इराणच्या आंदोलनात एका निष्पाप तरुणावर अन्याय


इराणच्या आंदोलनात एका निष्पाप तरुणावर अन्याय

देशातील बहाई समाजाने केली न्यायाची मागणी



मुंबई /रमेश औताडे

इराणमधील ८ जानेवारीच्या आंदोलनादरम्यान पैवंद नईमी या तरुणाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून आय आर जी सी  च्या नजरबंदी केंद्रात त्याला घेऊन दीर्घकाळ चौकशी करत अन्न  पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून त्याला वंचित ठेवण्यात आले.  वारंवार मारहाण  आणि दोनदा बनावट फाशी देण्यासही भाग पाडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर असा मानसिक छळ केलेल्या कृत्याचा निषेध करत बहाई आंतरराष्ट्रीय समुदाय जिनिव्हा च्या माध्यमातून बहाई स्थानिक आध्यात्मिक सभा च्या भारतामधील  राष्ट्रीय  सचिव नर्गिस गौर यांनी न्यायाची मागणी केली आहे.

पैवंद नईमी वर गंभीर आरोप ठेवण्यात आले आणि खोटा कबुलीजबाब देण्यास भाग पाडले गेले. जो नंतर सरकारी दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला. अद्याप कोणताही खटला चाललेला नाही, कोणताही पुरावा सादर केलेला नाही, आणि तरीही तो तुरुंगातच आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक कैद्यांची सुटका झाली असली तरी, इतर बहाईंप्रमाणेच केवळ त्यांच्या श्रद्धेमुळे त्याला लक्ष्य केल्याने पैवंद अजूनही कोठडीत आहे.

त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती सतत खालावत आहे. त्यांना वैद्यकीय उपचार नाकारण्यात आले आहेत, एकांतवासात ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्यावर सतत दबाव टाकला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जीवाची गंभीर चिंता आहे.
१९७९ पासून इराणमधील बहाई समुदायाला पद्धतशीर छळाचा सामना करावा लागत आहे.  पैवंद यांचे प्रकरण या सततच्या अन्यायाची आणखी एक सामाजिक वेदनादायक आठवण करून आहे. जागतिक बहाई समुदाय आता या प्रकरणी तातडीने लक्ष देण्याचे आणि कारवाई करण्याची मागणी करत आहे. असे नर्गिस गौर यांनी सांगितले.

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क. 7021777291

.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री