Posts

Showing posts from February, 2026

मुंबईत ७-८ मार्च रोजी होणार दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्ष संवर्धन परिषद

Image
"Growing Cities – Greener Canopies" या थीमवर जागतिक तज्ञ एकत्र येणार मुंबई / रमेश औताडे  जलद शहरीकरणाच्या या काळात वृक्ष हे केवळ सजावटीचे घटक नसून हवामान बदलाशी लढण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे सहयोगी आहेत. या संदेशासह मुंबईत दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्ष संवर्धन परिषद (ATCA 2026) आयोजित करण्यात येत आहे. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी ही परिषद ७ आणि ८ मार्च, २०२६ रोजी हॉटेल सहारा स्टार, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे, अध्यक्ष संजय पांडे, ATCA चे संचालक वैभव राजे आणि नुकुल सवानी उपस्थित होते. परिषदेचे उद्दिष्ट ATCA चे संचालक वैभव राजे यांनी सांगितले, "जलद शहरीकरणामुळे वृक्ष संरक्षण आणि काळजीकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकार, महानगरपालिका आणि स्थानिक संस्थांनी वृक्...

कर्मवीर अजित दादा पवार यांचे कृषी क्षेत्राचे स्वप्न लोक विद्यापीठ, शेतकरी संचालक विस्तार व कृषी विज्ञान केंद्र स्थापनेतून साकार करणार.... डॉ मंगेश देशमुख

Image
मुंबई / रमेश औताडे भारत सरकार, कृषिमंत्रालय, नवी दिल्ली द्वारा देशात Agriculture Technology Management Agency, Atma हा सामाजिक उपक्रम, जिल्ह्याचे जिहकाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपाध्यक्ष आत्मा, सचिव प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा स्तरावर उत्तम असे कृषी व ग्रामीण विकासाचे सन २०१२ पासून प्रभावीपणे कार्य सुरू आहे. *Artificial Intelligence for Agriculture क्षेत्रात प्रभावी यशस्वीता प्राप्त करण्यासाठी लोक विद्यापीठाने आत्मा या सामाजिक संस्था चे मदतीला Farmers Power of Thinking and Motivational Training चे माध्यमातून, मानसिक परिवर्तना चे प्रशिक्षणातून अनेक संचालक विस्तार यांना सक्षम केले आहे, आणि त्यातील उत्सुक शेतकरी यांना इच्छा नुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा सोबत आजीवन कृषि व ग्रामीण क्षेत्रात सामाजिक काम करणे साठी, संचालक विस्तार Director Extension अशी पदोन्नती नियुक्ती देऊन छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा या सामाजिक संस्था याला समन्वय करून दिले आहे. *आज राज्यात ५५० संचालक विस्तार ह...

यादव जी की लव्ह स्टोरी चित्रपटाविरोधात मोर्चाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र करणी सेनाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी ‘यादव जी की लव्ह स्टोरी’ या हिंदी चित्रपटाविरोधात २७ फेब्रुवारी रोजी सेन्सॉर बोर्डावर मोर्चा काढण्याचा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. या वेळी राज्य प्रवक्ते शैलेश पन्नालाल यादव, सुभाष चंद्र यादव, किरण सोनवणे, अंबिका प्रसाद यादव आदी उपस्थित होते. चित्रपटात यादव समाजाचे व भगवान श्रीकृष्ण यांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटामुळे हिंदू धर्म व यादव समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगितले. संबंधित चित्रपटाच्या निर्माता संदीप तोमर, दिग्दर्शक अंकित भडना, अभिनेत्री प्रगती तिवारी व अभिनेता विशाल मोहन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.  २७ फेब्रुवारी रोजी विविध हिंदू संघटनांच्या सहभागातून सेन्सॉर बोर्डावर मोर्चा काढण्यात येणार असून राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला. सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून चित्रपटावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.

स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन च्या आंदोलनास यश

Image
मुंबई / रमेश औताडे  आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांनी आदोलन केले नंतर  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांने स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनासाठी ५ कोटी रूपसे निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली.  पाणी पुरवठा व स्वच्छता शासकीय कर्मचारी राज्य कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. शासन सेवेत कायम करणे बरोबर थकीत वेतन व इतर  विविध मागण्या करणेत आले होते.  मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे सचिव , अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग,  अभियान संचालक  जलजीवन मिशन, अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण उपस्थित होते. या बैठकीत मुख्य सचिव यांचे बैठकीत न्यायप्रविष्ठ असलेले व न्यायालयाने निवाडे दिलेले कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत शासन सेवेत कायम करणे साठी समिती गठित करणेचा शासन निर्णय का...

बीकेटीने ऑन-हायवे टायर पोर्टफोलिओसह भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेश

Image
मुंबई / रमेश औताडे  बाळकृष्‍ण इंडस्‍ट्रीयल लिमिटेड (बीकेटी) या ऑफ-हायवे टायर (ओएचटी) विभागातील जागतिक अग्रणी कंपनीने आज आपला ऑन-हायवे पोर्टफोलिओ लाँच करत भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली. आपल्‍या ओएचटी नेतृत्‍वापलीकडे धोरणात्‍मक विस्‍तारीकरण करत बीकेटीने दुचाकी (स्‍कूटर्स व मोटरसायकल्‍स) आणि मीडियम अँड हेवी कमर्शियल वेईकल्‍स (एमअँडएचसीव्‍ही)साठी उद्देशासह डिझाइन करण्‍यात आलेली उत्‍पादने सादर केली, ज्‍यामधून भारतातील झपाट्याने वाढत असलेल्‍या ग्राहक व रिप्‍लेसमेंट टायर विभागांप्रती त्‍यांची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते. यासोबत कंपनीने आपली राष्‍ट्रीय ब्रँड मोहिम *'एलीव्‍हेट युअर ड्राइव्‍ह* ' देखील लाँच केली, ज्‍यामध्‍ये ब्रँड अॅम्‍बेसेडर *रणवीर सिंग* आहेत. या मोहिमेसह कंपनीने आपला ग्राहक ब्रँड प्रवास सुरू केला आहे, जेथे स्‍वदेशी विकसित जागतिक टायर उत्‍पादकासाठी नवीन अध्‍याय दिसून येतो *नवीन ब्रँड चॅप्‍टर: बीकेटी टायर्स आणि बीकेटी कार्बन :* आपली एकात्मिक ब्रँड ओळख *'बीकेटी - ग्रोईंग टूगेदर'* अंतर्गत कंपनीने दोन विशिष्‍ट ओळखीसह नवीन ब्रँड ...

पुढील तीन वर्षांत देशातील प्रत्येक शहरात 'भारत टॅक्सी' उपलब्ध होईल

Image
रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  नवी दिल्लीच्या त्या दुपारी एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या टॅक्सी चालकांमध्ये एक साधा पण मोठा विचार पुढे येत होता – जो मेहनत करतो तोच नफ्याचा खरा हक्कदार असावा. ही केवळ साधी बैठक नव्हती, तर नव्या विचारांच्या बदलाची सुरुवात होती. सहकारी संस्थांचे खरे योद्धा अमित शहा यांच्या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी एक सरळ प्रश्न होता – रस्त्यावर दिवस-रात्र कष्ट करणारा माणूस फक्त कमिशनवरच का जगावा? तोच मालक का होऊ नये? आणि इथूनच ‘ड्रायव्हर’पासून ‘सारथी’ होण्याची कहाणी सुरू होते. अमित शहा यांनी मांडलेल्या विचारांमध्ये ‘ड्रायव्हर’ या शब्दाऐवजी ‘हा शब्द वापरण्याचा निर्णय होता. हा केवळ शब्द बदल नव्हता, तर चालकांना सन्मान, स्वाभिमान आणि भागीदारीची देण्याचा सकारात्मक प्रयत्न होता. रस्त्यावर घाम गाळणारा व्यक्ती केवळ सेवा देणारा नसून, तो व्यवस्थेचा भागीदार आणि स्वाभिमानाने उभा असलेला मालक असावा – हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अंत्योदयाची भूमिका मांडणारे अमित शहा यांच्या परिकल्पनेतील ‘भारत टॅक्सी’ ही कोणत्याही खासगी क...

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे आझाद मैदानात आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यातील संगणक परिचालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, कायमस्वरूपी दर्जा आणि आवश्यक सुविधा, यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे सुधारित आकृतीबंध राबवून कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावे, मानधनात वाढ किमान १७ हजार रुपये करण्यात यावे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. मयूर कांबळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संतोष कुडले आदी पदाधिकारी उपस्थित होते  कायमस्वरूपी नोकरीची हमी देऊन कंत्राटी कामगारांप्रमाणे सर्व लाभ व सुविधा लागू कराव्यात, अनेक ग्रामपंचायतींमध्ये १४ वर्षांपूर्वी दिलेले संगणक व इतर साहित्य खराब झाल्याने  प्रत्येक ग्रामपंचायतीला नवीन संगणक, प्रिंटर व आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, महिला संगणक परिचालकांना मानधनासह प्रसूती रजा देण्याची तसेच सर्व संगणक परिचालकांसाठी किमान ५० लाख रुपयांचा अपघाती व आरोग्यविषयक विमा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रकारांच्या सुविधासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार -खासदार श्रीरंग बारणे

Image
पत्रकारांसाठी कर्जत येथे पत्रकार भवन उभारणार -आमदार महेंद्र थोरवे  कर्जत येथे राज्यस्तरीय पत्रकार संघ पुरस्कार सोहळा संपन्न  मुंबई / पी आर न्यूज  पत्रकारांच्या विविध सेवा,, प्रवास योजना यासाठी दिल्लीच्या केंद्र स्तरावर आपण प्रयत्न करत असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत येथील पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्त वक्तव्य केले. तर कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी तालुका कार्यक्षेत्रात  पत्रकार भवन उभारणार असल्याचे व्यक्त्यव्य  कर्जत येथे केले. पत्रकारांनी आपली शोध पत्रकारिता अखंड चालू ठेवायला हवी मात्र यात आपण कमी पडलो त्याचा फायदा पुढारी नेते घ्यायला लागतात.  पत्रकारांनी जे जे नवीन  साधन येईल ते ते शिकायला हवे. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे योगदान भरीव आहे त्यासाठी एस एम देशमुख यांचे प्रयत्न अफाट आहेत असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत देसाई यांनी येथे सांगितले. मराठी पत्रकार परिषदेचे यापुढील अधिवेशन उदगीर तालुका येथे एप्रिल महिन्यात होणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यातून आपण सातशे पेक्षा जास्त पत्रका...

एसटी'च्या स्मार्ट कार्ड सक्तीविरोधात दिव्यांगांचा एल्गार

Image
    युडीआयडी कार्ड असताना अतिरिक्त भुर्दंड कशासाठी            ज्ञानदेव भिमराव कदम (दिव्यांग नागरिक ) मंत्रालय प्रतिनिधी पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दिव्यांग प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या 'वेगवान सुरक्षित (NCMC) स्मार्ट कार्ड' सक्तीविरोधात आता राज्यातील दिव्यांग नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र शासनाने दिलेले वैध युडीआयडी (UDID) कार्ड असतानाही एसटी महामंडळाने वेगळे स्मार्ट कार्ड काढण्याची अट लादणे, हा 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६' चा भंग असल्याचा आरोप सांगली येथील दिव्यांग नागरिक ज्ञानदेव कदम यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दिव्यांग कल्याण आयुक्तांना निवेदन पाठवून सदर योजना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नेमका आक्षेप काय? एसटी महामंडळाने दिव्यांग प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी नवीन स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे. यासाठी १९९ रुपये शुल्क आकारले जात असून, त्यात ठराविक रक्कम डिपॉझिट आणि रिचार्ज...

राज्यभरातून अरुण दळवी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

Image
     राष्ट्रीय सरपंच नेते अरुण दळवींच्या लढ्याला यश     राज्यभरातून अरुण दळवी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव मुंबई / रमेश औताडे  मंत्रालय प्रतिनिधी राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपत आहे, त्या ठिकाणी आता बाहेरील सरकारी अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंचांनाच 'प्रशासक' म्हणून नियुक्त करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे गावपातळीवरील प्रशासकीय कामात खंड पडणार नसून, स्थानिक विकासकामांना गती मिळणार आहे. काय आहे सरकारचा नवा निर्णय? यापूर्वीच्या निर्णयानुसार, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय अधिकारी नेमले जाणार होते. मात्र, अधिकाऱ्यांची कमतरता आणि स्थानिक प्रश्नांची जाण नसल्याने प्रशासकीय अडथळे येण्याची शक्यता होती. आता नव्या निर्णयानुसार:  * सरपंचच प्रशासक: मुदत संपण्याच्या दिवशी जे सरपंच पदावर असतील, त्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती होईल.  * प्रशासकीय समिती: सरपंचांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांची एक समिती स्थापन केली जाईल.  * कालावधी: ही नियुक्ती सहा महिने ...

देशाची पारंपारिक पाली भाषा संवर्धनासाठी व इतर मागण्यासाठी चेतन देढिया यांचा पुढाकार

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष चेतन देढिया यांनी मुंबई विद्यापीठात पाली भाषेच्या प्रचारासाठी गेल्या ६ महिन्यांपासून संपावर असलेले राजेश बलखंडे यांची भेट घेतली. आयोगाचे उपाध्यक्षांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी बैठक बोलावली, ज्यामध्ये मुंबई पोलिस झोन ८ चे डीसीपी मनीष कलावनिया, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य गुलाम रसूल शेख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारंडे आणि याचिकाकर्ते राजेश बलखंडे उपस्थित होते. राजेश बलखंडे यांनी उपाध्यक्ष चेतन देध्या यांना सांगितले की, मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी एक मजला राखीव ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे कारण ती देशाची पारंपारिक भाषा आहे जेणेकरून तिचा प्रचार करता येईल असे त्यांनी सांगितले. राजेश बलखंडे यांनी उपाध्यक्ष चेतन देढिया यांना सांगितले की, मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी एक जागा राखीव ठेवावी अशी त्यांची इच्छा आहे, कारण ती देशाची पारंपारिक भाषा आहे, जेणेकरून तिचा प्रचार करता येईल.  विद्यापीठात समाजातील लोकांसाठी वसतिगृह बांधले पाहिजे आणि पाली भाषेचा समावेश अनुदानित वर्गात करावा...

देवापूर येथे नैसर्गिक गूळ आणि गुळजन्य पदार्थांच्या विक्रीचा उद्या थाटात शुभारंभ

Image
मुंबई / रमेश औताडे  आजच्या रासायनिक युगात आरोग्याप्रति जागरूकता वाढत असताना, सेंद्रिय शेतीतील प्रयोगांना बळ देण्यासाठी देवापूर येथे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. कृषिभूषण उद्धवराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली, सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या उसापासून तयार केलेल्या नैसर्गिक गूळ आणि विविध गुळजन्य पदार्थांच्या विक्रीचा शुभारंभ सोहळा उद्या, रविवार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. शुभारंभाचे तपशील  * वेळ: सकाळी ठीक ९.०० वाजता.  * ठिकाण: देवापूर.  * प्रमुख उपस्थिती:  कृषिभूषण उद्धवराव बाबर (सेंद्रिय शेती, महाराष्ट्र राज्य) आरोग्यदायी उत्पादनांची मेजवानी केवळ साखरेला पर्याय म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी पोषक अशा शुद्ध सेंद्रिय उत्पादनांची मोठी श्रेणी या निमित्ताने ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील उत्पादनांचा समावेश असेल:  * नैसर्गिक गूळ आणि गुळ पावडर  * काकवी (तरल गूळ)  * गुळ क्यूब्स आणि गुळखडे  * पारंपारिक साईचा गूळ आणि गुळदाणी  "शुद्ध आणि नैसर्गिक अन्नाची गरज ओळखून आम्ही...

सायकल दान

Image
 *परिवर्तन फाउंडेशन, Adyen व ConnectFor यांच्या ‘सायकल दान – Pedals of Joy’ उपक्रमातून ५२ विद्यार्थ्यांना सायकल वितरण*  परिवर्तन फाउंडेशनतर्फे, Adyen व ConnectFor यांच्या सहकार्याने “सायकल दान – Pedals of Joy” या उपक्रमांतर्गत जनसेवा संघ ट्रस्ट संचालित नेरे हायस्कूल येथे सायकल वितरण व सायकल सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील ५२ विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी करून त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. परिवर्तन फाउंडेशनने नेरे हायस्कूल ही शाळा दत्तक घेतली असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये शाळेचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. जनसेवा संघ ट्रस्ट संचालित नेरे हायस्कूलची कार्यकारिणी यासाठी सदैव तत्पर राहील असेही नमूद करण्यात आले. या कार्यक्रमाचे *अध्यक्ष श्री दत्तात्रय शेठ पाटील* हे होते, तर *प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण कुमार मुळे* उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. गिरीश इंगळे – ...

दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘ वन मरीना’ प्रकल्पाची घोषणा

Image
दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘ वन मरीना’ प्रकल्पाची घोषणा मुंबई / रमेश औताडे  दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स परिसरात ७४ मजली आलिशान निवासी टॉवर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘वन मरीना’ या नावाचा हा प्रकल्प वायएम इन्फ्रा समूह आणि अश्विन शेठ समूह यांच्या संयुक्त सहकार्याने साकारला जाणार आहे. सुमारे १५ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे २८०० कोटी रुपये आहे. या भागातील हा सर्वात उंच निवासी टॉवर ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या टॉवरमध्ये २, ३ आणि ४ बेडरूमच्या सदनिका तसेच ड्युप्लेक्स आणि पेंटहाऊस प्रकारातील घरे असतील. घरांच्या किमती सुमारे ७ कोटी रुपयांपासून ४५ कोटी रुपयांपर्यंत असतील. प्रत्येक मजल्यावर सुमारे सहा सदनिका ठेवण्यात येणार असून, गोपनीयता आणि प्रशस्त समुद्रदृश्य यावर भर देण्यात आला आहे. सुमारे ९५ टक्के घरे अरबी समुद्राकडे तोंड करून असतील. समुद्रसपाटीपासून १३१ फूट उंचीवर पहिला राहण्यायोग्य मजला असेल, अशी माहिती देण्यात आली. या टॉवरमध्ये ६९ व ७० व्या मजल्यावर विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. इमारतीचा काचांचा दर्शनी भाग उ...

आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात

Image
मुंबई / रमेश औताडे  आशिया खंडात नावाजलेल्या धारावीतील कोळीवाडा परिसरात हिंदू धर्म रक्षक युवा हिंदुत्व संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळीवाडा होळी मैदान येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. गड-किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांचा प्रमुख सत्कार करण्यात आला.  प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे डबेवाले, शिवसेनेचे धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख किरण काळे, नवनिर्वाचित नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेविका अर्चना शिंदे, मनसेचे धारावी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोनावणे तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिटकर यांची विशेष उपस्थिती होती.  कोळीवाडा येथून सुरू झालेली मिरवणूक संत कक्कया मार्ग, कामराज हायस्कूल ९० फीट रोड, संत रोहिदास मार्ग, धारावी मेन रोड मार्गे पुन्हा होळी मैदान येथे विसर्जित झाली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष कौशिक कोळी, समीर भोईटे यांनी केले. “कोणताही पक्ष नाही, एकच झेंडा तोही भगवा” हाच उद्देश होता.

एलआयसी म्युच्युअल फंडकडून तंत्रज्ञानाधारित नवीन योजना जाहीर

Image
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२६ :  रमेश औताडे ( प्रतिनिधी )  एलआयसी म्युच्युअल फंडाने तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी नवीन समभागाधारित गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे डेटा केंद्रे, डिजिटल व्यासपीठे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा नवीन निधी उभारणी कालावधी २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन ६ मार्च २०२६ रोजी संपणार आहे. त्यानंतर ११ मार्च २०२६ पासून योजना सातत्याने खरेदी-विक्रीसाठी खुली राहील. या योजनेचे व्यवस्थापन करण दोशी आणि जयप्रकाश तोंगावळे हे संयुक्तपणे पाहणार असून, तिचे प्रदर्शन बीएसई टेक एकूण परतावा निर्देशांकाच्या मानदंडाशी तुलना करून केले जाईल. ही योजना पारंपरिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित नसून सेमीकंडक्टर उत्पादनाशी संबंधित कंपन्या, डेटा केंद्रांचे संचालन करणाऱ्या संस्था, डिजिटल वाणिज्य व्यासपीठे, इंटरनेट आधारित व्यवसाय तसेच तंत्रज्ञानावर आधारित नवउद्योग यांचा समावेश करणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. झा यांनी सा...

शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात साजरा होणार

Image
    शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात साजरा होणार मुंबई / रमेश औताडे दक्षिण मध्य मुंबईतील सायन कोळीवाडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कार्यक्रमात शिवप्रतिमेचे पूजन, अभिवादन, शिवचरित्रावरील व्याख्यान, तसेच युवक-युवतींसाठी प्रेरणादायी संदेश यांचा समावेश असणार आहे. शिवजन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून स्वराज्य, शौर्य, न्याय आणि संघटनशक्ती यांची प्रेरणा देणारा दिवस असल्याचे आयोजकांनी सांगितले. सकल मराठा समाज, द. मध्य मुंबई (रजि.) चे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी सर्व शिवभक्त, समाजबांधव आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी जयंती साजरी करण्याची भावना आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचेही...

महाराष्ट्र करणी सेनेच्या मागणीला न्यायालयात यश

Image
      महाराष्ट्र करणी सेनेच्या मागणीला न्यायालयात यश         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे कौतुक मुंबई / रमेश औताडे  मुस्लिम हे अल्पसंख्याक म्हणून धार्मिक आरक्षण घेत असताना त्यांना जातीचे पण आरक्षण कॉंग्रेस सरकारने घटनाबाह्य दिले होते. मुस्लिम धर्मात जाती व्यवस्था नसल्याने त्यांचे जातीचे आरक्षण रद्द करा अशी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी केली होती. त्याची दखल घेत मुस्लिमाचे जात आरक्षण भाजपा सरकारने रद्द केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या अतिशय योग्य अशा निर्णयाचे स्वागत सेंगर यांनी केले आहे. हिंदूधर्म त्याग केल्यावर हिंदू धर्माचे जातीचे सदस्य होण्याचे ऑटोमॅटिक बंद होते. इस्लाम व इतर धर्मात ज्या हिंदूंनी प्रवेश केला त्यांचा हिंदूधर्माशी कसलाही संबंध राहत नाही त्यांना पुनच्छ हिंदू जातीचे आरक्षण देणे हे बेकायदेशीर आहे. अल्पसंख्यक धर्म म्हणून सवलतीचा लाभ घेतात मग का त्याना दुहेरी लाभ दयावा ? असा सवाल सेंगर यांनी केला आहे. "महाराष्ट्र करणी सेना" यांनी मागील वर्षी मुस्लिम व ख्रिश्चन या धर्मात जातीय व्यवस्था नाही...

शिवजयंती निमित्त विशेष लेख !

Image
शिवजयंती निमित्त विशेष लेख !                                                                                               दंतकथांमुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच नाही !                                                           ...

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न

Image
पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न मुंबई / रमेश औताडे  राजगुरुनगर येथे कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ढसाळांच्या जयंतीदिनी आयोजन केले होते. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात झाली. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे, संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे, स्वागताध्यक्ष प्रकाश शितोळे, ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण, बाजार समिती सभापती व जि.प.सदस्य ॲड.विजयसिंह शिंदे, काव्यसंमेलनाध्यक्ष अनंत धनसरे, राजगुरुनगर सह बँकेचे मा.अध्यक्ष दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, खेड तालुका पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष सुनील थिगळे , कवयित्री ललिता सबनीस, दिलीपराव माशेरे, संतोष ताम्हाणे, बबनराव काटकर, कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी,प्रा.डाॅ.बाळासाहेब माशेरे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब खरपुडे, कल्याणी पवार, संदीप म्हसुडगे तसेच साहित्यिक, विविध क्षेत...

नेत्रहीन तरुण-तरुणींसाठी 'स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा'

Image
नेत्रहीन तरुण-तरुणींसाठी  'स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा' मुंबई / रमेश औताडे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील नेत्रहीन तरुण-तरुणींकडून स्वयंपाकाचे प्रशिक्षण मिळावे अशी मागणी होत होती. त्यांची ही मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. नुतन गुळगुळे फाउंडेशन आणि टीम व्हिजन या संस्था रोटरी क्लब ऑफ विरारच्या सहकार्याने स्वागत थोरात यांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अर्नाळा येथील 'स्वानंद सेवा सदन' प्रभात कॉलनी, अर्नाळा, विरार - पश्चिम, जिल्हा- पालघर येथे नेत्रहीनांसाठी "स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा" सुरू करत आहेत. अशी माहिती प्राध्यापक हेमंत सामंत यांनी दिली.         अर्नाळ्यातील पहिली प्रशिक्षण कार्यशाळा दि.१४ व १५ फेब्रुवारी २०२६ अशी दोन‌ दिवसांची निवासी असेल. या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यशाळेत पोहे, उपमा, गोडाचा शिरा, साबुदाण्याची खिचडी, भेळ आणि सॅन्डविच असे सोपे न्याहारीचे (ब्रेकफास्ट) पदार्थ शिकवले जातील. त्याचबरोबर वरण-भातासाठी कुकर कसा लावावा हे ही शिकवले जाणार आहे. या कार्यशाळेत काही कार्यकर्त्यांनाही हे प्रशि...

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनासाठी वचनबद्ध 'ग्रो ग्रीन' उपक्रमाच्या शुभारंभासह आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन साजरा

Image
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनासाठी वचनबद्ध 'ग्रो ग्रीन' उपक्रमाच्या शुभारंभासह आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन साजरा मुंबई / रमेश औताडे  आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनानिमित्त, नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, मुंबईने एक विशेष जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम आयोजित केला. कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांच्या अदम्य धैर्य आणि दृढनिश्चयाचे साजरे करणे आणि लवकर निदान, वेळेवर उपचार आणि समग्र काळजीचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. "पॉवर चॅम्प्स कॅन्सर: फ्रॉम चॅलेंज टू चेंज" या थीम असलेल्या या कार्यक्रमात रोगापेक्षा शक्ती मोठी आहे हा संदेश देण्यात आला आणि तरुण योद्ध्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. एकता आणि उत्सवाच्या भावनेने भरलेल्या या कार्यक्रमाने रुग्णालयाच्या लॉबीमध्ये एक उबदार आणि समावेशक वातावरण निर्माण केले, जिथे कर्करोगाशी झुंजणारी मुले, त्यांचे कुटुंब, डॉक्टर, काळजीवाहक, देणगीदार आणि भागीदार संस्था आशा आणि एकतेने एकत्र आल्या. या कार्यक्रमाबद्दल बोलताना, बालरोग ऑन्कोलॉजी, हेमेटो-ऑ...

सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सवा ’ चा समारोप सोहळा १६ फेब्रुवारीला

Image
‘ सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सवा ’ चा समारोप सोहळा १६ फेब्रुवारीला मुंबई  / रमेश औताडे ‘सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सव’ या उपक्रमाचा समारोप सोहळा सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. मंत्रालयासमोरील या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व सहभागी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ऊर्जा संरक्षण, कार्यक्षमता आणि जनजागृती या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘सक्षम २०२५-२६ ’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा, जनजागृती मोहीमा आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांचा आढावा घेत यशस्वी सहभागी, संस्था व समन्वयकांचा गौरव समारोप सोहळ्यात केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य समन्वय (मार्केटिंग सर्व्हिसेस) विभागाचे मुख्य व्यवस्थापक दीपक जी. वाघ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

जमिनीतच आमचा श्वास आहे; ती गेली तर आम्ही मारणार !

Image
जमिनीतच आमचा श्वास आहे; ती गेली तर आम्ही मारणार ! शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे विकासाचे फुलपाखरू मुंबई / रमेश औताडे  तिसरी मुंबई उभारणीच्या नावाखाली दाखवले जाणारे विकासाचे फुलपाखरू आज सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी भीतीचे आणि असुरक्षिततेचे प्रतीक बनले आहे. हा विकास आमचा नाही, तर आम्हाला आमच्या जमिनीतून, पाण्यातून आणि मुळातून उपटून टाकणारा आहे, अशी वेदना उरण तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. पिढ्यान्‌पिढ्या जोपासलेली सुपीक शेती, भातखाचरं, फळबागा आणि गावाची ओळख असलेली जमीन आता कागदावरच्या रेषांमध्ये अडकली आहे. “आम्ही शेती करून जगतो, जमिनीत आमचा श्वास आहे. तीच जमीन गेली तर आम्ही कुठे जायचं?” असा सवाल एका ज्येष्ठ शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आणून केला.  विकासाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत, पण त्याबदल्यात मिळणारी भरपाई अपुरी असून पर्यायी रोजगाराचे आश्वासन केवळ कागदावरच असल्याचे शेतकरी सांगतात. शेती गेली तर केवळ उत्पन्नच नाही, तर घर, कुटुंबाची सुरक्षितता आणि भविष्यही हिरावून घेतले जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबांना स्थलांतराची भीती सतावत आहे. “आज ...

देशव्यापी संपाबतात म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली माहिती

Image
मुंबई / रमेश औताडे  केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला मुंबईसह राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय, निमशासकीय, महापालिका तसेच इतर आस्थापनांतील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले. म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई (संलग्न : हिंद मजदूर सभा) यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन श्रम संहितांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येत आहे. कंत्राटीकरणाला प्रोत्साहन, खासगीकरणाची गती, सार्वजनिक क्षेत्रातील कपात, तसेच सामाजिक सुरक्षेतील अनिश्चितता यामुळे कामगार वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले. यावेळी विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस श्री. निवृत्ती झुंजार, उपाध्यक्ष श्री. अशोक गायकवाड, कोषाध्यक्ष श्री. अशोक चव्हाण, केंद्र सचिव श्री. संजय गोरे आदींचा समावेश होता. त्यांनी केंद्र सरकारने कामगारांशी सवांद न साधता घेतलेल्या न...

मुंबई पालिका मुख्यालयातील महिला रक्षकांवर कारवाई,

Image
      मात्र  सुरक्षा अधिकाऱ्याला नक्की कोणाचे अभय ?  मुंबई  / रमेश औताडे  महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त होत असतानाच महिला सुरक्षा रक्षकांच्या प्रकरणात मात्र जुनीच कार्यपद्धती कायम असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यालयातील वादानंतर सात महिला सुरक्षा रक्षकांची बदली करण्यात आली; परंतु चर्चेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यालय मधील महिला कक्षात झालेल्या वादानंतर तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सातही महिला सुरक्षा रक्षकांना केईएम, नायर, राजावाडी व शीव रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या प्रकरणात एका अधिकाऱ्याची भूमिका चर्चेत असतानाही त्यांची चौकशी अथवा बदली न झाल्याने “ सत्तांतर झाले तरी संरक्षणाचीच पद्धत तीच काशी ? असा सवाल उपस्थित होत आहे.  तक्रार मागे घेण्यात आली असली तरी कारवाईचा फटका केवळ महिला कर्मचाऱ्यांनाच का, याबाबत सुरक्षा विभागात नाराजी आहे. नव्या नेतृत्वाने या प्रकरणात हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. सुरक्षा अधिका...

मुंबईचा मराठी महापौर विराजमान झाला

Image
             विकासाचा नवा संकल्प जाहीर केला          सोबत मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षाचे अध्यक्ष                                 मारुती मोरे मुंबई  / रमेश औताडे  मुंबई महानगरपालिकेच्या मराठी महापौरांनी बुधवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारताच पालिका मुख्यालयात उपस्थिती लावली. पदग्रहणानंतर त्यांनी सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षाला भेट देत पत्रकारांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. यावेळी पत्रकार कक्षाचे अध्यक्ष मारुती मोरे, उपाध्यक्ष सचिन धानजी, इंद्रायणी नार्वेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना महापौरांनी आपल्या पुढील वाटचालीचा आराखडा मांडला. “केंद्रात, राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत आमचेच सरकार असल्याने विकासकामांना वेग मिळेल. गोरगरीब जनतेला न्याय आणि मदत देणे हे आमचे प्राधान्य राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. उपनगरांमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईती...

एक आठवणीतील सत्कार

Image

आझाद मैदानात ३२४ प्रकल्पग्रस्तांचे ३ महिन्यांपासून बेमुदत उपोषण

Image
मुंबई / रमेश औताडे  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे प्रकल्पातील ३२४ प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा शासनस्तरावर निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांनी मुंबईतील आझाद मैदानात गेल्या तीन महिन्यांपासून बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी रायगड, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी तसेच कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सात दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणताही लेखी आदेश किंवा नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी रायगड यांनी ३२४ प्रकल्पग्रस्तांची यादी तयार करून अहवाल कंपनीकडे सादर केला होता. तरीही कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप उपाध्यक्ष रोशन जामेकर यांनी केला. शासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष होत असल्याने १ सप्टेंबर २०२४ पासून आझाद मैदानात ...

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

Image
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा मुंबई / रमेश औताडे  सोलापूर जिल्ह्यातील अनुप बायस व त्यांचे कुटुंब हे शेतकरी असून त्यांच्या मालकीची शेती आरोपी पवार कुटुंबियांनी बळकावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास संपूर्ण बायस कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आत्मदहन करणार असल्याचा इशारा अनुप बायस यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. अनुप बायस यांनी सांगितले की, पोलिस प्रशासन, स्थानिक राजकीय पक्ष आणि गावगुंड यांची मिलीभगत असल्याने भूमाफिया मोकाट सुटले असून ४ ते ५ कोटी रुपयांची मौल्यवान जमीन बळकावण्यात आली आहे. ही जमीन कायदेशीररीत्या आमच्या नावावर असून त्याच आधारे बँकेकडून शेती तसेच कुटुंबातील लग्नासाठी कर्जही घेण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात जमिनीचा ताबा आमच्याकडे नसल्याने आम्ही आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलो आहोत. या प्रकरणात सुभाष देशमुख व अन्य दोन भाजप आमदारांचा उल्लेख करत, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याची खंत अनुप बायस यांन...

आर्टिस्ट्री आयोजित देणे समाजाचे उपक्रमांस रुग्ण मित्रांची सदिच्छा भेट

Image
मुंबई / रमेश औताडे  आर्टिस्ट्री प्रस्तुत देणे समाजाचे महोत्सव मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे संपन्न झाला.वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्था़च्या कार्याची  ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून करुन देत या संस्थांना भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा मानस वीणा गोखले व त्यांचे सहकारी देणे समाजाचे या उपक्रमांतर्गत करीत असतात.रुग्ण मित्र विनोद साडविलकर, गणेश पवार यांनी *संस्था भेट चर्चा थेट* सामाजिक संस्था मार्गदर्शनपर पुस्तक वीणा गोखले यांना दिले. गेली २१ वर्षे हा उपक्रम सुरू असून,३०० सामाजिक संस्था आणि २२ कोटी पेक्षा जास्त भरीव निधी संस्थांना मिळवून दिलेला आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत संस्था सहभागी झाल्या होत्या.त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र,वंचित मुलांचे संगोपन,मनोरुग्णांची सेवा,महिला सबलीकरण,ग्राम विकास,स्त्रियांच्या मासिक पाळी संदर्भात जागृती,फासेपारधी मुलांचे शिक्षण व पालनपोषण या सारख्या सामाजिक योगदान देणाऱ्या संस्थांना भेटी देण्यात आल्या. आर्टिस्ट्री प्रस्तुत देणे समाजाचे स्वयंसेवकांचे उत्तम नियोजन व विविध सामाजिक संस्थांचा सहभागामुळे प्रदर्शनास उत्स्फूर्...