Posts

Showing posts from September, 2026

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन

Image
मुंबई  / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  29 सप्टेंबर 2026 मुंबई आरक्षण मोर्चात सहभागी झालेले देऊळवाडी इथून कार्यकर्ते बालाजी सोपानराव सूर्यवंशी नरसिंग सोपान  सूर्यवंशी विठ्ठल दिगंबर गडीकर रामकृष्ण निवृत्ती गडीकर गंगाधर वामनराव गडीकर प्रदीप भगवान गडीकर मारुती दिनकर गडीकर साहेबराव वामनराव सूर्यवंशी राजकुमार सोपान सूर्यवंशी,टोटल आपल्या देऊळवाडी येथून 9 व्यक्तीचा समावेश मुंबईच्या मोर्चामध्ये सहभाग

‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’ निवडणुकीत ‘संकल्प’ पॅनेलचे आव्हान

Image
मुंबई / रमेश औताडे  १८८८ मध्ये स्थापन झालेल्या ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘संकल्प’ पॅनेलने विद्यमान पदाधिकाऱ्यांना आव्हान दिले आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कलाकारांच्या हिताला प्राधान्य देण्याचा संकल्प पॅनेलने व्यक्त केला आहे. गेल्या सुमारे १५ वर्षांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना निवडणुकीची माहिती अनेक सभासदांना उशिरा मिळाल्याचा दावा पॅनेलने केला आहे. तसेच दिवंगत ज्येष्ठ शिल्पकार व माजी सचिव चंद्रजित यादव यांचे निधन होऊनही संस्थेच्या ऑनलाइन लिंकवर त्यांचे नाव अद्याप ‘नोडल ऑफिसर’ म्हणून दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१५ पासून धर्मादाय आयुक्त कार्यालयात आवश्यक ‘चेंज रिपोर्ट’ सादर करण्यात आलेला नसल्याचाही दावा पॅनेलने केला आहे. या आरोपांबाबत अधिकृत कागदपत्रांद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचेही पॅनेलने म्हटले आहे. दरम्यान, २००२ नंतर संस्थेच्या विकासासाठी भूखंड मिळविणे, वांद्रे येथील कलासंकुल तसेच विविध कला पुरस्कार सुरू करण्यासारख्या कामांचा संदर्भ ‘संकल्प’ पॅनेलने दिला आहे. २०१० नंतर...

देशभरातील एकूण श्रीमंतापैकी सर्वाधिक श्रीमंत मुंबईत

Image
मुंबई / रमेश औताडे देशातील १ हजार ८१० श्रीमंत व्यक्तींपैकी मुंबईत ४६५ श्रीमंत आहेत. त्यानंतर नवी दिल्ली २३६ आणि बेंगळुरू १२९ असा क्रमांक आहे. एम ३ एम श्रीमंत भारतीय यादी प्रसिद्ध झाली असून या यादीतील व्यक्तींची एकूण संपत्ती तब्बल १८७.५ लाख कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गौतम अदानी ९.२३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वाधिक श्रीमंत ठरले आहेत. त्यानंतर मुकेश अंबानी  ८.६३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एल. एन. मित्तल ३.३९ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत ३९१ डॉलर अब्जाधीश असून, गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या २७ ने वाढली आहे. विशेष म्हणजे, यादीतील सुमारे ७० टक्के श्रीमंतांनी स्वतःच्या कर्तृत्वावर व्यवसाय उभा केला आहे. महिलांची संख्याही वाढून १३१ झाली आहे. यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय क्षेत्रातील १९ श्रीमंत व्यक्तींचा प्रथमच यादीत समावेश झाला आहे.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कारभाराचा हिशोब जाहीर करा

Image
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कारभाराचा हिशोब जाहीर करा;  सकल मांग गारूडी समाज कृती समितीचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन मुंबई / रमेश औताडे  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन (स्थापना: १९ जुलै १९८५) द्वारे मागील ४० वर्षांत मांग गारूडी समाजासाठी राबवण्यात आलेल्या सर्व योजनांचा वर्षनिहाय व जिल्हानिहाय संपूर्ण हिशोब सार्वजनिक करावा, या मागणीसाठी सकल मांग गारूडी समाज कृती समिती (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने श्री. सचिन आदिनाथ लोंढे यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑक्टोबर २०२१ पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  प्रमुख मागण्या आणि उपस्थित केलेले प्रश्न:  * कर्ज व अनुदान वितरण: महामंडळ स्थापनेपासून आजपर्यंत मांग गारूडी समाजातील किती लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कर्ज मिळाले? एकूण किती रुपयांचे कर्ज व अनुदान देण्यात आले?  * योजनांचा लाभ: बीज भांडवल, थेट कर्ज, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण व इतर शासकीय योजनांमध्ये समाजाला नेमका किती लाभ मिळाला?  * जिल्हानिहाय आकडेवारी: संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय कित...

श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Image
मुंबई  / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी )  श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा, आर्थिक स्थिती, सभासदहिताचे विविध निर्णय तसेच आगामी वर्षातील विकासात्मक नियोजनाबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी संस्थेचे संस्थापक माननीय अविनाश दादा पाटील तसेच अध्यक्षा सौ. सविता अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासद, पदाधिकारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, आर्थिक अहवाल, ताळेबंद व लेखापरीक्षण अहवाल याबाबत माहिती सभासदांसमोर मांडण्यात आली. सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीसोबतच सभासदांना अधिक चांगल्या आणि तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. बचत, ठेवी, कर्जवितरण, सभासद सेवा आणि आर्थिक शिस्त या बाबींवर विशेष भर देण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक विकास साधण्याचा संस्थेचा प्रयत्न ...

गुणवंत कामगारांना एसटी प्रवास व टोलमाफीची सवलत द्या

Image
मुंबई  / रमेश औताडे  महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील गुणवंत कामगारांनी एकत्र येऊन “राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र” या संस्थेची नोंदणी केली आहे. सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाकडून “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार” मिळालेल्या कामगारांना अद्याप विशेष सुविधा मिळत नसल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. पुरस्कारप्राप्त गुणवंत कामगारांना एसटी बस प्रवासात विशेष सवलत तसेच टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने शासनाकडे केली आहे. इतर पुरस्कारार्थींना विविध सुविधा मिळतात, मात्र गुणवंत कामगारांना सुविधा न मिळणे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुरेश केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा सुरू असून, मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गुणवंत कामगारांना सन्मानासोबतच आवश्यक सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सुरेश वाडकरांच्या आवाजात ‘ करा रे नामाचा गजर ’

Image
मुंबई / रमेश औताडे  लहानपणापासून मनात जपलेले संगीतकार होण्याचे स्वप्न अखेर रविंद्र दामोदर पाबरेकर यांनी साकार केले आहे. त्यांच्या संगीतबद्ध केलेल्या ‘करा रे नामाचा गजर’ या गणेशभक्तीपर गीताला ज्येष्ठ गायक पंडित सुरेश वाडकर यांनी आवाज दिला आहे. रेड रिबन म्युझिक चॅनेलद्वारे हे गीत प्रकाशित झाले असून विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे.  हे पहिलेच गीत पद्मश्री वसंत देसाई यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले आहे. वृत्तपत्रे आणि मासिकांमधील कवितांना चाली लावण्याचा छंद पाबरेकर यांना लहानपणापासून होता. भायखळ्यातील वास्तव्यात कव्वालीचे सामने, शाहीर अमर शेख यांचे पोवाडे तसेच नेहरू सेंटरच्या माध्यमातून होणारे लोकसंगीताचे कार्यक्रम पाहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचे मावसभाऊ राम जामगावकर हे पद्मश्री वसंत देसाई यांच्याकडे ढोलकीवादक होते. या सांगीतिक वातावरणामुळे त्यांच्या मनात संगीताची आवड रुजली. संगीतकार होण्याची इच्छा असतानाही आईच्या विरोधामुळे त्यांनी चित्रकलेकडे वळण्याचा निर्णय घेतला. टेक्सटाइल डिझाईन, कमर्शियल आर्ट आणि फाइन आर्ट असा प्रवास करत ते गेली ३३ वर्षे या क्षेत्रा...

शासनाकडे प्रभाकर तुकाराम कांबळे यांची महत्वपूर्ण मागणी

Image
मुंबई  / रमेश औताडे  ( मंत्रालय प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये गुणवंत कामगारांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी ही मागणी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्याच्या सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासात गुणवंत कामगारांचे योगदान मोठे आहे. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून समाज व राज्याच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या कामगारांना त्यांच्या कार्याची योग्य दखल घेत सन्मान आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक गुणवंत कामगारांना मुंबई व उपनगरांमध्ये परवडणारी घरे मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे. मुंबई महानगर परिसरातील वाढती घरांच्या किमती, मर्यादित उत्पन्न आणि वाढता जीवनावश्यक खर्च लक्षात घेता गुणवंत कामगारांसाठी म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये स्वतंत्र कोटा किंवा आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कांबळे यां...

राष्ट्रीय पोषण महिना उत्साहात संपन्न

Image
मुंबई  / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ९ व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृह, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमास राज्यभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये  महिला व बाल विकास मंत्री मा.ना. आदिती ताई सुनील तटकरे,  विधानसभेचे अध्यक्ष मा.राहुल नार्वेकर व  एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त माधवी सरदेशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  या वर्षीच्या पोषण महिन्याचे मुख्य उद्दिष्ट हे ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा माता यांना पोषक आहार, आरोग्य सेवा आणि शिक्षण याबाबत जागरूक करणे हे आहे.  "आमची अंगणवाडी - आमची जबाबदारी" आणि "पौष्टिक आहार - निरोगी जीवनाचा आधार" हा संद...

शेतकऱ्याला न्याय ; भोगवटा बदलाचा आदेश रद्द

Image
    सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक मुंबई / रमेश औताडे :   मंत्रालय प्रतिनिधी  ,   पी आर न्यूज  शासनाकडून चूक झाली तर कायदेशीर व सातत्य ठेऊन कागदोपत्री पाठपुरावा केला तर न्याय मिळतोच. असा अनुभव अहिल्यानगर जिल्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव खंडेराय वाडी येथील आदेश चाचण यांना आला आहे. या पाठपुराव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांचे शासकीय अधिकारी व शेतकरी वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आदेश चाचण यांनी दोन वर्षापुर्वी अशोकराव टाव्हरे यांची भेट घेऊन २४ एकर जमिनीबाबत सरकारी पातळीवर चुकीचे आदेश पारित झाल्याची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर टाव्हरे यांनी शासनाला पाठपुरावा करत निवेदने दिली असावमहसुल विभागाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना चौकशीचे आदेश देऊन स्वयंस्पष्ट अहवाल मागविले  होते. त्यानुसार शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना पत्र दिले. त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला. अप्पर जिल्हा...

दिव्यांग शाळा अनुदानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच चा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  दिव्यांग शाळांच्या अनुदानासह दिव्यांग कल्याण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित पारदर्शक व गतिमान कार्यवाही होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाशी संबंधित चेतन गिरसे व मनीष पाटील यांच्या भूमिकेबाबत स्वतंत्र चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे. दिव्यांग शाळांच्या अनुदानाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. अनुदानास पात्र शाळांची एकत्रित व अंतिम यादी निश्चित करून, आवश्यक शासनमान्यता घेऊन सर्व पात्र शाळांच्या अनुदानाचा एकत्रित निर्णय घेणे अपेक्षित असताना मंत्री  अतुल सावे सकारात्मक असताना त्याच्या कार्यालयाशी संबंधित चेतन गिरासे व मनिष पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे यात पेच निर्माण होत असल्याचा आरोप डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. पात्र सर्व शाळांच्या अनुदानाचा एकत्रित निर्णय घेऊन अनुदान तातडीने वितरित करावे. तसेच सचिव माणिक गुरसाळ यांना य...

बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी शासनाचा क्यू आर कोड

Image
       बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी शासनाचा क्यू आर कोड मुंबई / रमेश औताडे  :   पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी सरकारने आता प्रत्येक दवाखाना आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा परवाना, शिक्षण आणि नोंदणी क्रमांक असलेला क्यू आर कोड लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत, हीच प्रणाली इतरही क्षेत्रात लागू करावी, अशी मागणी दक्ष नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष रमेश औताडे यांनी केली आहे. सध्या अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर, बोगस पत्रकार, बोगस वकील आणि बोगस पोलीस असल्याच्या भासवून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. सामान्य नागरिकाला समोरची व्यक्ती खरी आहे की बोगस हे ओळखणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने डॉक्टरांसाठी सुरू केलेली क्यू आर कोड प्रणाली अत्यंत स्तुत्य आहे. याच धर्तीवर पत्रकार, वकील, पोलीस कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी व इतर सार्वजनिक सेवांशी संबंधित वर्गासाठीही अधिकृत ओळखपत्रासह क्यू आर कोड प्रणाली लागू करावी, जेणेकरून नागरिकांना मोबाईलवर स्कॅन करून संब...

बेस्ट बस वाचविण्यासाठी एक मोठा प्रयत्न

Image
रमेश औताडे / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई : बुधवार - ९/९/२०२६ मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या सद्यस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या संस्थेने बेस्टच्या पुनरुत्थानासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्यांची घटती संख्या, कंत्राटी बसगाड्यांवरील वाढते अवलंबित्व, मनुष्यबळातील कपात आणि कंत्राटीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे बेस्टच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी ती हळूहळू कंत्राटी पद्धतीवर अवलंबून होत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. बसगाड्यांपासून मनुष्यबळ आणि तिकीट प्रणालीपर्यंत वाढत असलेले कंत्राटीकरण बेस्टला भविष्यात शंभर टक्के कंत्राटीकरणाच्या दिशेने घेऊन जाणार आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसगाड्यांची गरज मान्य असली तरी इलेक्ट्रिक बसच्या नावाखाली बेस्टच्या स्वमालकीचा ताफा कमी करून कंत्राटी बसगाड्यांवरील अवलंबित्व वाढवणे योग्य आहे का, याचा फेरव...

दृष्टी नसली तरी आनंदाची उंची गगनाएवढी

Image
मुंबई, दि. ४ सप्टेंबर : भीमराव धुळप  दहीकाला उत्सवाच्या पूर्वसंध्येला कमला मेहता अंध मुलींची शाळा, दादर पूर्व येथे शिवसेना माहीम विधानसभा आणि ‘धगधगती मुंबई’ परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार व विभागप्रमुख महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, भीमराव धुळप, मुख्याध्यापिका तन्वी म्हाडदळकर, सुरेश काळे, श्याम चित्रे, विशाल चाफे, प्रकाश नवल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मुलींना श्रीकृष्णाची ट्रॉफी, सहभागी प्रमाणपत्र आणि प्रत्येकी रोख पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच सर्व मुलींना खाऊ वाटप करण्यात आला. श्रीकृष्णाची ट्रॉफी डोक्यावर घेऊन मुलींनी आनंदाने नृत्य केले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांचे मन भरून आले. “मुलींना दृष्टी नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला या छोट्याशा मदतीचे मोठे समाधान मिळाले,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त ...

गोविंदाचा मृत्यू झाल्यास आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Image
    महाराष्ट्र करणी सेनेची मागणी; अजय सिंह सेंगर यांचा इशारा मुंबई  / रमेश औताडे  दहीहंडी उत्सव आणि सरावादरम्यान गोविंदांच्या होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती अथवा वाळूचा थर पसरविणे बंधनकारक करावे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न करता दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आणि त्यात गोविंदाचा मृत्यू झाला, तर संबंधित आयोजकांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. दहीहंडीच्या वेळी मानवी मनोरे रचताना तोल जाणे, उंचीवरून खाली पडणे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. काही दुर्घटनांमध्ये गोविंदांना जीवही गमवावा लागतो. पूर्वी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती टाकली जात असल्याने उंचीवरून पडलेल्या गोविंदाला गंभीर दुखापत होण्याचा धोका तुलनेने कमी होता. मात्र, अलीकडील काळात रस्त्यांवर रेती न टाकताच दहीहंडीचे आयोजन केले जात असल्याचा आरोप सेंगर यांनी केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र करणी सेनेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह र...

मराठा समाजाच्या २६ मागण्यांसाठी राज्यभर जनजागृती

Image
मंत्रालय प्रतिनिधी / रमेश औताडे मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टीने राज्यव्यापी जनजागृती दौरा सुरू केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील (होनाळीकर) यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा सुरू असून, समाजाच्या २६ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. रायगड किल्ल्यापासून सुरू झालेला हा दौरा कोकणातील विविध जिल्ह्यांतून पुढे जात रत्नागिरीत दाखल झाला. ३१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध घटकांशी संवाद साधत मागण्यांबाबत जनजागृती केली. येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आंदोलनासाठी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी गावागावांत संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, अंकुशराव पाटील यांनी रत्नागिरी येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा कार्यालयाचे समन्वयक सिद्धेश सुभाषराव पांळद...

वय नव्हे , नव्या सुरुवातीची तयारी महत्त्वाची : ‘ आरंभ ' चा संदेश

Image
मुंबई  / रमेश औताडे  आयुष्यात नव्याने सुरुवात करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हा प्रेरणादायी संदेश देत जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे कला, अध्यात्म आणि आत्मचिंतनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारी डॉ. नलिनी दीदी (दीदी माँ) यांनी रेखाटलेल्या श्रीकृष्णाच्या आकर्षक चित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. या चित्रांमधून श्रीकृष्णाच्या विविध भावविश्वाचे दर्शन घडत असतानाच, अंतर्मनातून आलेली दृष्टी आणि सकारात्मक विचार आयुष्यभर प्रेरणा देऊ शकतात, हा संदेशही अधोरेखित झाला. याच सोहळ्यात ‘Echoes Of The Soul – Reflections For A Conscious Life’ या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. अधिक सजग, सकारात्मक आणि अर्थपूर्ण जीवनाची सुरुवात कोणत्याही क्षणी करता येते, या विचारांवर पुस्तक आधारित आहे. ‘आरंभ’—It’s Never Too Late In Life हा या कार्यक्रमाचा मध्यवर्ती विचार होता. आयुष्यात किती उशीर झाला यापेक्षा नव्याने सुरुवात करण्याची तयारी आहे का, हे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. कला, अध्यात...

जय लहुजी दहिहंडी महोत्सव ५ सप्टेंबरला

Image
मुंबई / रमेश औताडे  अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने जय लहुजी दहिहंडी महोत्सवाचे आयोजन शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी मानखुर्द साठे नगर येथे करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून मुख्य अतिथी म्हणून समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य असणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून डॉ. विनोद बाबर, अभिनेते जॉनी रावत, अभिनेत्री स्वाती माने आणि प्रबोधनकार सुनील साठे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यक्रमात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या एक हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक गांभीर्याने पाहावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. जय लहुजी दहिहंडी महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, समाजातील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारत...

सामाजिक व सांस्कृतिक वारशाचा समृद्ध पट: श्री. अरुण कृष्णाराव वाशिर्डे

Image
मुंबई / रमेश औताडे मंत्रालय प्रतिनिधी ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील ज्येष्ठ समाजसेवक श्री. अरुण कृष्णाराव वाशिर्डे यांचा वाढदिवस पार पडला. मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असलेल्या अरुणजींनी मुंबईतील गिरगाव, कुंभारवाडा व प्रार्थना समाज परिसरात आपल्या उत्तुंग सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय कार्यातून एक स्वतंत्र व आदरयुक्त ओळख निर्माण केली आहे. शिक्षण व व्यावसायिक प्रवास * शैक्षणिक पात्रता: त्यांनी एस.एस.सी. आणि एफ.वाय. सायन्स पूर्ण केल्यानंतर तंत्रशिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आय.टी.आय. डिप्लोमा (डिझेल मेकॅनिक) तसेच मेकॅनिकल ड्राफ्टमन डिप्लोमा पूर्ण केला. * उद्योग व व्यवसाय: तांत्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ते परवानाधारक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असून 'मे. युनिव्हर्सल पेस्ट कंट्रोल सर्व्हिस'चे प्रोप्रायटर म्हणून यशस्वी व्यावसायिक वाटचाल करत आहेत. कौटुंबिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अरुणजींना समाजसेवा आणि कला क्षेत्राची प्रेरणा कौटुंबिक वारशातूनच मिळाली. * वडील (कै. कृष्णाराव डी. वाशिर्डे): ते चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व दिग्गज स...