निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्था यांची पत्रकार परिषद

मुंबई / रमेश औताडे 

मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तर्फे जोसेफ शांतीमानू तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते.जोसेफ शांतीमानू तसेच इतर मान्यवरांनी पत्रकार आणि मी यांच्याशी आज दिनांक 18/3/2026 रोजी संवाद साधला.

बिल्डर (विकासक) हलकारा बिल्डर ,भागीदार कॉसमॉस लँडमार्क  यांनी आमचे  थकीत भाडे ११.२५ कोटी थकीत ठेवले आहेत तसेच मालमत्ता कर ५.७५ कोटी भरले नाही ,कॉर्पस फंड (निधी) सुमारे २ कोटी दिले नाही ,दरमहा १२,०००/- रुपये भाडे दिले जात आहे. परंतु विक्रीसाठी उपलब्ध असलेले सर्व ७७ सदनिका (फ्लॅट्स) विकून टाकले आहेत. तसेच सर्व F.S.I. (मजला क्षेत्र निर्देशांक) आणि T.D.R. (हस्तांतरणीय विकास हक्क) देखील वापरून टाकले आहेत.

 यामुळे या विक्री सदनिकांचे खरेदीदारही अडचणीत आले आहेत. 'कलम १३/२' (Section 13/2) अंतर्गत विकासक बदलण्याबाबत वारंवार पत्रे पाठवूनही, आजपर्यंत सहाय्यक निबंधक श्री. चंद्रकांत पवार यांनी यावर कोणतीही सुनावणी घेतलेली नाही. इमारतीचे रंगकाम (पेंटिंग) योग्य प्रकारे करण्यात आलेले नाही; तसेच गच्चीवरील (टेरेसवरील) पाईपलाईनचे कामही व्यवस्थित करण्यात आलेले नाही.
 बिल्डरने काम योग्य प्रकारे केले आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी SRA कडील कोणताही अधिकारी इमारतीची तपासणी करण्यास आलेला नाही. 

आता बिल्डर हे सर्व थकीत भाडे आणि इतर देणी कुठून देणार? त्याने तर विक्रीसाठीच्या सर्व सदनिका आधीच विकून टाकल्या आहेत. त्यामुळे आता आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना अशी विनंती करतो की, सरकारनेच आता ही सर्व थकीत देणी अदा करावीत, आम्हाला 'भोगवटा प्रमाणपत्र' (O.C.) द्यावे आणि त्यानंतर (बिल्डरचे) TDR व FSI विकून त्यातून ही रक्कम वसूल करावी.SRA प्रकल्पांतर्गत विक्रीसाठीच्या सदनिकांपैकी २०% ते ३०% सदनिकांचा ताबा (Possession) घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत; 

मात्र या ठिकाणी बिल्डरने विक्रीसाठीच्या सर्वच्या सर्व सदनिका विकून टाकल्या आहेत. आता या बिल्डरविरुद्ध SRA कोणती कारवाई करणार? असे सवाल करण्यात आले आहे सरकारने एसआरए  बंद करावे . सरकारने रे रा  कायदा काढला आहे पण त्याचा काही फायदा नाही सामान्य झोपडपट्टीसाठी फायदा नाही . चंद्रकांत पवार यांना ज्यावेळी भेटण्यासाठी जातो त्यावेळी ते उडवा  उडवीचे प्रश्न करतात ते सांगतात आमचा विषय नाही परंतु त्यांच्याकडे भाड्याचे विषय आहे परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय एस आर कडून  मिळत नाही.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा