Posts

Showing posts from March, 2026

आम्रपाली ची काश्मीर ते कन्याकुमारी बाईक मोहीम

Image
वनरक्षक आम्रपाली पडघण ची 'कन्याकुमारी ते काश्मीर' ऐतिहासिक बाईक मोहीम संरक्षणासोबतच जनजागृतीचा नवा अध्याय ! मुंबई  / रमेश औताडे  निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी झोकून देणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक आम्रपाली देवीदास पडघण आता एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत. 'फॉरेस्ट टू फ्रंटियर' (Forest to Frontier) या संकल्पनेखाली त्या कन्याकुमारी ते काश्मीर (K2K) असा सुमारे ३,६०० किलोमीटरचा प्रवास सोलो बाईक राईडद्वारे पूर्ण करणार आहेत. आम्रपाली या गेल्या ९ वर्षांपासून महाराष्ट्र वन विभागात कार्यरत असून, सध्या त्या बोर व्याघ्र प्रकल्पातील 'नवेगाव बीट' येथे कार्यरत आहेत. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर एक पॅशन म्हणून त्या जंगलाची राखण करतात.  * वन्यजीव तज्ज्ञ: त्यांनी बोर अभयारण्यात ११४ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली आहे.  * सर्पमित्र: मानवी वस्तीत शिरलेल्या शेकडो सापांना (ज्यात नाग आणि अजगरांचा समावेश आहे) त्यांनी सुरक्षितरीत्या जीवनदान दिले आहे. त्यांच्या सापांवरील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५ मध...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे " वृक्ष संजीवनी " अभियान

Image
    पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन यांचाही सहभाग मुंबई / रमेश औताडे    बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी  ‘ वृक्ष संजीवनी ’ अभियान राबविण्यात येत आहे.  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन या संस्था सहभागी होणार आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘ वृक्ष संजीवनी ’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट- काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जातात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्या...

तापमानातील असामान्य बदलामुळे अकाली मृत्यूचे संकट

Image
मुंबई / रमेश औताडे हवामान बदलाचा परिणाम आता अधिक गंभीर स्वरूपात समोर येत असून, तापमानातील असामान्य बदलामुळे  दरवर्षी सुमारे ७ लाख लोकांचा अकाली मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय संशोधनांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. तज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि थंडीतील तीव्र बदल यामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि गरिबी रेषेखालील नागरिक यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जागतिक स्तरावर परिस्थिती आणखी चिंताजनक असून, २०५० पर्यंत हवामान बदलामुळे लाखो अतिरिक्त मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उष्णतेमुळे होणारे हृदयविकार, श्वसनाचे आजार, तसेच संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, ही केवळ भविष्यातील समस्या नसून सध्या सुरू असलेले संकट आहे. तापमानवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने प्रभावी धोरणे राबविण्याची गरज आहे. हरित क्षेत्र वाढवणे, प्रदूषण नियंत्रण आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यावर भर देणे अत्याव...

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाल्यांना न्याय द्या

Image
मुंबई / रमेश औताडे  अधिकृत व अनधिकृत असे फेरीवाले कोण ? याबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाहून पालिका पोलिस प्रशासन व सरकारचे प्रतिनिधी तसेच रेल्वे हद्दीतील किंवा इतर कोणाच्याही हद्दीतील फेरीवाले यांच्याबाबत योग्य तो तोडगा काढत फेरीवाल्यांना न्याय द्यावा. अशी मागणी आझाद होकर्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी खासदार संजय निरुपम, हुसेन पटेल, ललित दोशी पप्पू, जय हिंदुस्थान हॉकर्स युनियन फेरीवाला संघर्ष समिती चे अध्यक्ष मंजूर मकबूल खाँ, जय शंकर सिंह उपस्थित होते. पोलिस विभाग, पालिका यंत्रणा, सरकारी बाबू व इतर संबंधित विभाग या प्रश्नाकडे गांभीर्याने का पाहत नाही ? या थेट प्रश्नाला उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले की, हप्ते बंद होतील या भीतीने फेरीवाला प्रश्न भिजत ठेवायचा. न्यायालय किंवा शासन काय म्हणत आहे , याकडे कानाडोळा करत आपले मनमानी काम करत रहायचे ही वृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांचा प्रश्न असाच रेंगाळत राहणार. 

