लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील भालेराव

मुंबई / रमेश औताडे

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते सुनील भालेराव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यातील मातंग समाजासह सर्व समाजामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे महानगरपालिकेमार्फत दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. या उत्सवाचे नियोजन जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात येते. यंदा प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याला सर्वानुमते अध्यक्षपदाची संधी देण्यात आल्याने या नियुक्तीचे स्वागत होत आहे.

सुनील भालेराव हे सर्वसमावेशक, मितभाषी आणि ठाण्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले असून, विविध मोर्चे, जयंती उत्सव तसेच सामाजिक शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे. तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची संधी मिळाल्याने समाजातील तरुणांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

यंदाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव ३० ऑगस्ट २०२६ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार असून, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महापुरुषांच्या विचारांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, मातंग समाजाचे आमदार अमित गोरखे, भाजपचे संजय केळकर, निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदार व नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती मातंग समाजाचे वरिष्ठ समन्वयक राजू मानकर यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश