Posts

Showing posts from August, 2026

'स्नेह पूकलम' (ओणमची फुलांची रांगोळी) कालबाह्य

Image
रेल्वेने परवानगी नाकारली यंदा सीएसटी (CST) वर 'स्नेह पूकलम' (ओणमची फुलांची रांगोळी) होणार नाही मुंबई / रमेश औताडे  दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) च्या गजबजलेल्या आवारात यंदा ओणमच्या फुलांचा सुगंध दरवळणार नाही. २०१५ पासून मुंबईतील ओणमच्या उत्सवाला आपल्या रंगीबेरंगी रूपाने बहर आणणाऱ्या या भव्य 'महा पूकलम'ला (फुलांची रांगोळी) रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव यंदा परवानगी नाकारली आहे. लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेली आणि 'स्नेह पूकलम' (प्रेमाची फुलांची रांगोळी) म्हणून ओळखली जाणारी ही उत्सवकालीन कलाकृती यंदा केवळ आठवण म्हणून उरेल. ओणमची ही फुलांची रांगोळी केवळ मल्याळी समाजाचा सण साजरा करण्यापुरती मर्यादित नव्हती. २००८ मधील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सीएसटी येथे प्राण गमावलेल्यांना ती फुलांच्या माध्यमातून वाहिलेली श्रद्धांजली होती, तसेच शांततेचा एक प्रभावी संदेशही होता. धर्म आणि भाषेच्या भिंती ओलांडून लोकांना एकत्र आणल्यामुळेच तिने 'स्नेह पूकलम' म्हणून मुंबईच्या सांस्कृतिक जी...

आरोग्य विभागातील अन्यायाविरोधात आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १६७५ कर्मचारी डी.एस इन्टरप्रायजेस या कंपनी मार्फत गेली दहा वर्षे झाले, डॉक्टर, नर्स, फार्मसी , लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अटेडन्ट ह्या पदावर  कर्मचारी हे आरोग्य विभागात आपली सेवा बजावीत आहेत. मात्र त्यांच्या प्रलंबित मागण्या अद्याप सुटल्या नसल्याने त्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. दीपक चव्हाण, प्रतीक्षा भागवत, प्रवीण चव्हाण, गिरीश सुर्वे, रेश्मा कोचले, परेश मटकर, प्रणाली जठार, माया केदार, हिरामण बनगारे इतर महिला पुरुष यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,  वार्षिक वेतनवाढ मिळावी, भरपगारी प्रसुती रजा मिळावी, सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) मिळावा, कर्मचाऱ्यांना पी एफ मिळावा, कर्मचाऱ्यांना ई एस आय सी  मिळावा, वार्षिक सुट्टया मिळाव्यात, ठेकेदारी पद्धत रद्द करुन शासकीय सेवेत समावेश करणे, स्पर्श प्रणाली च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा, बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ एक नवीन विधेयक सभागृहात मांडण्यात याव...

शिक्षा बचाओ संगठन चे आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  शिक्षण विभागातील कथित गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ‘शिक्षा बचाओ संघटने’चे अध्यक्ष डी. आर. सिंह यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आदर्श भूतपूर्व सैनिक हिंदी हायस्कूलच्या मुख्याध्यापक मान्यता प्रकरणासह संस्था हस्तांतरण, बोगस जावक क्रमांक, शिक्षकांचे प्रलंबित वेतन, TET गैरप्रकार आणि २० टक्के अनुदानाच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषद व नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे विशेष प्रशासकीय ऑडिट करावे तसेच सर्व प्रकरणांत जबाबदारी निश्चित करून ३० दिवसांत लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करून आम्हाला आनंद होत नाही उलट आमचा वेळ जातो. सरकारने कोणत्याही घटकाला आंदोलन करण्यात भाग पाडू नये. ज्या राज्यांमध्ये ज्या देशांमध्ये आंदोलन होत असे तर ते सरकारचे अपयश आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करावा असे डी आर सिंह म्हणाले.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा धगधगती मुंबई तर्फे सन्मान

Image
 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा धगधगती मुंबई तर्फे सन्मान मुंबई / रमेश औताडे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोगाव येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करून राज्य पातळीवर आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्र परिवार आणि संत रोहिदास मित्र मंडळ, घोगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करणाऱ्या सौ. सविता सचिन राजमाने मॅडम यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य वसंत धुळपसर आणि ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत भंडारे, शिक्षक बाजीराव शेटे, दत्तात्रय कुंभार, राहुल पावले, तसेच घोगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकर पाटील आबा, उपसरपंच निवास शेवाळे, बाजीराव तांबेकर, पोलीस पाटील शिवाजी भावके, जगताप सर, संत रोहिदास मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष गोविंद धुळप, विकास साळुंखे, नारायण साळुंखे, ग...

अचूक विम्यासाठी आता एआय चा वापर

Image
मुंबई / रमेश औताडे  इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सने व्यवसायातील विविध प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ए आय वापर वाढविण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्सची निवड केली आहे. या तंत्रज्ञानामुळे विक्री प्रक्रिया अधिक वेगवान, कामकाज सुलभ आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. एजंटफोर्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद, विमा प्रस्तावांचे मूल्यांकन, ग्राहक सेवा आणि क्लेम प्रक्रियेत एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. इंडियाफर्स्ट लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रुशभ गांधी यांनी सांगितले की, डिजिटल परिवर्तनामुळे विक्री प्रक्रियेत सुधारणा झाली असून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला झाला आहे. सेल्सफोर्स साऊथ एशियाचे अध्यक्ष व सीईओ अंशुमती भट्टाचार्य यांनीही एआयच्या मदतीने विमा व्यवसाय अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

दिव्यांग शाळांच्या अनुदानासाठी डॉ. जितेंद्र ओव्हाळ आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे  ( मंत्रालय प्रतिनिधी )  दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे. शासनाने अनुदानाचे धोरण जाहीर केले असेल, तर त्या धोरणानुसार पात्र ठरलेल्या सर्व दिव्यांग शाळांची अंतिम यादी पारदर्शकपणे जाहीर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत कोणाला अधिकार देण्यात आला आहे ? कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग  कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही. अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून र...

खाजगी हितसंबंधात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

Image
            तीव्र आंदोलनाचा बाळासाहेब मिरजे यांचा इशारा मुंबई / रमेश औताडे  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ सेक्टर १४ येथील विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अद्यापही पालिकेकडून कोणताही अधिकृत माहिती फलक न लावल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मोकळ्या भूखंडासमोर रिजसी नावाचा मोठा  टॉवर आहे. या टॉवरमधील घरांची विक्री सुरळीत व्हावी आणि ग्राहकांचा विरोध होऊ नये, यासाठीच प्रशासन जाणूनबुजून स्मशानभूमीचा अधिकृत बोर्ड लावण्यास व बांधकामास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. स्मशानभूमीचे आरक्षण स्पष्ट असतानाही पालिकेकडून होत असलेल्या या दिरंगाईविरोधात आरपीआयच्या वतीने महापालिका आयुक्त व संबंधित विभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून १५ दिवसांचा अंतिम इशारा देण्यात आला आहे. विकास आराखड्यानुसार ...

Nodwin Gaming Announces ‘SpaceFest’

Image
Nodwin Gaming Announces ‘SpaceFest’ A unique festival dedicated to space, science, and science fiction—organized for the first time in collaboration with the Government of Maharashtra Mumbai / PR News Media Network Ramesh Autade Nodwin Gaming, a global leader in new-age entertainment, gaming, and e-sports, announced the launch of ‘SpaceFest’ at a press conference held at the Trident Hotel in Mumbai. Organized in collaboration with the Government of Maharashtra, this event marks one of India’s first large-scale festivals dedicated to space, science, innovation, and space-themed pop culture. The festival aims to bring knowledge and entertainment together on a single platform. Several dignitaries attended the press conference, including Dr. Uday Samant, Hon. Minister of Industries, Investment, and Services; Dr. P. Anbalagan (IAS), Principal Secretary, Industries, Investment, and Services Department, Government of Maharashtra; Mr. Deependra Singh Kushwah (IAS), CEO of MIDC Mumb...

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर मनोज म्हात्रे

Image
मुंबई / रमेश औताडे  भाजप ओबीसी मोर्चाच्या संघटन विस्तारात मनोज म्हात्रे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी म्हात्रे यांची 'महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य' तसेच 'मुंबई संपर्क प्रमुख' या पदांवर नियुक्ती केली आहे. आपल्या निवडीबद्दल बोलताना मनोज म्हात्रे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील. प्रामुख्याने ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि इतर सोयी-सुविधा पोहोचवणे, 'महाज्योती'च्या विविध उपक्रमांचा तळागाळातील घटकांना लाभ मिळवून देणे, मोफत MPSC व UPSC प्रशिक्षणाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती आणि फेलोशिप योजनांचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मदत करणे या विषयांवर ते भर देणार आहेत. या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल भाजप नेते महेश शेट्ये यांनी मनोज म्हात्रे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...

राष्ट्रवादी पत्रकार, निर्भीड संपादक आणि नाट्याचार्य --- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

Image
                          - प्रा. हेमंत सुधाकर सामंत - ‘कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर’ हे आधुनिक मराठी साहित्य, पत्रकारिता, नाटक आणि राष्ट्रवादी विचार विश्व यावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. नाटककार, पत्रकार, संपादक, राजकीय विचारवंत आणि समाजप्रबोधक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या लेखणीमध्ये राष्ट्र प्रेम, स्वराज्याची आकांक्षा, सामाजिक जागृती आणि अन्याया विरूद्धचा संघर्ष यांचा संगम दिसतो. विशेषतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या सहवासातून त्यांच्या पत्रकारितेला राष्ट्रवादी धार प्राप्त झाली. वृत्तपत्र आणि रंगभूमी या दोन्ही माध्यमांचा उपयोग जनजागृतीसाठी करता येतो, हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच खाडिलकरांचे जीवन केवळ साहित्यिकाचे जीवन न राहता ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वैचारिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग बनले. उपलब्ध अधिकृत मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी ‘सांगली’ येथे झाला आणि २६ ऑगस्ट १९४८ रोजी त्यांचे निधन झाले.  खाडिलकरां...

राष्ट्रीय शेअर बाजारात कृषी फलोत्पादन , सिंचन प्रक्रिया परिषद आणि प्रदर्शन संपन्न

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या (एमएसएमजीए) वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त मुंबई येथील राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, मार्केटिंग, कोल्डचेन व वेअर हाऊसिंग परिषद आणि सिद्धेश्वर ॲग्रोटेक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एमएसएमजीए अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले की, शेतकरी हवामान बदलाचा सामना करत आणि मोठा खर्च करून उत्पादन घेतो, परंतु सक्षम विपणन (मार्केटिंग) व्यवस्थेअभावी तो निष्प्रभ ठरतो. शेतकऱ्यांना सक्षम मार्केटिंग मिळवून देण्यासाठी एनएससी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंबा उत्पादकांचे नुकसान व ईसीजीसीचे सहकार्य: यावर्षी आंब्याचे उत्पादन केवळ १५ ते २० टक्केच आले. एकूण उत्पादनापैकी १५ टक्के आंबा निर्यात होतो, ज्यातील ५० टक्के निर्यात मध्यपूर्व (मिडल ईस्ट) देशांत होते. मात्र अमेरिका-इझरायल विरुद्ध इराण युद्धामुळे ही निर्यात ठप...

पर्यावरण संरक्षण देशाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक ---सरश्री अशोक एन. जे.

Image
मुंबई / रमेश औताडे  पर्यावरण संरक्षण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून देशाच्या भविष्यासाठीची अत्यावश्यक गरज आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ महाअभियान’ अंतर्गत ठाण्यात ‘युवा अभिनंदन पर्यावरण प्रभात फेरी’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ठाणेकरांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ​नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालय, विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि बांदोडकर महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी या प्रभात फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा ठाम संदेश दिला. ​उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकासाची जाणीव करून देणारे फलक हातात घेतले होते.  ​यावेळी सरश्री अशोक एन. जे. यांनी युवकांचे कौतुक करताना सांगितले की, "आजच्या युवकांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली, तरच येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भारत घडविता येईल." प्रभात फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील आकर्षक आणि आशयपूर्ण फ...

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आठवण क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले संघर्ष नायकाची --

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मंत्रालय प्रतिनिधी रमेश औताडे  क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त  त्यांच्या कार्यावर छोटासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.मातंग समाजात चिखली गांव, तालुका अमदपूर, जिल्हा - लातूर या खेडेगावांत ७ मे १९५३ साली बाबासाहेब गोपले यांचा जन्म माता समिंद्रा व पिता सिताराम गोपले यांच्या पोटी झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावाशेजारी केंद्रेवाडी येथे झाले. नंतर ते आंबेजोगाई येथे काही दिवस शिकले. नंतर परभणी येथे काही दिवस राहिले आणि कॉलेज अमदपूर येथे झाले. त्यानंतर ते मुंबईला आले व मुंबईत राहत असतांना समाजाचे दारिद पाहवेना असे झाले आणि बाबासाहेब गोपले यांनी अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली, लहुजी नगर, महुने, ता. कल्याण, जिल्हा- ठाणे येथे पहिली शाखा उघडली. १७ जानेवारी १९८२ साली तेथेच 'जगेन तर समाजासाठी व मरेन तर समाजासाठी' अशी घोर प्रतिज्ञा करून आपल्या संघर्षमय चळवळीला सुरुवात केली. मोर्चे, धरणे, आंदोलन चालू झालेत. २८ मार्च १९८३ साली हुतात्मा चौक, मुंबई येथे बाबासाहेब गोपले यांनी आमरण...

कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या पाठपुराव्याला यश

Image
मुंबई / रमेश औताडे  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे जिल्ह्यातील कळमोडी उपसा जलसिंचन योजनेचा फेर जलनियोजन प्रस्ताव महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचेकडे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने मान्यतेसाठी सादर केला आहे. जलसंपदा विभागाने कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांना लेखी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे.  कळमोडी उपसा जलसिंचन योजनेमध्ये खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर, पुर, वाफगाव, वरूडे या गावातील १२५२ हेक्टर व पश्चिम भागातील कुडे बुद्रुक,एकलहरे येथील ३०५ हेक्टर असे एकुण १५५७ हेक्टर वाढीव क्षेत्र प्रस्तावित केले आहे. आठ महिने पिक रचनेनुसार फेर जलनियोजन करण्यात आले आहे. कळमोडी धरणाचे १.०७ टीएमसी पाणी चासकमान धरणासाठी व ०. ८७ टीएमसी पाणी उपसा योजनेसाठी राखीव आहे. शासनाने  वाढीव गावांसह सुप्रमा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत परिगणके अंतिम करण्यात आली असून अंदाजपत्रक मान्यतेसाठी राज्य तांत्रिक  सल्लागार समिती -२ यांना सादर केल्याचे भामा आसखेड धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नि.सं.लगड ...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील भालेराव

Image
मुंबई / रमेश औताडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते सुनील भालेराव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यातील मातंग समाजासह सर्व समाजामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. या उत्सवाचे नियोजन जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात येते. यंदा प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याला सर्वानुमते अध्यक्षपदाची संधी देण्यात आल्याने या नियुक्तीचे स्वागत होत आहे. सुनील भालेराव हे सर्वसमावेशक, मितभाषी आणि ठाण्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले असून, विविध मोर्चे, जयंती उत्सव तसेच सामाजिक शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे. तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची संधी मिळाल्याने समाजातील तरुणांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. यंदाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव ३० ऑगस्ट २०२६ रोजी गडकरी...

नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जीवघेणा खेळ नको

Image
      घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा पुन्हा मागवा नवी मुंबई / रमेश औताडे नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे भविष्यात गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुन्हा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी या प्रकरणी निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असताना निविदा प्रक्रियेतील अटी, पात्रता आणि कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच सार्वजनिक निधीच्या योग्य वापराचा विचार करून निविदा नव्याने मागविण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. तुर्भे परिसरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जात असल्याने त्याचा पर्यावरणावर आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर...

आश्रमशाळेतील सेवाविषयक वादावरून आमरण उपोषण

Image
आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी मुंबई / रमेश औताडे आदिवासी अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेतील सेवाविषयक वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक श्री. विनोद हुप्पा थोर यांनी सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. खानेदेश्वर कन्या स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, श्रीपूर, ता. बार्शी, जि. सोलापूर या संस्थेच्या आश्रमशाळेशी संबंधित हा वाद असल्याचे उपोषणाच्या फलकावर नमूद करण्यात आले आहे. विभागीय चौकशी समितीने केलेल्या चौकशीत वेतनासंदर्भातील प्रकरणावरून संबंधित अधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संस्थेने सेवेतून कमी करण्याची कारवाई केल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आयुक्त नाशिक तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणात आदेश दिले असतानाही संस्थेने त्या आदेशांचे उल्लंघन केले. मात्र आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाकडून संस्थेविरुद्ध अपेक्षित कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांनी संबंधित प्रकरण...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या दहा वर्षांच्या मंत्रीपदपूर्तीनिमित्त बाळासाहेब मिरजे यांच्याकडून स्वागत

Image
मुंबई / रमेश औताडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात आर पी आय महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान मिरजे यांनी आठवले यांना मंत्रीपदाच्या दहा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक, राजकीय तसेच विविध जनहिताच्या विषयांवरही चर्चा झाली. रामदास आठवले यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीचा आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आठवले यांचे अभिनंदन केले.

भारतीय अस्मिता पार्टी मुळे 5 ऑगस्ट 2026 शासन निर्णय मधील अनेक नियम रद्द

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  *विद्यार्थांच्या आंदोलनास भारतीय अस्मिता पार्टी ची साथ..* राज्यात शासन निर्णय क्र. आवगृ -1325/प्र. क्र.154/का.12 दिनांक : 5 ऑगस्ट 2026 रोजी च्या शासन निर्णय ने राज्यात विद्यार्थांच्या हक्कावर गदा आली होती अनेक बंधने मुलावर लादली गेली होती.  त्यावर राज्यात विद्यार्थी वर्गाने तो निर्णय रद्द व्हावा म्हणून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनि आंदोलने सुरू केली होती, परंतु शासन निर्णय रद्द करणे शक्य नाही ही बाब लक्षात येताच भारतीय अस्मिता पार्टी ने दिनांक :13 ऑगस्ट 2026 रोजी सुधारित निर्णय काढणे बाबत शासनाला पुरावे समवेत प्रस्ताव सादर केला  त्यावर शासनाने देखील तात्काळ दखल घेत शासन निर्णय क्रमांक : आवगृ -1325/प्र. क्र.154 का.12 दिनांक : 14 ऑगस्ट 2026 रोजी शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधांमध्ये सुसूत्रता आंननेबाबत एकत्रित सुधारित नियमावली जाहीर केली आहे दिनांक : 14 ऑगस्ट 2026 च्या शासन निर्णय मध्ये पुढील सुधारणा झाल्या. *परिशिष्ट अ. मध्ये* 1) वसतिगृहातील विद्यार्थांचे वय 26 वर्ष वरून 30 वर्ष केले.2)मुलीं...

मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे.

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाने २०२६-२७ या वर्षात ३,००० कोटी रुपयांच्या संभाव्य तुटवड्याचा जो इशारा दिला आहे, तो केवळ आकडा नाही तर याला जबाबदार मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या ठेकेदार धार्जिणा अट्टाहास. गेल्या आठ वर्षांत साचलेला एकूण ९,२८६ कोटींचा तोटा हा नैसर्गिक नसून, तो 'वेट लीज' खासगीकरण मॉडेलमुळे पद्धतशीरपणे खणलेला खड्डा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आपल्याच बससेवेला संपवण्याचा डाव आखतेय, ही ३१ लाख मुंबईकर प्रवाशांसाठी अत्यंत संतापजनक बाब आहे. २०१८ मध्ये बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या ३,२०० बस ताफ्यात होत्या, आज ती संख्या २४९ वर कशी आली? ३१ लाख मुंबईकरांना रोज वेठीस धरणारे आणि नफेखोरी करणारे खासगी कंत्राटदार प्रशासनाचे इतके लाडके का? स्वतःच्या बस खरेदी करायला पालिकेकडे पैसे नाहीत, पण 'ब्युटीफिकेशन'च्या नावाखाली हजारो कोटींची उधळण करायला पैसे कुठून येतात? कंत्राटदारांच्या बस रोज रस्त्यात बंद पडतायत, अपघात होतायत, कर्मचाऱ्यांचे शोषण होतं...

पथविक्रेता योजना अंमलबजावणीला गती द्यावी - महापौर रितू तावडे

Image
मुंबई / रमेश औताडे  शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरांवरील प्राथमिक तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादिशेने कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी दिले आहेत. तसेच, पथविक्रेता योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौरांनी विविध सूचना देखील केल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज संदर्भात मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक १४ ऑगस्ट २०२६) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, उपआयुक्त  चंदा जाधव, उपआयुक्त सर्वश्री विश्वास मोटे, संतोषकुमार धोंडे, मनीष वळंजू, अनुज्ञापन अधीक्षक  अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज विषयक अद्ययावत माहिती महानगरप...

ठाण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’

Image
ठाणे : रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इको फ्रेंडली लाइफ (EFL) संस्थेच्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’ आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ अभियान’ या व्यापक संकल्पनेशी जोडलेल्या या उपक्रमात ‘एक कुटुंब – एक शक्तिस्थळ’ हा संदेश देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी आणि स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धनाचे केंद्र उभारावे, या विचाराला अभियानातून प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरात वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्याच्या उद्देशाने ७०० कोटी वृक्षांचे अभियानात्मक उद्दिष्ट मांडण्यात आले आहे. संस्थेचे प्रेरणास्थान सर श्री अशोक एन. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभात फेरीला शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत तलाव पाळी, जांभळी नाका, ठाणे येथून सुरुवात होणार आहे. युवकांस...

सफाई कामगारांना ‘स्वयंसेवक’ म्हणता येणार नाही

Image
           औद्योगिक लेबर कोर्टाचा पालिकेला सवाल मुंबई / रमेश औताडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दुर्गंधीयुक्त कचरा, घाण आणि अस्वच्छता दूर करून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना केवळ ‘स्वयंसेवक’ म्हणून संबोधता येणार नाही, त्यांना कामगार दर्जा मिळावा असे निरीक्षण औद्योगिक लेबर कोर्टाने नोंदविल्याची माहिती समोर आली आहे. हे कामगार प्रत्यक्षात कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच नियमित स्वरूपाचे काम करीत आहेत. मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्यापासून ते विविध स्वच्छता कामांपर्यंतची जबाबदारी ते पार पाडतात. या कामावरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना ‘स्वयंसेवक’ म्हणणे योग्य आहे का, असा प्रश्न न्यायालयाने पालिकेसमोर उपस्थित केला आहे. सफाई कामगार नेते अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन चे अध्यक्ष मोहन पी आर देवेंद्र यांनी न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. कामगारांच्या कष्टाचे चीज झाले असून आता हे कामगार कायम कामगार होणार आहेत. त्यामुळे ...