इराणच्या आंदोलनात एका निष्पाप तरुणावर अन्याय

Image
इराणच्या आंदोलनात एका निष्पाप तरुणावर अन्याय देशातील बहाई समाजाने केली न्यायाची मागणी मुंबई /रमेश औताडे इराणमधील ८ जानेवारीच्या आंदोलनादरम्यान पैवंद नईमी या तरुणाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून आय आर जी सी  च्या नजरबंदी केंद्रात त्याला घेऊन दीर्घकाळ चौकशी करत अन्न  पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून त्याला वंचित ठेवण्यात आले.  वारंवार मारहाण  आणि दोनदा बनावट फाशी देण्यासही भाग पाडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर असा मानसिक छळ केलेल्या कृत्याचा निषेध करत बहाई आंतरराष्ट्रीय समुदाय जिनिव्हा च्या माध्यमातून बहाई स्थानिक आध्यात्मिक सभा च्या भारतामधील  राष्ट्रीय  सचिव नर्गिस गौर यांनी न्यायाची मागणी केली आहे. पैवंद नईमी वर गंभीर आरोप ठेवण्यात आले आणि खोटा कबुलीजबाब देण्यास भाग पाडले गेले. जो नंतर सरकारी दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला. अद्याप कोणताही खटला चाललेला नाही, कोणताही पुरावा सादर केलेला नाही, आणि तरीही तो तुरुंगातच आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक कैद्यांची सुटका झाली असली तरी, इतर बहाईंप्रमाणेच केवळ त्यांच्या श्रद्धेमुळे त्याला लक्ष्य के...

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे.

Image
मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे. उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन.. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार. मुंबई, २३ मार्च / रमेश औताडे  मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आ...

किरण कोळी यांचा आझाद मैदानातून सवाल

Image
सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे !  किरण कोळी यांचा आझाद मैदानातून सवाल मुंबई / रमेश औताडे  आमची जमीन, आमचा समुद्र, आमचा निसर्ग आणि आमचे अस्तित्व वाचविण्यासाठी व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात आझाद मैदानात महामोर्चा काढत, " सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे " असा सवाल करण्यात आला. आदिवासी, मच्छीमार व इतर वंचित घटकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने भर उन्हात सहभाग नोंदवला. मच्छीमार नेते व आयोजक कमिटीचे सर्व सदस्य, नारायण पाटील संघर्ष समिती चे वैभव वजे, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, ज्योती मेहेर, उज्वला पाटील असे अनेक समाज प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. समुद्रात होणारे विमानतळ आणि पर्यावरणास घातक 'चौथी मुंबई' योजना तात्काळ थांबवा. मुंबईतील कोळीवाड्यांचे, बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छिमारांच्या हिताचे करा. ससून डॉक, मुंबई येथे बंद केलेली गोदामे त्वरित ताब्यात द्यावी. कफ-परेड, मुंबई येथील प्रस्तावित 'मरीना पार्क' प्रकल्प रद्द करावा. छत्रपती शिवाजी महाराज बाजार (क्रॉफर्ड मार्केट) कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नये. मुंबई येथील सर्व बाजार...

Sanitation Workers Celebrate at Azad Maidan Following Government Assurances

Image
Mumbai / Ramesh Autade The protest organized by the Municipal Mazdoor Union—staged at 'Varsha,' the Chief Minister's official residence, to press for the demand for ownership housing for sanitation workers of the Mumbai Municipal Corporation—has proven successful. Following assurances provided by the government, scenes of jubilation among the sanitation workers were witnessed at Azad Maidan. Under the leadership of Ashok Jadhav, President of the Municipal Mazdoor Union, thousands of sanitation workers, accompanied by their families, had marched to the Chief Minister's residence. During the discussions held on this occasion, the government gave an assurance that a concrete decision regarding the housing issue of the sanitation workers would be taken very soon. Indications were given that justice would be delivered to the workers through the effective implementation of the Government Resolution (GR). Ashok Jadhav clarified, "Placing our trust in the gover...

तरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल

Image
मुंबई /रमेश औताडे  डॉ.आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून समानतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. मात्र आजही सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे शासनाने पाणी सर्वांसाठी मोफत केले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली शासनाकडून वाहिली गेली असे सिद्ध होईल. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, भोजराज वैद्य, प्रमुख पाहुणे धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले.पुण्यशील बोदिले.अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर उपस्थित होते. नारायण बागडे यांनी असे अनेक उपक्रम राबवत शासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र सरकार या सूचना अंमलात आणत नाही. याचे मोठे दुःख आहे असे धर्माजी बागडे यांनी सांगितले.

संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश

Image
    मुंबई / रमेश औताडे  सर्व धर्मीयांमध्ये एकात्मता आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी तसेच संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने मुंबईत मरीन लाइन्स येथील बहाई केंद्रात सर्वधर्मीय इफ्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध धर्मांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात उपवासाच्या माध्यमातून आत्मशुद्धी, संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी बहाई केंद्राच्या सचिव नर्गिस गौर, शेख नासिर, फादर एम एम मायकल,स्वामी ब्रज मोहन दास,सलीम खान, शत्रुघ्न जीवनाणी या व इतर धर्मगुरु व विचारवंतानी उपवास व एकता यांचे महत्व काय आहे याबाबत सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन इफ्तारचा आस्वाद घेतला. या सोहळ्यामुळे विविध धर्मीयांमध्ये संवाद, सलोखा आणि परस्पर सन्मान अधिक दृढ होण्यास मदत झाली. या उपक्रमाचे आयोजन आंतरधर्मीय एकता परिषदेतर्फे करण्यात आले असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्...

माजी पोलीस उपनिरीक्षक बबन जाधव यांचा आंदोलनाचा इशारा

Image
            पोलीस महासंचालकांना पाठवले पत् मुंबई / रमेश औताडे  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जे.एफ. रिबेरो, एम.एन. सिंग आणि अरुणी रॉय यांच्या कार्यकाळात कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा खळबळजनक आरोप निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बबन गणपत जाधव यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना सविस्तर पत्र लिहून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. मुख्य आरोप आणि मागण्या:  * अनमानास्पद वागणूक: तत्कालीन आयुक्तांनी पोलीस संघटना बनवण्यास विरोध केला आणि कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.  * भ्रष्टाचाराचे आरोप: काही माजी आयुक्तांनी बदली प्रक्रियेत आणि प्रशासकीय कामात भ्रष्टाचार केल्याचा दावा जाधव यांनी पुराव्यासह केला आहे.  * सुरक्षेचा प्रश्न: कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या वाढत्या आत्महत्या यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  * न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी: उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांच्या हक्काचे व्यासप...

निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्था यांची पत्रकार परिषद

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तर्फे जोसेफ शांतीमानू तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते.जोसेफ शांतीमानू तसेच इतर मान्यवरांनी पत्रकार आणि मी यांच्याशी आज दिनांक 18/3/2026 रोजी संवाद साधला. बिल्डर (विकासक) हलकारा बिल्डर ,भागीदार कॉसमॉस लँडमार्क  यांनी आमचे  थकीत भाडे ११.२५ कोटी थकीत ठेवले आहेत तसेच मालमत्ता कर ५.७५ कोटी भरले नाही ,कॉर्पस फंड (निधी) सुमारे २ कोटी दिले नाही ,दरमहा १२,०००/- रुपये भाडे दिले जात आहे. परंतु विक्रीसाठी उपलब्ध असलेले सर्व ७७ सदनिका (फ्लॅट्स) विकून टाकले आहेत. तसेच सर्व F.S.I. (मजला क्षेत्र निर्देशांक) आणि T.D.R. (हस्तांतरणीय विकास हक्क) देखील वापरून टाकले आहेत.  यामुळे या विक्री सदनिकांचे खरेदीदारही अडचणीत आले आहेत. 'कलम १३/२' (Section 13/2) अंतर्गत विकासक बदलण्याबाबत वारंवार पत्रे पाठवूनही, आजपर्यंत सहाय्यक निबंधक श्री. चंद्रकांत पवार यांनी यावर कोणतीही सुनावणी घेतलेली नाही. इमारतीचे रंगकाम (पेंटिंग) योग्य प्रकारे करण्यात आलेले नाही; तसेच गच्चीवरील (टेरेसवरील...

जन्मशताब्दी सांगता समारंभ

Image
मुंबई / रमेश औताडे  शिवसेना पक्षाचे पहिले आमदार व खासदार दिवंगत वामनराव महाडिक यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त श्री संत गाडगे महाराज ट्रस्ट, परेल यांच्या वतीने मा. उपविभाग प्रमुख भारत म्हाडगुत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष प्रा. हेमंत सुधाकर सामंत, एडवोकेट घनश्याम कडूसकर, वामनराव महाडिक यांच्या कन्या डॉ. चित्रा ठाकूर, राधा कडुसकर, श्रद्धा भस्मे उपस्थित होते. यानिमित्ताने वामनराव महाडिक यांच्या जीवनावरील एक अनुबोधपट दाखवण्यात आला.  वामनराव महाडिक यांच्याबरोबर अगदी लहान वयापासून भारत म्हाडगुत यांनी केलेले काम हे अत्यंत निष्ठेने केलेले काम आहे, याबद्दल हेमंत सामंत यांनी गौरवोद्गार काढले. सर्व उपस्थितांनी वामनरावांच्या आठवणींना उजाळा दिला.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आदर्श शिक्षकाला याच दिवशी त्यांच्या तळेरे येथील शाळेत पुरस्कार देऊन गौरवले जाते, अशी माहिती डॉ. चित्रा ठाकूर यांनी दिली. कार्यक्रमाला एआय तज्ज्ञ स्वप्नेश माळी, अभिनेत्या संध्या म्हापणकर हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मशाळेच...

Why Shouldn't an Ex-Serviceman Be an Nominated Corporator?

Image
Subedar Nitin Harishchandra Patil  Ambruwadi, Taluka Nandivade,  Ratnagiri Mumbai / Ramesh Autade P R News Media Network With the objective of utilizing his experience for the holistic development of the city of Mumbai, ex-serviceman Subedar Nitin Harishchandra Patil has submitted an application for the post of Nominated Corporator in the Mumbai Municipal Corporation. He has applied under the 'Sports' category, leveraging his experience of having competed at various levels; through this initiative, he has expressed his hope that the participation of experts from the sports sector in urban development will increase. The All India Ex-Servicemen Organization—along with the general public—is raising the pertinent question: "Why shouldn't an ex-serviceman be appointed as a Nominated Corporator?" Citing a circular issued by the Ministry of Urban Development, Subedar Patil has submitted this application to the Commissioner of the Mumbai Municipal Corporati...

राज्यातील गुरव समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती

Image
राज्यातील गुरव समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती  मुंबई / रमेश औताडे   गुरव (पुजारी) समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता ॲड.अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस डॉ.रंगनाथ गुरव,महासचिव विलास पाटील, प्रदेश अध्यक्ष सुभाष शिंदे, संतोष वाघमारे,मुख्य सरचिटणीस विजय ठोसर, अनिल पुजारी, प्रदीप पाटील, विशाल रोहणकर, संजय घोडके, संतोष शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष नितेश वैद्य, समीर गुरव, महिला प्रदेशाध्यक्ष मनिषाताई पांडे, श्रद्धाताई साखरे तसेच देवस्थान समिती प्रदेशाध्यक्ष धनंजय दरे आदी उपस्थित होते. देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींचे हक्क, मंदिर व्यवस्थापनातील गुरव समाजाला प्रतिनिधित्व, पुजाऱ्यांना मानधन व निवृत्तीवेतन, तसेच गुरव समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांबाबत शासनाने ...

पात्र आणि संरक्षित फेरीवाले विक्रेत्यांचे आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईतील आझाद मैदान येथे पात्र आणि संरक्षित रस्त्यावरील फेरीवाले आणि विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन केले. आझाद होकर्स युनियन यांच्या नेतृत्वाखाली हजारो फेरीवाल्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनात केंद्र सरकारच्या  नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, रस्त्यावरील विक्रेत्यांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसून अनेक ठिकाणी फेरीवाल्यांवर अन्याय होत आहे. असे युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी सांगितले. युनियन चे सचिव जय शंकर सिंह म्हणाले, महापालिकेकडून कारवाई करताना विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जात आहे. काही ठिकाणी माल जप्त केला जात असून, परत मिळवण्यासाठी निश्चित नियम नसल्याची तक्रारही करण्यात आली.  स्थानिक स्तरावर काही गुंडांकडून नव्या फेरीवाल्यांकडून दररोज पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे निवेदन देत, ...

संदीप ( भाऊ ) तळेकर यांच्याकडून आक्रमक आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके मधील जलजीवन योजना अंतर्गत असणारे गावे  व करमाळा तालुक्यातील जलजीवन योजना अंतर्गत व रूपांतरित साठवण पाझर तलावात केम पोथरे जातेगाव कोर्टी,अर्जुननगर, सालसे,  या गावांमध्ये भ्रष्टाचार ठेकेदार शिवनेरी कंट्रक्शन केम, शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांनी संबंधित कामे निकृष्ट दर्जाचे केली शेतकऱ्यांची दिशाभूल करून व अधिकार्याला दम देऊन सर्व ठिकाणी बोगस काम करून बिले काढण्याचा प्रयत्न केला .  याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व गावातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला अनेक वेळा आंदोलन केली तरी देखील अधिकाऱ्यांनी कुठलाही न्याय शेतकऱ्यांना दिला नाही यासाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरत आहे. मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग येरवडा पुणे येथे दिनांक,16/12/2025  मंगळवार रोजी करमाळा तालुक्यातील सर्व संबंधित गावातील शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन प्रहार संघटना संबंधित अधिकारी प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात तीव्र अर्धनग्न आंदोलन करणार आहे.आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व व ग्रामविकास कॅबिनेट मंत्री,जयकुमार गोरे साहेब यांनी शेतकऱ्यांची व शे...

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश*

*संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे* *कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश* मुंबई, दि. १२: टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीत कामगार मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.  बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वन्हाळकर अप्पर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर,  कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ आदी उपस्थित होते. कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी मागील १  डिसेंबर २०२५ पासून संपावर  आहे. याबाबत तोडगा काढणे आवश्यक ...

आमदार अमित गोरखेंच्या आश्वासनानंतर मातंग समाजाचे उपोषण स्थगित

Image
मुंबई / रमेश औताडे  अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदान येथे सुरू असलेले मातंग समाजाचे उपोषण अखेर आमदार अमित  गोरखे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. या उपोषणाचे आयोजन राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना व मागासवर्गीय वंचित संघ यांच्या वतीने करण्यात आले होते. आरक्षण उपवर्गीकरण, प्रस्तावित अण्णाभाऊ साठे स्मारक चिराग नगर सहित लहुजी नगर शेगाव पुनर्वसन अपंग आयोग अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न आदी विषयावर आमदार  गोरखे यांनी जबाबदारी घेऊन पूर्ण करून घेईल अशी हमी दिली आणि सरकारच्या वतीने मी मातंग समाजाची कोणतीच मागणी प्रलंबित राहू देणार नाही अशी ग्वाही दिली. उपोषणास राष्ट्रवादीचे जयंत पाटील शशिकांत शिंदे संदीप क्षीरसागर शिवसेना उबाठा चे सचिन अहिर राष्ट्रीय काँग्रेस चे भाई जगताप तर सत्ताधारी पक्षा तर्फे आमदार सत्यजीत देशमुख सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भेट दिली  आश्वासनानंतर श्री गोरखे यांनी राजीव मानकर मोहन कांबळे प्रकाश चव्हाण अनिल साठे मोहन साठे यांना पाणी देऊन उपोषण सोडले. आयोजकाच्या वतीने  राजीव मानकर यांनी आमदार अ...

बंजारा समाज न्यायासाठी आझाद मैदानात

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाच्या एस. टी. आरक्षणाकरीता केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचेकडून अहवाल मागितल्याप्रमाणे प्रधान सचिव आदिवासी मंत्रालयाला २६ जुलै २०१९ रोजी अहवाल आणि प्रस्ताव सादर केला आहे.  तसेच राष्ट्रीय बंजारा मिशन संघटनेने अहवालातील त्रुटीचे लेखी निराकरण त्याच काळात पूर्ण करून दिले आहे.  राष्ट्रीय बंजारा विकास मिशन , भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड, महंत सुभाष आनंद सरस्वती, महंत मलेशभाई महाराज, विनोद महाराज रामावत, प्राध्यापक आकाश राठोड, चंद्रशेखर राठोड, काळू चव्हाण उपस्थित होते. नागपूर अधिवेशनात संदर्भिय निवेदन १२ डिसेंबर २०२५ सोबत ४७ पानाचे पुरावे सादर केले आहेत. या पार्श्वभूमीवर संदर्भिय प्रस्ताव आणि अहवाल महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी तसेच अधिकृत एस.टी.मध्ये समावेश होई प्रयत्न धनगर समाजाच्या धर्तीवर बंजारा समाजाला एस.टी.च्या सोई सुविधा लागू करावे. न्यायमुर्ती इंद्रासहानी आणि मंडल आयोगाच्या निर्णयानुसार नॉनक्रिमीलेअर मधून काढावे. वसंतराव ...

नवी दिल्लीत रजनी पंडित यांना 'लोकमाता अहिल्याबाई होळकर' पुरस्कार प्रदान

Image
नवी दिल्ली : प्रतिनिधी देशातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनी पंडित यांना नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात 'लोकमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.  भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि आपल्या क्षेत्रात धाडसाने ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. रजनी पंडित यांनी गुप्तहेर क्षेत्रात अनेक दशके केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी रजनी पंडित यांच्या जिद्दीचे कौतुक केले आणि त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान असल्याचे नमूद केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रजनी पंडित यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान

Image
नवी मुंबई ( प्रतिनिधी ) नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये मेघमल्हार गृहसंकुलातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत मेघमल्हार गृहसंकुलातील रणरागिनींनी आपले कौशल्य आणि एकजूट सिद्ध केली. या यशामध्ये विशेष योगदान देणाऱ्या भारतीताई चिकणे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढाकारामुळे गृहसंकुलातील महिलांना एकत्र येऊन आपली प्रतिभा सादर करण्याची आणि समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. त्यांच्या प्रेरणेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. महिलांच्या मेहनतीची आणि कर्तृत्वाची घेतलेली ही योग्य दखल असून मेघमल्हार गृहसंकुलातील सर्व महिलांनी एकत्रितपणे केलेले हे यश प्रेरणादायी आहे. समाजात महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. सर्व महिलांना सलाम. 🙏 रमेश औताडे 7021777291 पी आर न्यूज मिडिया नेटवर्क

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलेचा उद्योग शुभारंभ

Image
       स्वतःचा स्वावलंबनाचा मार्ग मंगल रामचंद्र महाकाळ यांचे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक थरातून कौतुक होत आहे.      अनेक महिलांसाठी प्रेरणादायी देणारे  प्रमाणपत्र पी आर न्यूज मिडिया नेटवर्क प्रतिनिधी दिनांक 7 मार्च 2026  8767646376 सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वासुद गावात राहणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेने परिस्थितीशी झुंज देत स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी घराच्या अंगणात छोटेखानी शेड उभारून देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला असून आज हा उपक्रम गावातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी सुरुवातीला ५० लहान देशी कोंबड्या खरेदी केल्या. अंगणातच जाळीचे कंपाऊंड करून छोट्या शेडमध्ये त्यांचे संगोपन सुरू केले. मर्यादित साधनसामग्री असतानाही त्यांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हा व्यवसाय उभा केला. देशी कोंबड्यांची अंडी आणि मांसाला ग्रामीण भागात चांगली मागणी असल्याने त्यांना स्थानिक बाजारात चांगला प्रतिसाद मिळणार आहे. दररोज को...

शिक्षकांच्या जुनी पेन्शन मागणीचे श्रद्धांजली अर्पण आंदोलन यशस्वी..... प्रा. विजय शिरोळकर

Image
 शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना राज्याध्यक्ष       प्रा.विजय शिरोळकर , भास्कर देशमुख, तानाजी      शेळके,  तसेच रणजीत तावरे मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक ५ मार्च २०२६ रोजी आझाद मैदान येथे जुनी पेन्शन लक्षवेधी धरणे आंदोलन अत्यंत  यशस्वी झाले. सदर आंदोलनास आ. ज्ञानेश्वर म्हात्रे,  आ. ज. मो. अभ्यंकर, आ. विक्रमजी  काळे, आ. जयंत आसगावकर आ. सुधाकर अडबाले, आ. किरण सरनाईक, आ. अभिजीत वंजारी तसेच पेन्शन लढ्याचे संगीताताई शिंदे, प्रशांत पगार यांनी  संघटनेचे निवेदन स्वीकारून न्यायिक मागण्यां सविस्तर जाणून घेतल्या.  पेन्शन पीडित बांधव, मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अनेक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने आझाद मैदान वरती उपस्थित होते. आंदोलन खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरलं कारण बहुसंख्य  शिक्षक आणि पदवीधर यांनी  कर्मचाऱ्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करून पुढील रणनीती जाहीर केली.  आमदार विक्रम काळे यांनी संघटनेच्या क...

माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा : पृथ्वीराज चव्हाण

Image
मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा अशी मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, आज अंबानी, अडाणी, सुभाषचंद्र यांच्याकडे किती चॅनेल्स आहेत याचा अभ्यास केला, तर त्यांचा आवाका किती मोठा आहे हे लक्षात येईल. मीडियावरील हा कॉर्पोरेट कंट्रोल कमी झाला पाहिजे, त्यावर काही मर्यादा आल्या पाहिजेत. तसेच मीडियाच्या विविध भागांत केवळ एका कॉर्पोरेट हाऊसने प्रवेश करावा का, यावरही मर्यादा असाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रयत्न एस. जयपाल रेड्डी माहिती व नभोवाणी मंत्री असताना करण्यात आल्याचा हवाला देत ते पुढे म्हणाले की, अनेक देशांत अशा प्रकारची बंधने आहेत. भारता...

६० व्या वर्षी उभा केला स्वावलंबनाचा मार्ग

Image
      देशी कोंबडीपालन अनेक महिलांसाठी प्रेरणादायी मुंबई / रमेश औताडे  सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वासुद गावात राहणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेने परिस्थितीशी झुंज देत स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी घराच्या अंगणात छोटेखानी शेड उभारून देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला असून आज हा उपक्रम गावातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी सुरुवातीला ५० लहान देशी कोंबड्या खरेदी केल्या. अंगणातच जाळीचे कंपाऊंड करून छोट्या शेडमध्ये त्यांचे संगोपन सुरू केले. मर्यादित साधनसामग्री असतानाही त्यांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हा व्यवसाय उभा केला. देशी कोंबड्यांची अंडी आणि मांसाला ग्रामीण भागात चांगली मागणी असल्याने त्यांना स्थानिक बाजारात चांगला प्रतिसाद मिळणार आहे. दररोज कोंबड्यांची काळजी घेणे, स्वच्छता राखणे, योग्य खाद्य देणे आणि सुरक्षितता यावर त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कोंबड्या चांगल्या वाढत असून व्यवसाय हळूहळू स्थिर होत आहे. ग्रामीण भागात अनेक महिला आर्...

वांद्रेतील एसआरए प्रकल्पात २९७ भाडेकरूंची फसवणूक

Image
वांद्रेतील एसआरए प्रकल्पात २९७ भाडेकरूंची फसवणूक  मुंबई / रमेश औताडे  झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या वांद्रे येथील आई कंदेश्वरी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात सात वर्षांचा विलंब झाल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रकल्पाचे विकासक हरे कृष्णा डेव्हलपर्स यांनी करारातील अटींचे पालन न करता प्रकल्प रखडवून ठेवला असून २९७ भाडेकरूंशी फसवणूक केल्याचा आरोप सोसायटीचे प्रमुख प्रवर्तक प्रदीप सरफरे यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरफरे यांनी सांगितले की, या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीत तब्बल सात वर्षांचा विलंब झाला असून याची नोंद एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कलम १३(२) अंतर्गत झालेल्या सुनावणीत केली आहे. प्रकल्पातील भाडेकरूंना देय असलेले भाडे १४ महिन्यांपर्यंत देण्यात आले नाही. वारंवार तक्रारी केल्यानंतरच काही प्रमाणात भाडे देण्यात आले, मात्र करारानुसार देण्यात येणारी १० टक्के वाढ अद्याप देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अर्धवट बांधलेल्या...

ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे ठाण्यात भव्य आयोजन

Image
       ८-९ मार्च रोजी ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ मुंबई / रमेश औताडे  ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आणि नेतृत्व विकासासाठी ८ व ९ मार्च रोजी ठाणे येथे “विकसित भारत नारी शक्ती संगम” या शीर्षकाखाली दोन दिवसीय भव्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि ग्रामीण भागातील स्वयंप्रेरित महिलांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही परिषद जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होत असून, देशातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्य मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशभरातून व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ५०० ग्रामीण महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र पंचायत राज्यमंत्री  जयकुमार गोरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी खासदार व प्रवर्तिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय...

आश्वासनावर किती वेळ उपोषण करायचे !

Image
         राज्यातील मातंग समाजाचा सरकारला सवाल मुंबई / रमेश औताडे  राज्यातील मातंग समाज आज अनेक मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित आहे. सरकारने या समाजाची कायमची उपेक्षा केली आहे. वेळोवेळी आंदोलने मोर्चे काढून न्याय मागण्यात अनेक पिढ्या संपल्या तरी सरकार मात्र या समाजाकडे व त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करत नाही. आंदोलन मोर्चे झाले की सरकार फक्त आश्वासन देते. या समाजाने आश्वासनावर किती वर्ष राहायचे असा सवाल आझाद मैदानात मातंग समाजाने उपोषणादरम्यान केला आहे. मागासवर्गीय वंचित संघ आणि राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना यांच्या वतीने मोहनराव कांबळे यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणास मातंग समाज मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहे. मातंग समाजाचे प्रतिनिधी प्रकाश चव्हाण, राजीव मानकर, अनिल साठे यांनी  सक्रिय पाठिंबा देत उपोषणात सहभागी झाले आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ यांनी संघटनेच्या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत भेट दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्न, बाधित स्थान...

आता बाळासाहेब मिरजे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी २० वेळा निवेदन     मुंबई / रमेश औताडे  नवी मुंबई शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), मराठा आघाडीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, येत्या १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी दिला आहे. यासाठी २० पेक्षा जास्त वेळा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या 'जनता दरबारात' वनमंत्री गणेश नाईक यांनी सामाजिक विकासासाठी असलेले सिडको आणि एमआयडीसीचे भूखंड बिल्डरांना विकण्यात आल्याचे नमूद केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. शहरात फेरीवाल्यांचे धोरण निश्चित नसल्याने फुटपाथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण वाढत असून नागरिकांना मनस्ताप होत आहे.  ​शहरात इमारतींचा पुनर्विकास आणि लोकसंख्या वाढत असल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर...

साहित्य क्षेत्रातील अशोकराव टाव्हरे यांचे योगदान उल्लेखनीय – डॉ. श्रीपाल सबनीस

Image
मुंबई / रमेश औताडे  पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सतत तीन वर्षे कनेरसर, मुंबई , राजगुरुनगर येथे साहित्य संमेलन आयोजित करून विविध क्षेत्रात कार्यरत राहून साहित्यासाठी कवी-लेखक अशोकराव टाव्हरे हे उल्लेखनीय योगदान देत आहेत असे मत ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी तिसऱ्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. दोन कवितासंग्रह, लेखसंग्रह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर मराठी व इंग्रजीत पुस्तकांचे लेखन, अनेक स्मरणिका व विशेषांकाचे संपादन करून अशोकराव टाव्हरे हे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून नावारूपास येत आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहण्याचे टाव्हरे यांचे कसब व त्यांची पत्नी सुरेखा टाव्हरे यांची त्यांना असलेली साथ गेली तीन वर्षे साहित्य संमेलनात अनुभवत आहे असे डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी नमुद केले. पुर- कनेरसर चे सुपुत्र व विश्वसाहित्यिक नामदेवराव ढसाळ यांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी टाव्हरे गेली तीन वर्षे साहित्य स...

धगधगती मुंबईचा भव्य वर्धापनदिन सोहळा उत्साहात

Image
मुंबई / रमेश औताडे  ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  या वेळी माजी खासदार व माजी महापौर डॉ. संजीव नाईक तसेच नवी मुंबईच्या विद्यमान महापौर सुजाता पाटील या दोघांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती हा विशेष योगायोग ठरला. आपल्या भाषणात वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठविण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे, असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या.  आपल्या मनोगतात धुळप यांनी मुंबईत मोठा जनसमुदाय गोळा करण्यास यश मिळाल्याचे सांगत, आता नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘धगधगती मुंबई’चा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला.  सिने अभिनेते विजय पाटकर, जेष्ठ पत्रकार अजित जगताप, हनुमंतराव रांजणे, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, पत्रकार संघटनेच्या स्मिता चिपळूणकर, वसंत जाधव, रमेश कदम, राजन ...