बीकेटीने ऑन-हायवे टायर पोर्टफोलिओसह भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेश
मुंबई / रमेश औताडे
बाळकृष्ण इंडस्ट्रीयल लिमिटेड (बीकेटी) या ऑफ-हायवे टायर (ओएचटी) विभागातील जागतिक अग्रणी कंपनीने आज आपला ऑन-हायवे पोर्टफोलिओ लाँच करत भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली. आपल्या ओएचटी नेतृत्वापलीकडे धोरणात्मक विस्तारीकरण करत बीकेटीने दुचाकी (स्कूटर्स व मोटरसायकल्स) आणि मीडियम अँड हेवी कमर्शियल वेईकल्स (एमअँडएचसीव्ही)साठी उद्देशासह डिझाइन करण्यात आलेली उत्पादने सादर केली, ज्यामधून भारतातील झपाट्याने वाढत असलेल्या ग्राहक व रिप्लेसमेंट टायर विभागांप्रती त्यांची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते.
यासोबत कंपनीने आपली राष्ट्रीय ब्रँड मोहिम *'एलीव्हेट युअर ड्राइव्ह* ' देखील लाँच केली, ज्यामध्ये ब्रँड अॅम्बेसेडर *रणवीर सिंग* आहेत. या मोहिमेसह कंपनीने आपला ग्राहक ब्रँड प्रवास सुरू केला आहे, जेथे स्वदेशी विकसित जागतिक टायर उत्पादकासाठी नवीन अध्याय दिसून येतो
*नवीन ब्रँड चॅप्टर: बीकेटी टायर्स आणि बीकेटी कार्बन :* आपली एकात्मिक ब्रँड ओळख *'बीकेटी - ग्रोईंग टूगेदर'* अंतर्गत कंपनीने दोन विशिष्ट ओळखीसह नवीन ब्रँड आर्किटेक्चरचे अनावरण केले - ऑफ-हायवे व ऑन-हायवे श्रेणींमधील कंपनीच्या परिपूर्ण टायर पोर्टफोलिओला सादर करणारे *बीकेटी टायर्स* आणि कंपनीच्या कार्बन ब्लॅक व औद्योगिक साहित्य व्यवसायाला सादर करणारे *बीकेटी कार्बन* . या दोन आधारस्तंभ असलेल्या संरचना ब्रँडबाबत सुस्पष्टता वाढवतात, तसेच *एकीकृत गतीशीलता उद्योग* म्हणून बीकेटीच्या उत्क्रांतीला दाखवतात.
बीकेटीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, बीकेटीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार, बीकेटीच्या व्यवसाय विकास व धोरणाचे वरिष्ठ अध्यक्ष व संचालक सतिश शर्मा, बीकेटी युरोपच्या मॅनेजिंग डायरेक्टर लुसिया साल्मासो आणि बीकेटी टायर्सचे भारतातील चीफ मार्केटिंग ऑफिसर महेश कोप्पड यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
*बीकेटीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार* म्हणाले, ''ऑन-हायवे विभागातील आमच्या प्रवेशामधून बीकेटीचा उद्देश दिसून येतो, तो म्हणजे वास्तविक विश्वातील स्थितींसाठी डिझाइन करण्यात आलेल्या उत्पादनांसह भारतातील सर्वसमावेशक गतीशीलता गरजांची पूर्तता करणे. आम्ही सुरक्षितता, विश्वसनीयता आणि मूल्य देणारे टायर्स सादर करण्यासाठी दशकभराच्या उत्पादन वारसाचा फायदा घेत आहोत. बीकेटी - ग्रोईंग टूगेदर या तत्त्वामधून मार्गदर्शित आमचा ग्राहक, वितरक व डिलर्ससाठी विश्वासार्ह सहयोगी बनण्याचा मनसुबा आहे.''
*बीकेटीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार* म्हणाले, ''बीकेटीचा ऑन-हायवे टायर विभागातील प्रवेश जबाबदारीने विकास करणे आणि आमची गतीशीलता उपस्थिती वाढवणे या आमचा भारत-केंद्रित उपक्रम 'व्हिजन २०३०' अंतर्गत धोरणात्मक टप्पा आहे. आमच्या दृष्टिकोनामध्ये महत्त्वाकांक्षा व शिस्तबद्धता यांचे संतुलन आहे, *बीकेटीच्या व्यवसाय विकास व धोरणाचे वरिष्ठ अध्यक्ष व संचालक सतिश शर्मा* म्हणाले, ''आम्ही विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना दुचाकी, ट्रक बस रॅडियल, पॅसेंजर व लाइट ट्रक श्रेणींमध्ये टिकाऊपणा, मायलेज, आरामदायीपणा व प्रगत कार्यक्षमता देण्यावर अविरत लक्ष केंद्रित केले आहे, ज्याला सखोल ग्राहक माहिती आणि उत्पादन नेतृत्वाप्रती कटिबद्धतेचे पाठबळ आहे. आमचे उत्पादन नेतृत्व, वितरण क्षमता आणि ग्राहक विश्वासावरील शिस्तबद्ध, भारत-केंद्रित धोरणाच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ५ टक्के मार्केट शेअर संपादित करण्याचा मनसुबा आहे.''
Comments
Post a Comment