आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष


मुंबई / रमेश औताडे 

गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे.

यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश