धगधगती मुंबईचा भव्य वर्धापनदिन सोहळा उत्साहात
मुंबई / रमेश औताडे
‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी माजी खासदार व माजी महापौर डॉ. संजीव नाईक तसेच नवी मुंबईच्या विद्यमान महापौर सुजाता पाटील या दोघांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती हा विशेष योगायोग ठरला. आपल्या भाषणात वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठविण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे, असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आपल्या मनोगतात धुळप यांनी मुंबईत मोठा जनसमुदाय गोळा करण्यास यश मिळाल्याचे सांगत, आता नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘धगधगती मुंबई’चा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला. सिने अभिनेते विजय पाटकर, जेष्ठ पत्रकार अजित जगताप, हनुमंतराव रांजणे, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, पत्रकार संघटनेच्या स्मिता चिपळूणकर, वसंत जाधव, रमेश कदम, राजन किणे, रमेश धनावडे, प्रताप महाडिक, सौ. अनुजा दांडगे, ॲड. मनीषा चव्हाण, डॉ. सुरेश पाटील, के. के. शेलार, विजयकुमार स्वामी, सचिन वरखडे, डॉ. शांताराम कारंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात ओंकार धुळप आणि सर्व पत्रकार बांधवांचे विशेष योगदान राहिले. जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment