अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कारभाराचा हिशोब जाहीर करा

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कारभाराचा हिशोब जाहीर करा; 

सकल मांग गारूडी समाज कृती समितीचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

मुंबई / रमेश औताडे 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन (स्थापना: १९ जुलै १९८५) द्वारे मागील ४० वर्षांत मांग गारूडी समाजासाठी राबवण्यात आलेल्या सर्व योजनांचा वर्षनिहाय व जिल्हानिहाय संपूर्ण हिशोब सार्वजनिक करावा, या मागणीसाठी सकल मांग गारूडी समाज कृती समिती (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने श्री. सचिन आदिनाथ लोंढे यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑक्टोबर २०२१ पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

प्रमुख मागण्या आणि उपस्थित केलेले प्रश्न:

 * कर्ज व अनुदान वितरण: महामंडळ स्थापनेपासून आजपर्यंत मांग गारूडी समाजातील किती लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कर्ज मिळाले? एकूण किती रुपयांचे कर्ज व अनुदान देण्यात आले?

 * योजनांचा लाभ: बीज भांडवल, थेट कर्ज, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण व इतर शासकीय योजनांमध्ये समाजाला नेमका किती लाभ मिळाला?
 * जिल्हानिहाय आकडेवारी: संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय किती नागरिक या योजनांचे लाभार्थी ठरले?

 * निधीचा प्रत्यक्ष पुरवठा: समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण निधीपैकी प्रत्यक्षात किती निधी वितरित करण्यात आला?
 * अर्जांची स्थिती व पारदर्शकता: महामंडळाकडे आलेले किती अर्ज मंजूर झाले व किती नामंजूर झाले? अर्ज नामंजूर करण्याची कारणे काय होती?

स्थापनेपासूनच्या गेल्या ४० वर्षांतील सर्व आर्थिक व्यवहार, निधीचे वाटप व अर्जांची सद्यस्थिती प्रशासनाने लवकरात लवकर सार्वजनिक करावी, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान