शिक्षा बचाओ संगठन चे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई / रमेश औताडे 

शिक्षण विभागातील कथित गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ‘शिक्षा बचाओ संघटने’चे अध्यक्ष डी. आर. सिंह यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

आदर्श भूतपूर्व सैनिक हिंदी हायस्कूलच्या मुख्याध्यापक मान्यता प्रकरणासह संस्था हस्तांतरण, बोगस जावक क्रमांक, शिक्षकांचे प्रलंबित वेतन, TET गैरप्रकार आणि २० टक्के अनुदानाच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा परिषद व नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे विशेष प्रशासकीय ऑडिट करावे तसेच सर्व प्रकरणांत जबाबदारी निश्चित करून ३० दिवसांत लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

आझाद मैदानावर आंदोलन करून आम्हाला आनंद होत नाही उलट आमचा वेळ जातो. सरकारने कोणत्याही घटकाला आंदोलन करण्यात भाग पाडू नये. ज्या राज्यांमध्ये ज्या देशांमध्ये आंदोलन होत असे तर ते सरकारचे अपयश आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करावा असे डी आर सिंह म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान