दूत फाउंडेशन प्रशिक्षण केंद्राला भेट

Image
मुंबई / रमेश औताडे पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी स्वच्छता दूत फाउंडेशनच्या स्वच्छता कामगार प्रशिक्षण केंद्राला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी फाउंडेशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित स्वच्छता कामगारांशी संवाद साधताना पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी शिक्षण, कौशल्यविकास, आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता यावर भर देत स्वच्छता कामगारांनी बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम करण्याचे आवाहन केले.  यावेळी स्वच्छता दूत फाउंडेशनच्या वतीने संस्थेच्या गेल्या २० वर्षांच्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. स्वच्छता कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, यशोगाथा, सामाजिक परिवर्तनाचे प्रयत्न तसेच भविष्यातील विकास आराखडा पद्मश्री कांबळे आणि उपस्थितांसमोर मांडण्यात आला. सफाई कामगारांच्या सक्सेस यावेळी स्टोरी मांडण्यात आल्या व प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले.  मैथिली मिलिंद कांबळे, माया साबळे, रिबेका पाखरे, समाधान घुले, रत्नमाला राजगिरे, मंदाबाई आठवले, दिगंबर तुपे, प्रेम पाटोळे, हबीब खान उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस : कसलेले वकील, नवे चाणक्य !

Image
देवेंद्र फडणवीस : कसलेले वकील, नवे चाणक्य !                                     -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.                              भारतीय जनता पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी २०१३ साली चर्चगेट येथील नरीमन पॉइंट येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन जयराम गडकरी हे होते तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे कार्यरत होते. राष्ट्रीय आणि प्रदेश दोन्ही अध्यक्षांना तीन तीन वर्षे मुदतवाढ देण्यात यावी, अशी घटना दुरुस्ती करण्यात येणार होती. त्याप्रमाणे दुरुस्ती तर झाली, मात्र नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्याच्या नसलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे आणण्यात आले आणि नितीन गडकरी यांच्या ऐवजी राजनाथ सिंह यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवण्यात आली. (नंतर नितीन गडकरी हे निर्दोष ठरले) प्रदेशाध्यक्ष सु...

रक्षाबंधन जवळ आले असतानाच

Image

उपवर्गीकरणाच्या मुद्यावर समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांची मागणी

Image
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करा  राजकारण नको, न्याय हवा –  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क/ रमेश औताडे  अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, अशी मागणी समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, आरक्षणाच्या प्रश्नासाठी दिवंगत नेते बाबासाहेब गोपले यांनी आझाद मैदानावर उपोषण करून मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी सरकारने या प्रश्नावर योग्य न्याय दिला नाही. आता मातंग समाजाला आरक्षणाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागले असून, आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी समाज एकवटला आहे. सुनीता तूपसौंदर्य यांनी आरोप केला की, काही राजकारणी आणि राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नाचे राजकारण करून दलित समाजात जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटकांनी परस्परांमध्ये मतभेद न करता, उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर कशी होईल यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, सर...

पर्यावरण रक्षक समिती चे अध्यक्ष किसान कदम यांचे आवाहन

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  विशेष प्रतिनिधी  अध्यक्ष किसन कदम यांची माहिती ....... पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी तसेच समृद्ध नैसर्गिक वारसा देण्यासाठी पर्यावरण रक्षक समितीतर्फे राज्यभर व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "एक वडाचे झाड लावा आणि ५०० वर्षांचे पुण्य कमवा" हा संदेश केवळ घोषवाक्य नसून भविष्यातील पर्यावरण संरक्षणाचा ठोस संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या वाढत्या काँक्रीटीकरणामुळे निसर्गाचे अस्तित्व धोक्यात आले असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे मोकळी जागा नाही त्यांनी वडाची काडी प्लास्टिकच्या कुंडीत किंवा पिशवीत लावून ती ४ ते ५ फूट उंच होईपर्यंत जपावी. त्यानंतर मंदिर परिसर, गावातील मोकळी जागा किंवा वनक्षेत्रात सुरक्षितपणे तिची लागवड करावी. अशा प्रकारे लावलेले झाड पुढील अनेक शतकांपर्यंत पर्यावरणाचे संरक्षण करू शकते. लग्न, वाढदिवस, स्मृतिदिन ...

तुतारीच्या सुरातून सामाजिक ऐक्याचा संदेश

Image
मुंबई / रमेश औताडे  साहित्यभूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, मुंबई प्रदेश आणि आंबेडकरी विचार मंच यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीत कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवत सामाजिक ऐक्याचा आणि परिवर्तनाचा संदेश दिला. "तुतारी आम्हीही वाजवली;  मात्र तिच्या प्रत्येक सुरात लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे यांचे समतेचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक न्यायाचे विचार घुमले पाहिजेत," असे आंबेडकर विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे म्हणाले. रॅलीदरम्यान बौद्ध, मातंग, चर्मकार, वाल्मिकी आणि आदिवासी समाजाच्या ऐक्यासाठी शपथ घेण्यात आली. विविध समाजघटकांनी एकत्र येत संविधानिक मूल्यांचे जतन, सामाजिक सलोखा आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. हातात बॅनर, पिवळे झेंडे आणि तुतारीच्या निनादात निघालेल्या या रॅलीने अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य आणि परिवर्तनाचा प्रभावी संदेश दिला.
Image

ज्येष्ठांच्या 11 प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार - आमदार मंदाताई म्हात्रे

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  रमेश औताडे ( प्रतिनिधी )  बेलापूरच्या आमदार माननीय सौ. मंदाताई म्हात्रे यांना आज फेस्कॉम मुंबई विभाग आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत ज्येष्ठ नागरिकांच्या 11 प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. फेस्कॉम मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. अजय माढेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदारांची भेट घेतली. यावेळी श्री. सुरेश पोटे यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निवेदन स्वीकारताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठांच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकल्या. ज्येष्ठ हे समाजाचा आधार आहेत असे सांगून, फेस्कॉमच्या 11 मागण्या मुख्यमंत्री यांच्या स्तरावर मांडून त्या लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले. आमदारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त क...

मातंग महिला हत्या प्रकरणी सखोल तपासणीची मागणी

Image
मुंबई / रमेश औताडे  सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मातंग समाजातील महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत, दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अशा घटना समाजासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. हत्येमागील खरा सूत्रधार आणि कारणांचा सखोल तपास करून कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. शासन आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  7021777291

अधिकृत पत्रकार नोंदणीचे धोरण लवकरच? बोगस पत्रकारितेला बसणार आळा

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी आणि बोगस पत्रकारांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिकृत पत्रकारांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र, पारदर्शक आणि मानक कार्यपद्धती तयार करण्याची मागणी जोर धरत आहे. पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची शैक्षणिक पात्रता, पत्रकारितेचा अनुभव, संबंधित माध्यम संस्थेचे अधिकृत नियुक्तीपत्र, नियमित कार्याचा पुरावा आणि आचारसंहितेचे पालन यांसारख्या निकषांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तज्ज्ञ पत्रकार, संपादक, वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन करून पत्रकार नोंदणीची स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. या प्रक्रियेमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारिता करणाऱ्या अधिकृत पत्रकारांना संस्थात्मक संरक्षण, विश्वासार्ह ओळख आणि सन्मान मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर पत्रकारितेच्या नावाखाली होणारे गैरप्रकार, खंडणी, दिशाभूल आणि बोगस ओळखपत्रांचा गैरवापर कमी होण्यास ...

कुरारमध्ये भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईतील कुरार परिसरात भरदिवसा एका २५ वर्षीय तरुणीवर वायर आणि चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीवर अचानक हल्ला करण्यात आला. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी कुरार पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गांधीनगर परिसरात गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्...

मुंबईत २२ जुलै रोजी अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा

Image
मुंबई / रमेश औताडे  अखिल भारतीय किसान सभा (AIKS) यांच्या वतीने विविध प्रलंबित शेतकरी प्रश्नांसाठी २२ जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जाणार आहे. राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले,  राज्याध्यक्ष उमेश देशमुख, उपाध्यक्ष डाॅ. उदय नारकर, अजय बुरांडे, उद्धव पौळ, कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना, सुभाष चौधरी यांनी व इतर पदाधिकारी, शेतकरी यांनी वारंवार आंदोलने केली. मोर्चे काढले. बैठका घेतल्या.  शेवटी काय मिळाले ? सरकारला जाग का येत नाही ? असा सवाल शेतकरी करत आहेत. मोर्चामध्ये देवस्थान इनाम जमिनी खालसा करणे, गायरान अतिक्रमणे नियमित करणे, पिकविमा तातडीने देणे आणि घराच्या तळाच्या जमिनी नावावर करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा म...

कलीमात (वचने) महिन्याच्या प्रारंभानिमित्त बहाई केंद्रात १२ जुलै रोजी कार्यक्रम

Image
मुंबई / रमेश औताडे  बहाई धर्माच्या पंचांगानुसार 'कलीमात' (Words/वचने) या महिन्याच्या प्रारंभानिमित्त 'एकोणीस दिवसांचा मेळावा' (Nineteen Day Feast) रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता बहाई केंद्रात आयोजित करण्यात आला आहे. बहाई धर्मातील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि नियमित धार्मिक-सामुदायिक कार्यक्रम असून, जगभरातील बहाई समुदाय प्रत्येक १९ दिवसांनी अशा मेळाव्याचे आयोजन करतो. बहाई पंचांगात वर्षाचे १९ महिने असून प्रत्येक महिना १९ दिवसांचा असतो. प्रत्येक नव्या महिन्याच्या प्रारंभी श्रद्धाळू एकत्र येऊन प्रार्थना, पवित्र ग्रंथांचे वाचन, आध्यात्मिक चिंतन आणि समाजहिताच्या विषयांवर चर्चा करतात. या मेळाव्याचा उद्देश श्रद्धा दृढ करणे, समुदायात ऐक्य वाढविणे आणि समाजसेवेची भावना बळकट करणे हा आहे. मेळाव्याचे तीन प्रमुख भाग असतात. पहिल्या भागात बहाई धर्मग्रंथ आणि इतर धर्मग्रंथांतील निवडक प्रार्थना वाचन आणि भक्तिगीते सादर केली जातात. दुसऱ्या भागात स्थानिक बहाई समुदायाच्या विविध उपक्रमांवर, समाजहिताच्या योजनांवर, शैक्षणिक आणि सेवा कार्यांवर विचारविनिमय केला जातो. त...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

Image

*शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ; नांवे बदलून दिशाभूल नको !

Image
*शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ; नांवे बदलून दिशाभूल नको !                                        -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.                                              साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणून ज्यांच्याकडे पाहण्यात येत असे ते आदरणीय लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान असतांना त्यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला होता. 'भारताच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा सन्मान आणि देशातल्या कोट्यवधी जनतेचा अन्नदाता बळीराजा यांचा गौरव' या लालबहादूर शास्त्री यांच्या घोषणेतून ओतप्रोत दिसून येत होता. परंतु हल्ली शेतकरी हा सत्ताधाऱ्यांचा राजकीय विषय झाला आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी यंव करु आणि आम्ही बळिराजा साठी त्यंव करु अशा नुसत्या राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा. राजकारणातील जाणता राजा म्हणून ओळखण्यात येणाऱ्या शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी ते केंद्रात कृषिमंत्री...