केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या दहा वर्षांच्या मंत्रीपदपूर्तीनिमित्त बाळासाहेब मिरजे यांच्याकडून स्वागत

मुंबई / रमेश औताडे

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात आर पी आय महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या भेटीदरम्यान मिरजे यांनी आठवले यांना मंत्रीपदाच्या दहा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक, राजकीय तसेच विविध जनहिताच्या विषयांवरही चर्चा झाली.

रामदास आठवले यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीचा आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आठवले यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश