मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान

नवी मुंबई ( प्रतिनिधी )

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये मेघमल्हार गृहसंकुलातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत मेघमल्हार गृहसंकुलातील रणरागिनींनी आपले कौशल्य आणि एकजूट सिद्ध केली.

या यशामध्ये विशेष योगदान देणाऱ्या भारतीताई चिकणे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढाकारामुळे गृहसंकुलातील महिलांना एकत्र येऊन आपली प्रतिभा सादर करण्याची आणि समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. त्यांच्या प्रेरणेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली आहे.

महिलांच्या मेहनतीची आणि कर्तृत्वाची घेतलेली ही योग्य दखल असून मेघमल्हार गृहसंकुलातील सर्व महिलांनी एकत्रितपणे केलेले हे यश प्रेरणादायी आहे. समाजात महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

सर्व महिलांना सलाम. 🙏

रमेश औताडे
7021777291
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा