पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न
मुंबई / रमेश औताडे 

राजगुरुनगर येथे कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ढसाळांच्या जयंतीदिनी आयोजन केले होते. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले.

यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात झाली. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे, संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे, स्वागताध्यक्ष प्रकाश शितोळे, ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण, बाजार समिती सभापती व जि.प.सदस्य ॲड.विजयसिंह शिंदे,
काव्यसंमेलनाध्यक्ष अनंत धनसरे, राजगुरुनगर सह बँकेचे मा.अध्यक्ष दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, खेड तालुका पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष सुनील थिगळे , कवयित्री ललिता सबनीस, दिलीपराव माशेरे, संतोष ताम्हाणे, बबनराव काटकर, कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी,प्रा.डाॅ.बाळासाहेब माशेरे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब खरपुडे, कल्याणी पवार, संदीप म्हसुडगे तसेच साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

उद्घाटक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी सतत तीन वर्षे नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन आयोजित करून कुलस्वामिनी साहित्य परिषद व निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांच्या कार्याचे कौतुक केले. नामदेवराव ढसाळ यांनी विद्रोही साहित्यातून केलेली निर्मिती अलौकिक असून त्याचा वारसा जतन करून वाचनसंस्कृती जतन ठेवण्याचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत व्यक्त केले.

संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक करताना केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या असून पुढील वर्षी साहित्य संमेलन गडकरींच्या आग्रहास्तव नागपुर येथे होणार असे जाहीर केले. तसेच वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करीत असल्याचे नमुद केले. संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे यांनी नामदेवराव ढसाळ यांचा जीवनपट मांडला. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, सभापती विजयसिंह शिंदे, साहित्यिक म.भा.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. 

जालिंदरनगर जि.प.शाळेचे दत्तात्रय वारे गुरूजी, अंबिका देवस्थान ट्रस्ट साबळेवाडी, सोनाली पवार, नीलेश घोडके, ॲड समीर गोडसे, बाळासाहेब चौधरी, विजयकुमार दाते, महेश लोखंडे, द्वारका सेवासदन व गुरुकुल व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विविध विषयांवरील कविता राज्यातून आलेल्या कवींनी सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले. आभार कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा