पर्यावरण संरक्षण देशाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक ---सरश्री अशोक एन. जे.
मुंबई / रमेश औताडे
पर्यावरण संरक्षण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून देशाच्या भविष्यासाठीची अत्यावश्यक गरज आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ महाअभियान’ अंतर्गत ठाण्यात ‘युवा अभिनंदन पर्यावरण प्रभात फेरी’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ठाणेकरांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालय, विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि बांदोडकर महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी या प्रभात फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा ठाम संदेश दिला.
उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकासाची जाणीव करून देणारे फलक हातात घेतले होते.
यावेळी सरश्री अशोक एन. जे. यांनी युवकांचे कौतुक करताना सांगितले की, "आजच्या युवकांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली, तरच येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भारत घडविता येईल." प्रभात फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील आकर्षक आणि आशयपूर्ण फलक हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
Comments
Post a Comment