कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश*

*संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे*

*कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश*

मुंबई, दि. १२: टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीत कामगार मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.

 बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वन्हाळकर अप्पर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर,  कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ आदी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी मागील १  डिसेंबर २०२५ पासून संपावर  आहे. याबाबत तोडगा काढणे आवश्यक आहे.  संप करण्यामागे कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या  मागण्या लक्षात घेता मागण्या पूर्ण करण्यासाठी मानवीयदृष्टीने कार्यवाही करण्याची गरज आहे.  अशा परिस्थितीत कामगार व कंपनी हिताचा सुवर्णमध्य साधत कंपनी संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावेत.  कायम व कंत्राटी कामगारांच्या अडचणी समजून घेत,  त्यांना यशस्वीपणे सोडविण्यात यावे. 

निलंबित केलेल्या कामगारांना सेवेत घेतल्यानंतर कामगारांनी संप मागे घ्यावा. याबाबत करण्यात येणारे आंदोलनही  स्थगित करावे, असे आवाहनही यावेळी कामगार मंत्री श्री फुंडकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा