आठवण क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले संघर्ष नायकाची --


मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

मंत्रालय प्रतिनिधी रमेश औताडे 


क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त  त्यांच्या कार्यावर छोटासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.मातंग समाजात चिखली गांव, तालुका अमदपूर, जिल्हा - लातूर या खेडेगावांत ७ मे १९५३ साली बाबासाहेब गोपले यांचा जन्म माता समिंद्रा व पिता सिताराम गोपले यांच्या पोटी झाला. 

त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावाशेजारी केंद्रेवाडी येथे झाले. नंतर ते आंबेजोगाई येथे काही दिवस शिकले. नंतर परभणी येथे काही दिवस राहिले आणि कॉलेज अमदपूर येथे झाले. त्यानंतर ते मुंबईला आले व मुंबईत राहत असतांना समाजाचे दारिद पाहवेना असे झाले आणि बाबासाहेब गोपले यांनी अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली, लहुजी नगर, महुने, ता. कल्याण, जिल्हा- ठाणे येथे पहिली शाखा उघडली. १७ जानेवारी १९८२ साली तेथेच 'जगेन तर समाजासाठी व मरेन तर समाजासाठी' अशी घोर प्रतिज्ञा करून आपल्या संघर्षमय चळवळीला सुरुवात केली. मोर्चे, धरणे, आंदोलन चालू झालेत. २८ मार्च १९८३ साली हुतात्मा चौक, मुंबई येथे बाबासाहेब गोपले यांनी आमरण उपोषण चालू केले. 

२४ दिवासाचे उपोषण केल्यानंतर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला, आणि मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्याकडे मातंग समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागनी केली. शासनाने त्यांची मागनी मंजूर करून उपोषण सोडण्याची विनंती केली. उपोषन मागे घेतले, आणि महाराष्ट्राचा दौरा चालू केला. प्रत्येक खेडयातील वस्तीत गोपले साहेब फिरू लागले. अखिल भारतीय मातंग संघाची शाखा स्थापन करू लागले. महाराष्ट्रातील तालुका व जिल्हा पिंजुन काढला. आणि १२ ऑक्टोबर १९८४ साली, दिल्लीच्या गोल्फ क्लब मैदानावर संसदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील शिष्ठमंडळ बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना भेटले आणि आपल्या मागनीचे निवेदन सादर केले. त्यावेळी श्रीमती गांधी म्हणाल्या मातंग क्या बात है ! तेव्हा गोपले यांनी मातंग या शब्दाची व्याख्या सांगून हा समाज अत्यंत अविकसीत मागासलेला असल्याची त्यांच्या निदर्शनास आणून त्यावर श्रीमती गांधी यांनी गोपले यांचे कौतुक केले, 

त्यानंतर महाराष्ट्रात लो. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्याचे तत्कालीन महाराष्ट्रातील सरकारला पंतप्रधान श्रीमती गांधी यांनी निर्देश दिले. ११ जुलै १९८५ रोजी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना होवून या महामंडळाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले. या मडळाची स्थापना झाली तेव्हा मातंग समाजाने बाबासाहेब गोपले यांची मंत्रालय ते सी. एस. टी. स्टेशन पर्यत हत्तीवरून मिरवणूक काढली होती. १ सप्टेंबर २००६ ते २०१२ साला पर्यत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी बाबासाहेब गोपले यांनी यशस्वी पणे पार पाडली. व आपल्या कार्यकाळात मातंग समाजातील नागरिकांना अधिकाधीक नागरिकांना आर्थिक मदत मिळवून दिली. खेडोपाडयातील मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तहसिल कार्यालय, जिल्हा कार्यालय व विधान भवनावर वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चा काढू लागले. त्यामध्ये बेलन मोर्चा, मशाल मोर्चा, भिंगरी मोर्चा, नंदी बैल मोर्चा काढून समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. 

त्यामध्ये विशेष म्हणजे गाढवाचा मोर्चा फारच प्रसिध्द आहे. तो मोर्चा मराठवाडयातील परभणी जिल्हा कलेक्टर कार्यालयावर काढण्यात आला होता. त्या मोर्चामध्ये सहभागी होऊ नये, म्हणून गोपले साहेबांना जिल्हाबंदी करण्यात आली होती. ती तारिख २१ नोव्हेंबर १९८५ रोजी, त्या मोर्चामध्ये गोपले साहेब वेषांतर करून एक साधुबाबाचा वेश करून त्या मोर्चामध्ये सामिल झाले होते, म्हणून तेव्हापासून गोपले साहेबांचे नाव बाबासाहेब पडले. त्या अगोदर साहेबांना आप्पासाहेब  नावाने ओळखत होते, म्हणून परभणी जिल्ह्यांतील मोर्चा, ऐतिहासीक ठरला आहे. त्यानंतर लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे भागभांडवल वाढविण्यासाठी संघर्ष चालू ठेवला. त्यातच अण्णाभाऊ साठे यांच्या  नावाने शासकिय पुरस्कार देण्यात यावा, या मागनीने जोर धरला. १९९५ साली राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. पुरस्काराची मागनी मंजूर करण्यात आली. हा शासकिय पुरस्कार १९९७-१९९८ या अण्णाभाऊ साठे  शासकिय पुरस्कार बाबासाहेब गोपले व कुसुमताई गोपले यांना मुख्यमंत्री मनोहर जोशी व समाजकल्यान मंत्री  बबनराव घोलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते, मी त्या  सोहळयाचा साक्षीदार आहे. अण्णाभाऊ साठेंच्या नंतर शासनाच्या वतीने जर सन्मान झाला असेल तर तो  बाबासाहेब गोपले व कुसुमताई गोपले यांचा झाला. 

त्याचं कारण म्हणजे, त्याचे संघर्षाचे जिवन समाज  चळवळीत वावरत असतांना घर-दार, उन- वारा, पाऊस याची परवा न करता संघर्ष चालू ठेवला. व त्यांना एकुलता एक मुलगा होता, विलास उर्फ पापासाहेब गोपले यांचे अकस्मिक १२ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले. बाबासाहेब गोपले यांचा वारस व समाजाचे युवा नेतृत्व आपल्यातून गेल्याची कमतरता भासत राहिली आहे, परंतु गोपले साहेबांनी त्या दुख:तून सावरून समाजाचे काम चालू ठेवले. मातंग समाजाला वेगळे ८ टक्के आरक्षन मिळण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरले आणि आझाद मैदान, मुंबई येथे १० मार्च २००० पासून मातंग समाजाने आरक्षनासाठी आंदोलन चालू केले. 

१५३८ दिवस आंदोलनाला पूर्ण झाल्यावर शासनाने गोपले  साहेबांच्या आंदोलनाची दखल घेवून १ ऑगस्ट २००३ रोजी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केला, व त्या आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री बाबुराव भारस्कर व उपाध्यक्ष बाबासाहेब गोपले यांची निवड करण्यात आली. अध्यक्षाला राज्यमंत्री दर्जा देवून लाल दिव्याची गाडी देण्यात आली. मातंग  समाजातील बाबासाहेब गोपले व कुसमताई गोपले यांच्यासह कार्यकर्त्याच्या संघर्षातही शासनाच्या दोन लाल  दिव्यांच्या गाडया समाजाला मिळाल्या. एक म्हणजे अण्णाभाऊ साठे विकास मंडळास व दुसरी क्रांतीवीर लहुजी  साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची. खरंतर मातंग समाजाला हे वैभव बाबासाहेब गोपले यांच्या संघर्षमय त्यागातून प्राप्त झाले असे मला वाटते, 

कारण मी स्वत: परभणी येथील गाढवाच्या मोर्चापासून ते आजपर्यत चा सर्व धरणे आंदोलन, मोर्चामध्ये सहभागी आहे, मातंग समाजाला वेगळे ८ टक्के आरक्षन मिळविण्यासाठी ८  सप्टेंबर २०१२ रोजी महाराष्ट्रभर डोक्याचे केस कापून मुंडन केले. त्यामध्ये मुंबई मानखुर्द मधील अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी सुदाम आवाडें सह एकावन्न कार्यकर्त्यानी केस कापून सरकारचा निषेध केला.  असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रात झाले. परंतु आज महाराष्ट्रात  जे पिवळ वादळ दिसत आहे  त्यामागे क्रांतीसम्राट डॉ बाबासाहेब गोपले यांचा संघर्षामुळे दिसत आहेत. परंतु  आजच्या पुढाऱ्यांना  गोपले साहेबांचा विसर पडत आहे असे मला वाटते. जर मातंग समाजात चिखली गांव, तालुका अमदपूर, जिल्हा - लातूर या खेडेगावांत ७ मे १९५३ साली बाबासाहेब गोपले यांचा जन्म माता समिंद्रा व पिता सिताराम गोपले यांच्या पोटी "झाला नसता, तर मांग मातंग झाला नसता.  म्हणून बाबासाहेब गोपले यांच्या दहाव्या स्मृतीदिना निमित्त त्यांच्या संघर्षमय त्यागाला सलाम करतो, व  मानाचा मुजरा व समाज बांधवाना सप्रेम जय लहुजी ! 
दि. २१ ऑगस्ट २०१६ रोजी बाबासाहेब गोपले यांचे बॉम्बे हॉस्पिटल येथे निधन होवून आज त्या दिवसास दहा वर्ष होत आहे. बाबासाहेब गोपले यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ! असे सुदाम ग्यानबा आवाडे  यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश