दृष्टी नसली तरी आनंदाची उंची गगनाएवढी

मुंबई, दि. ४ सप्टेंबर : भीमराव धुळप 

दहीकाला उत्सवाच्या पूर्वसंध्येला कमला मेहता अंध मुलींची शाळा, दादर पूर्व येथे शिवसेना माहीम विधानसभा आणि ‘धगधगती मुंबई’ परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार व विभागप्रमुख महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, भीमराव धुळप, मुख्याध्यापिका तन्वी म्हाडदळकर, सुरेश काळे, श्याम चित्रे, विशाल चाफे, प्रकाश नवल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मुलींना श्रीकृष्णाची ट्रॉफी, सहभागी प्रमाणपत्र आणि प्रत्येकी रोख पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच सर्व मुलींना खाऊ वाटप करण्यात आला. श्रीकृष्णाची ट्रॉफी डोक्यावर घेऊन मुलींनी आनंदाने नृत्य केले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांचे मन भरून आले.

“मुलींना दृष्टी नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला या छोट्याशा मदतीचे मोठे समाधान मिळाले,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान