सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सवा ’ चा समारोप सोहळा १६ फेब्रुवारीला
‘ सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सवा ’ चा समारोप सोहळा १६ फेब्रुवारीला
मुंबई / रमेश औताडे
‘सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सव’ या उपक्रमाचा समारोप सोहळा सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. मंत्रालयासमोरील या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व सहभागी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
ऊर्जा संरक्षण, कार्यक्षमता आणि जनजागृती या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘सक्षम २०२५-२६ ’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा, जनजागृती मोहीमा आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांचा आढावा घेत यशस्वी सहभागी, संस्था व समन्वयकांचा गौरव समारोप सोहळ्यात केला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य समन्वय (मार्केटिंग सर्व्हिसेस) विभागाचे मुख्य व्यवस्थापक दीपक जी. वाघ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment