शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात साजरा होणार

    शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात साजरा होणार

मुंबई / रमेश औताडे

दक्षिण मध्य मुंबईतील सायन कोळीवाडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर कार्यक्रमात शिवप्रतिमेचे पूजन, अभिवादन, शिवचरित्रावरील व्याख्यान, तसेच युवक-युवतींसाठी प्रेरणादायी संदेश यांचा समावेश असणार आहे. शिवजन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून स्वराज्य, शौर्य, न्याय आणि संघटनशक्ती यांची प्रेरणा देणारा दिवस असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकल मराठा समाज, द. मध्य मुंबई (रजि.) चे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी सर्व शिवभक्त, समाजबांधव आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी जयंती साजरी करण्याची भावना आहे,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा