बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी शासनाचा क्यू आर कोड

       बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी शासनाचा क्यू आर कोड


मुंबई / रमेश औताडे  :  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी सरकारने आता प्रत्येक दवाखाना आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा परवाना, शिक्षण आणि नोंदणी क्रमांक असलेला क्यू आर कोड लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत, हीच प्रणाली इतरही क्षेत्रात लागू करावी, अशी मागणी दक्ष नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष रमेश औताडे यांनी केली आहे.

सध्या अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर, बोगस पत्रकार, बोगस वकील आणि बोगस पोलीस असल्याच्या भासवून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. सामान्य नागरिकाला समोरची व्यक्ती खरी आहे की बोगस हे ओळखणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने डॉक्टरांसाठी सुरू केलेली क्यू आर कोड प्रणाली अत्यंत स्तुत्य आहे. याच धर्तीवर पत्रकार, वकील, पोलीस कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी व इतर सार्वजनिक सेवांशी संबंधित वर्गासाठीही अधिकृत ओळखपत्रासह क्यू आर कोड प्रणाली लागू करावी, जेणेकरून नागरिकांना मोबाईलवर स्कॅन करून संबंधित व्यक्ती खरी आहे की बोगस हे तात्काळ समजेल, असे रमेश औताडे यांनी म्हटले आहे.

"पारदर्शकता आली तर भ्रष्टाचार आणि फसवणूक कमी होईल. डॉक्टरांप्रमाणेच पत्रकारिता, वकिली आणि पोलीस दलातही बोगसगिरी वाढली आहे. प्रत्येकाने आपल्या कार्यालयात, वाहनावर आणि ओळखपत्रावर शासनमान्य क्यू आर कोड लावला तर नागरिकांचा विश्वास वाढेल आणि खऱ्यांना न्याय मिळेल," असे मत दक्ष नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष रमेश औताडे यांनी व्यक्त केले.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्य विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभागाला देण्यात आले असून मुख्यमंत्री कार्यालय या प्रकरणी सकारात्मक असल्याचे रमेश औताडे यांनी सांगितले.
7021777291 रमेश औताडे 

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान