नवी दिल्लीत रजनी पंडित यांना 'लोकमाता अहिल्याबाई होळकर' पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनी पंडित यांना नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात 'लोकमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि आपल्या क्षेत्रात धाडसाने ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. रजनी पंडित यांनी गुप्तहेर क्षेत्रात अनेक दशके केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी रजनी पंडित यांच्या जिद्दीचे कौतुक केले आणि त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान असल्याचे नमूद केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रजनी पंडित यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment