जय लहुजी दहिहंडी महोत्सव ५ सप्टेंबरला

मुंबई / रमेश औताडे 

अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने जय लहुजी दहिहंडी महोत्सवाचे आयोजन शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी मानखुर्द साठे नगर येथे करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून मुख्य अतिथी म्हणून समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य असणार आहेत.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून डॉ. विनोद बाबर, अभिनेते जॉनी रावत, अभिनेत्री स्वाती माने आणि प्रबोधनकार सुनील साठे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यक्रमात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या एक हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक गांभीर्याने पाहावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

जय लहुजी दहिहंडी महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, समाजातील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान