न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाल्यांना न्याय द्या
मुंबई / रमेश औताडे
अधिकृत व अनधिकृत असे फेरीवाले कोण ? याबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाहून पालिका पोलिस प्रशासन व सरकारचे प्रतिनिधी तसेच रेल्वे हद्दीतील किंवा इतर कोणाच्याही हद्दीतील फेरीवाले यांच्याबाबत योग्य तो तोडगा काढत फेरीवाल्यांना न्याय द्यावा. अशी मागणी आझाद होकर्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी खासदार संजय निरुपम, हुसेन पटेल, ललित दोशी पप्पू, जय हिंदुस्थान हॉकर्स युनियन फेरीवाला संघर्ष समिती चे अध्यक्ष मंजूर मकबूल खाँ, जय शंकर सिंह उपस्थित होते. पोलिस विभाग, पालिका यंत्रणा, सरकारी बाबू व इतर संबंधित विभाग या प्रश्नाकडे गांभीर्याने का पाहत नाही ? या थेट प्रश्नाला उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले की, हप्ते बंद होतील या भीतीने फेरीवाला प्रश्न भिजत ठेवायचा. न्यायालय किंवा शासन काय म्हणत आहे , याकडे कानाडोळा करत आपले मनमानी काम करत रहायचे ही वृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांचा प्रश्न असाच रेंगाळत राहणार.
Comments
Post a Comment