मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे.
मुंबई / रमेश औताडे
मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाने २०२६-२७ या वर्षात ३,००० कोटी रुपयांच्या संभाव्य तुटवड्याचा जो इशारा दिला आहे, तो केवळ आकडा नाही तर याला जबाबदार मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या ठेकेदार धार्जिणा अट्टाहास. गेल्या आठ वर्षांत साचलेला एकूण ९,२८६ कोटींचा तोटा हा नैसर्गिक नसून, तो 'वेट लीज' खासगीकरण मॉडेलमुळे पद्धतशीरपणे खणलेला खड्डा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आपल्याच बससेवेला संपवण्याचा डाव आखतेय, ही ३१ लाख मुंबईकर प्रवाशांसाठी अत्यंत संतापजनक बाब आहे.
२०१८ मध्ये बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या ३,२०० बस ताफ्यात होत्या, आज ती संख्या २४९ वर कशी आली? ३१ लाख मुंबईकरांना रोज वेठीस धरणारे आणि नफेखोरी करणारे खासगी कंत्राटदार प्रशासनाचे इतके लाडके का? स्वतःच्या बस खरेदी करायला पालिकेकडे पैसे नाहीत, पण 'ब्युटीफिकेशन'च्या नावाखाली हजारो कोटींची उधळण करायला पैसे कुठून येतात? कंत्राटदारांच्या बस रोज रस्त्यात बंद पडतायत, अपघात होतायत, कर्मचाऱ्यांचे शोषण होतंय, पण प्रशासन मात्र डोळे झाकून बसलंय.
आमची स्पष्ट मागणी आहे की, हे अपयशी 'वेट लिज” मॉडेल बंद करा
Comments
Post a Comment