सायकल दान


 *परिवर्तन फाउंडेशन, Adyen व ConnectFor यांच्या ‘सायकल दान – Pedals of Joy’ उपक्रमातून ५२ विद्यार्थ्यांना सायकल वितरण* 


परिवर्तन फाउंडेशनतर्फे, Adyen व ConnectFor यांच्या सहकार्याने “सायकल दान – Pedals of Joy” या उपक्रमांतर्गत जनसेवा संघ ट्रस्ट संचालित नेरे हायस्कूल येथे सायकल वितरण व सायकल सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील ५२ विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी करून त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. परिवर्तन फाउंडेशनने नेरे हायस्कूल ही शाळा दत्तक घेतली असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये शाळेचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. जनसेवा संघ ट्रस्ट संचालित नेरे हायस्कूलची कार्यकारिणी यासाठी सदैव तत्पर राहील असेही नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाचे *अध्यक्ष श्री दत्तात्रय शेठ पाटील* हे होते, तर *प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण कुमार मुळे* उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. गिरीश इंगळे – अध्यक्ष, परिवर्तन फाउंडेशन; सुषमा लक्ष्मी – खजिनदार व COO, परिवर्तन फाउंडेशन; राजेश खोत – विश्वस्त सदस्य, परिवर्तन फाउंडेशन; श्री जयेंद्रदादा खुने – अध्यक्ष, आगरी सेना मुंबई प्रदेश; राजन पाटील – जनसेवा संघ; प्रधान पाटील वाजे; प्रकाश म्हसकर नेरे; नामदेवराव फडके विहिघर; संदीप काकडे – CSR Manager, दीपक फर्टिलायझर्स; नीलम नेपते – कनेक्ट फॉर; श्री दामाजी धोत्रे – मुख्याध्यापक नेरे हायस्कुल तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय शेठ पाटील यांनी सर्व शिक्षक व पालकांना शुभेच्छा देत सायकल दान उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यात शाळेच्या विकासासाठी परिवर्तन फाउंडेशनसोबत खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख पाहुणे डॉ. अरुण कुमार मुळे यांनी लाभार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्याचा त्रास कमी होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल व शाळेची प्रगती अधिक वेगाने होईल, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सायकल सुरक्षितता व देखभाल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सायकल जबाबदारीने वापरण्याची शपथ घेतली.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा