आर्टिस्ट्री आयोजित देणे समाजाचे उपक्रमांस रुग्ण मित्रांची सदिच्छा भेट
मुंबई / रमेश औताडे
आर्टिस्ट्री प्रस्तुत देणे समाजाचे महोत्सव मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे संपन्न झाला.वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्था़च्या कार्याची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून करुन देत या संस्थांना भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा मानस वीणा गोखले व त्यांचे सहकारी देणे समाजाचे या उपक्रमांतर्गत करीत असतात.रुग्ण मित्र विनोद साडविलकर, गणेश पवार यांनी *संस्था भेट चर्चा थेट* सामाजिक संस्था मार्गदर्शनपर पुस्तक वीणा गोखले यांना दिले.
गेली २१ वर्षे हा उपक्रम सुरू असून,३०० सामाजिक संस्था आणि २२ कोटी पेक्षा जास्त भरीव निधी संस्थांना मिळवून दिलेला आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत संस्था सहभागी झाल्या होत्या.त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र,वंचित मुलांचे संगोपन,मनोरुग्णांची सेवा,महिला सबलीकरण,ग्राम विकास,स्त्रियांच्या मासिक पाळी संदर्भात जागृती,फासेपारधी मुलांचे शिक्षण व पालनपोषण या सारख्या सामाजिक योगदान देणाऱ्या संस्थांना भेटी देण्यात आल्या.
आर्टिस्ट्री प्रस्तुत देणे समाजाचे स्वयंसेवकांचे उत्तम नियोजन व विविध सामाजिक संस्थांचा सहभागामुळे प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भविष्यातील कल्याणकारी सामाजिक उपक्रमांना रुग्ण मित्र परिवार तथा सहयोगी संस्थांतर्फे आदरपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment