महाराष्ट्र करणी सेनेच्या मागणीला न्यायालयात यश
महाराष्ट्र करणी सेनेच्या मागणीला न्यायालयात यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे कौतुक
मुंबई / रमेश औताडे
मुस्लिम हे अल्पसंख्याक म्हणून धार्मिक आरक्षण घेत असताना त्यांना जातीचे पण आरक्षण कॉंग्रेस सरकारने घटनाबाह्य दिले होते. मुस्लिम धर्मात जाती व्यवस्था नसल्याने त्यांचे जातीचे आरक्षण रद्द करा अशी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी केली होती. त्याची दखल घेत मुस्लिमाचे जात आरक्षण भाजपा सरकारने रद्द केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या अतिशय योग्य अशा निर्णयाचे स्वागत सेंगर यांनी केले आहे.
हिंदूधर्म त्याग केल्यावर हिंदू धर्माचे जातीचे सदस्य होण्याचे ऑटोमॅटिक बंद होते. इस्लाम व इतर धर्मात ज्या हिंदूंनी प्रवेश केला त्यांचा हिंदूधर्माशी कसलाही संबंध राहत नाही त्यांना पुनच्छ हिंदू जातीचे आरक्षण देणे हे बेकायदेशीर आहे. अल्पसंख्यक धर्म म्हणून सवलतीचा लाभ घेतात मग का त्याना दुहेरी लाभ दयावा ? असा सवाल सेंगर यांनी केला आहे.
"महाराष्ट्र करणी सेना" यांनी मागील वर्षी मुस्लिम व ख्रिश्चन या धर्मात जातीय व्यवस्था नाही म्हणून यांना जातीचे आरक्षण देऊ नये अशी मागणी केली होती. मुस्लिम व ख्रिश्चन, बौद्ध, जैन हे सुद्धा अल्पसंख्यांक धर्म म्हणून ऑलरेडी आरक्षण घेत आहे म्हणून त्यांना त्यांनी सोडलेल्या हिंदू धर्माचे जातीचे आरक्षण घेणे घटनाबाह्य कृती आहे. या बाबत सेंगर यानी सर्वोच्च न्यायालययात सन २०२४ ला धाव घेतली होती.
संविधानाने फक्त हिंदू धर्मात जातीय व्यवस्था होती म्हणून ज्या जातींना अपृश्यता चा त्रास झाला यांचे मनोबल उंच करण्याकरिता संविधानाने आरक्षणाची तरतूद केली होती, देशाच्या मूळ संविधानामध्ये फक्त हिंदू आणि हिंदूंनाच जातीय आरक्षण दिलेले आहे. अपृश्यता हिंदू सोडून इतर कोणत्याही धर्मात नाही असे असताना काँग्रेस सरकारने मुस्लिमाचे व ख्रिश्चन (हिंदू धर्म सोडून इतर सर्व धर्मांना) लोकांचे मत प्राप्त करण्याकरिता त्यांना हिंदूंच्या जातीचे आरक्षण दिले.
हिंदू धर्म त्याग केल्यावर हिंदू धर्माचे जातीचे सदस्य होण्याचे ऑटोमॅटिक बंद होते. हिंदु जाती व्यवस्थाला कंटाळून अनेक लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केला मग त्यांनी नवीन धर्मात गेल्यावर आरक्षणाचा फायदा करिता पुनश्च हिन्दू धर्माच्या जातीचे आरक्षण घेण्याची कारण काय ?
मुस्लिम धर्मात शिया व सुन्नी हे दोन वर्ग कार्यरत आहे. कुरआन मध्ये जाती व्यवस्था नाही मग हिन्दू जातीचे त्याना आरक्षण देने बेकायदेशीर होय अशी माहीती सेंगर यांनी दिली.
Comments
Post a Comment