संदीप ( भाऊ ) तळेकर यांच्याकडून आक्रमक आंदोलन


मुंबई / रमेश औताडे 

सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके मधील जलजीवन योजना अंतर्गत असणारे गावे  व करमाळा तालुक्यातील जलजीवन योजना अंतर्गत व रूपांतरित साठवण पाझर तलावात केम पोथरे जातेगाव कोर्टी,अर्जुननगर, सालसे,  या गावांमध्ये भ्रष्टाचार ठेकेदार शिवनेरी कंट्रक्शन केम, शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांनी संबंधित कामे निकृष्ट दर्जाचे केली शेतकऱ्यांची दिशाभूल करून व अधिकार्याला दम देऊन सर्व ठिकाणी बोगस काम करून बिले काढण्याचा प्रयत्न केला . 

याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व गावातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला अनेक वेळा आंदोलन केली तरी देखील अधिकाऱ्यांनी कुठलाही न्याय शेतकऱ्यांना दिला नाही यासाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरत आहे. मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग येरवडा पुणे येथे दिनांक,16/12/2025  मंगळवार रोजी करमाळा तालुक्यातील सर्व संबंधित गावातील शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन प्रहार संघटना संबंधित अधिकारी प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात तीव्र अर्धनग्न आंदोलन करणार आहे.आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व व ग्रामविकास कॅबिनेट मंत्री,जयकुमार गोरे साहेब यांनी शेतकऱ्यांची व शेतकरी वर्गातील व करमाळा तालुक्यातील शिवनेरी कंट्रक्शन बद्दल भ्रष्टाचार उघड व्यथा आज विधान परिषद या सभागृहामध्ये मांडली त्याबद्दल खरंच पालकमंत्री साहेबांचे मनापासून धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा