संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश
मुंबई / रमेश औताडे
सर्व धर्मीयांमध्ये एकात्मता आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी तसेच संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने मुंबईत मरीन लाइन्स येथील बहाई केंद्रात सर्वधर्मीय इफ्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध धर्मांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात उपवासाच्या माध्यमातून आत्मशुद्धी, संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी बहाई केंद्राच्या सचिव नर्गिस गौर, शेख नासिर, फादर एम एम मायकल,स्वामी ब्रज मोहन दास,सलीम खान, शत्रुघ्न जीवनाणी या व इतर धर्मगुरु व विचारवंतानी उपवास व एकता यांचे महत्व काय आहे याबाबत सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन इफ्तारचा आस्वाद घेतला. या सोहळ्यामुळे विविध धर्मीयांमध्ये संवाद, सलोखा आणि परस्पर सन्मान अधिक दृढ होण्यास मदत झाली. या उपक्रमाचे आयोजन आंतरधर्मीय एकता परिषदेतर्फे करण्यात आले असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment