समाजसेवेच्या कार्याची दखल; सचिन लोंढेंवर मोठी जबाबदारी

समाजसेवेच्या कार्याची दखल; सचिन लोंढेंवर मोठी जबाबदारी
मुंबई / प्रतिनिधी

युवकांच्या सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने मोर्चे, आंदोलने आणि जनजागृती करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक नेते सचिन लोंढे यांची पक्षाच्या मुंबई जोगेश्वरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सचिन लोंढे यांनी युवकांच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने संघर्ष करत अनेक जनआंदोलने उभी केली आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सचिन लोंढे म्हणाले, "मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हाध्यक्ष अजितदादा रावराणे तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. या विश्वासाला न्याय देत पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन."

लोंढे यांच्या नियुक्तीमुळे जोगेश्वरी तालुक्यात पक्षसंघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि युवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान