कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई / रमेश औताडे 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे जिल्ह्यातील कळमोडी उपसा जलसिंचन योजनेचा फेर जलनियोजन प्रस्ताव महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचेकडे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने मान्यतेसाठी सादर केला आहे. जलसंपदा विभागाने कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांना लेखी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

 कळमोडी उपसा जलसिंचन योजनेमध्ये खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर, पुर, वाफगाव, वरूडे या गावातील १२५२ हेक्टर व पश्चिम भागातील कुडे बुद्रुक,एकलहरे येथील ३०५ हेक्टर असे एकुण १५५७ हेक्टर वाढीव क्षेत्र प्रस्तावित केले आहे. आठ महिने पिक रचनेनुसार फेर जलनियोजन करण्यात आले आहे. कळमोडी धरणाचे १.०७ टीएमसी पाणी चासकमान धरणासाठी व ०. ८७ टीएमसी पाणी उपसा योजनेसाठी राखीव आहे.

शासनाने  वाढीव गावांसह सुप्रमा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत परिगणके अंतिम करण्यात आली असून अंदाजपत्रक मान्यतेसाठी राज्य तांत्रिक  सल्लागार समिती -२ यांना सादर केल्याचे भामा आसखेड धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नि.सं.लगड यांनी सद्यस्थितीच्या प्रकल्प अहवालात नमुद केल्याचे सांगितले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता वाढीव गावांचा योजनेमध्ये समावेश होण्यासाठी आवश्यक आहे असे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश