नेत्रहीन तरुण-तरुणींसाठी 'स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा'

नेत्रहीन तरुण-तरुणींसाठी  'स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा'


मुंबई / रमेश औताडे

गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील नेत्रहीन तरुण-तरुणींकडून स्वयंपाकाचे प्रशिक्षण मिळावे अशी मागणी होत होती. त्यांची ही मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. नुतन गुळगुळे फाउंडेशन आणि टीम व्हिजन या संस्था रोटरी क्लब ऑफ विरारच्या सहकार्याने स्वागत थोरात यांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अर्नाळा येथील 'स्वानंद सेवा सदन' प्रभात कॉलनी, अर्नाळा, विरार - पश्चिम, जिल्हा- पालघर येथे नेत्रहीनांसाठी "स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा" सुरू करत आहेत. अशी माहिती प्राध्यापक हेमंत सामंत यांनी दिली.

        अर्नाळ्यातील पहिली प्रशिक्षण कार्यशाळा दि.१४ व १५ फेब्रुवारी २०२६ अशी दोन‌ दिवसांची निवासी असेल. या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यशाळेत पोहे, उपमा, गोडाचा शिरा, साबुदाण्याची खिचडी, भेळ आणि सॅन्डविच असे सोपे न्याहारीचे (ब्रेकफास्ट) पदार्थ शिकवले जातील. त्याचबरोबर वरण-भातासाठी कुकर कसा लावावा हे ही शिकवले जाणार आहे. या कार्यशाळेत काही कार्यकर्त्यांनाही हे प्रशिक्षण कसे द्यावे याचे प्रशिक्षण ही स्वागत थोरात देणार आहेत.

        नेत्रहीनांचं रोजचं जगणं सोपं करणाऱ्या स्वयंसिद्धता व सहसंवेदना सजगता कार्यशाळांना मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाप्रमाणेच या स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळेलाही देशभरातील नेत्रहीनांकडून चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. पहिल्या कार्यशाळेतील सहभागींची नोंदणी पूर्ण झाली असून प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांची प्रतिक्षा यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

        स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळेबद्दलच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9372851841 किंवा 9819141906 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री