आमदार अमित गोरखेंच्या आश्वासनानंतर मातंग समाजाचे उपोषण स्थगित
मुंबई / रमेश औताडे
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदान येथे सुरू असलेले मातंग समाजाचे उपोषण अखेर आमदार अमित गोरखे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. या उपोषणाचे आयोजन राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना व मागासवर्गीय वंचित संघ यांच्या वतीने करण्यात आले होते.
आरक्षण उपवर्गीकरण, प्रस्तावित अण्णाभाऊ साठे स्मारक चिराग नगर सहित लहुजी नगर शेगाव पुनर्वसन अपंग आयोग अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न आदी विषयावर आमदार गोरखे यांनी जबाबदारी घेऊन पूर्ण करून घेईल अशी हमी दिली आणि सरकारच्या वतीने मी मातंग समाजाची कोणतीच मागणी प्रलंबित राहू देणार नाही अशी ग्वाही दिली.
उपोषणास राष्ट्रवादीचे जयंत पाटील शशिकांत शिंदे संदीप क्षीरसागर शिवसेना उबाठा चे सचिन अहिर राष्ट्रीय काँग्रेस चे भाई जगताप तर सत्ताधारी पक्षा तर्फे आमदार सत्यजीत देशमुख सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भेट दिली
आश्वासनानंतर श्री गोरखे यांनी राजीव मानकर मोहन कांबळे प्रकाश चव्हाण अनिल साठे मोहन साठे यांना पाणी देऊन उपोषण सोडले. आयोजकाच्या वतीने राजीव मानकर यांनी आमदार अमित गोरखे यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment