आरोग्य विभागातील अन्यायाविरोधात आझाद मैदानात आंदोलन
मुंबई / रमेश औताडे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १६७५ कर्मचारी डी.एस इन्टरप्रायजेस या कंपनी मार्फत गेली दहा वर्षे झाले, डॉक्टर, नर्स, फार्मसी , लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अटेडन्ट ह्या पदावर कर्मचारी हे आरोग्य विभागात आपली सेवा बजावीत आहेत. मात्र त्यांच्या प्रलंबित मागण्या अद्याप सुटल्या नसल्याने त्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले.
दीपक चव्हाण, प्रतीक्षा भागवत, प्रवीण चव्हाण, गिरीश सुर्वे, रेश्मा कोचले, परेश मटकर, प्रणाली जठार, माया केदार, हिरामण बनगारे इतर महिला पुरुष यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,
वार्षिक वेतनवाढ मिळावी, भरपगारी प्रसुती रजा मिळावी, सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) मिळावा, कर्मचाऱ्यांना पी एफ मिळावा, कर्मचाऱ्यांना ई एस आय सी मिळावा, वार्षिक सुट्टया मिळाव्यात, ठेकेदारी पद्धत रद्द करुन शासकीय सेवेत समावेश करणे, स्पर्श प्रणाली च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा, बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ एक नवीन विधेयक सभागृहात मांडण्यात यावा, बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ एक समिती नेमण्यात यावी. या मागण्या गांभीर्याने सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली.
Comments
Post a Comment