मुंबई पालिका मुख्यालयातील महिला रक्षकांवर कारवाई,

      मात्र  सुरक्षा अधिकाऱ्याला नक्की कोणाचे अभय ? 

मुंबई  / रमेश औताडे 

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त होत असतानाच महिला सुरक्षा रक्षकांच्या प्रकरणात मात्र जुनीच कार्यपद्धती कायम असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यालयातील वादानंतर सात महिला सुरक्षा रक्षकांची बदली करण्यात आली; परंतु चर्चेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यालय मधील महिला कक्षात झालेल्या वादानंतर तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सातही महिला सुरक्षा रक्षकांना केईएम, नायर, राजावाडी व शीव रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र या प्रकरणात एका अधिकाऱ्याची भूमिका चर्चेत असतानाही त्यांची चौकशी अथवा बदली न झाल्याने “ सत्तांतर झाले तरी संरक्षणाचीच पद्धत तीच काशी ? असा सवाल उपस्थित होत आहे. 

तक्रार मागे घेण्यात आली असली तरी कारवाईचा फटका केवळ महिला कर्मचाऱ्यांनाच का, याबाबत सुरक्षा विभागात नाराजी आहे. नव्या नेतृत्वाने या प्रकरणात हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. सुरक्षा अधिकारी जर मनमानी कारभार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा दबक्या आवाजात नाव न सांगण्याच्या अटीवर सुरक्षा रक्षक बोलत आहेत. सुरक्षा रक्षकांचे कर्तव्यावर असताना लक्ष नसेल तर त्यांच्यावर कारवाई करणे योग्य आहे. मात्र आकसापोटी जर कारवाई होत असेल तर नव्या महापौरांनी यात लक्ष घालावे अशी महिला रक्षक मागणी करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री