महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे आझाद मैदानात आक्रमक

मुंबई / रमेश औताडे 

राज्यातील संगणक परिचालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.
कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, कायमस्वरूपी दर्जा आणि आवश्यक सुविधा, यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे सुधारित आकृतीबंध राबवून कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावे, मानधनात वाढ किमान १७ हजार रुपये करण्यात यावे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. मयूर कांबळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संतोष कुडले आदी पदाधिकारी उपस्थित होते 

कायमस्वरूपी नोकरीची हमी देऊन कंत्राटी कामगारांप्रमाणे सर्व लाभ व सुविधा लागू कराव्यात, अनेक ग्रामपंचायतींमध्ये १४ वर्षांपूर्वी दिलेले संगणक व इतर साहित्य खराब झाल्याने  प्रत्येक ग्रामपंचायतीला नवीन संगणक, प्रिंटर व आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, महिला संगणक परिचालकांना मानधनासह प्रसूती रजा देण्याची तसेच सर्व संगणक परिचालकांसाठी किमान ५० लाख रुपयांचा अपघाती व आरोग्यविषयक विमा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा