शेतकऱ्याला न्याय ; भोगवटा बदलाचा आदेश रद्द


    सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक


मुंबई / रमेश औताडे :  मंत्रालय प्रतिनिधी  ,  पी आर न्यूज 

शासनाकडून चूक झाली तर कायदेशीर व सातत्य ठेऊन कागदोपत्री पाठपुरावा केला तर न्याय मिळतोच. असा अनुभव अहिल्यानगर जिल्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव खंडेराय वाडी येथील आदेश चाचण यांना आला आहे. या पाठपुराव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांचे शासकीय अधिकारी व शेतकरी वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आदेश चाचण यांनी दोन वर्षापुर्वी अशोकराव टाव्हरे यांची भेट घेऊन २४ एकर जमिनीबाबत सरकारी पातळीवर चुकीचे आदेश पारित झाल्याची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर टाव्हरे यांनी शासनाला पाठपुरावा करत निवेदने दिली असावमहसुल विभागाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना चौकशीचे आदेश देऊन स्वयंस्पष्ट अहवाल मागविले  होते. त्यानुसार शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना पत्र दिले. त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला. अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी १२ सप्टेंबर २०२१ रोजी या जमिनीचे भोगावटा एकमध्ये रूपांतरण करण्याचा आदेश दिला. 

मात्र त्यातील अटी व शर्थीचा भंग झाल्याचे पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिल्याने तसेच शासनाने गट क्रमांक २२७ मधील १७ एकर जमीनीचे वाटप संबधितांना केलेले असताना पुर्ण २४ एकरचा सात बारा संबंधितांचे नावावर झाला असल्याने नाशिक चे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पुनर्विलोकनासाठी परवानगी दिल्यानंतर शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन सदर जमिनीचे भोगावटा एक मध्ये रूपांतर करण्याचा आदेश रद्द केला. 

त्यानुसार संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी संबधित जमिनीचा सात - बारा पुन्हा भोगावटा क्रमांक २ करण्याची कार्यवाही केली असून  संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरूण उंडे यांनी तहसीलदार यांना १७ एकरचे वाटप असताना २४ एकरचा सात- बारा तयार केल्याबाबत दुरूस्तीसाठी पत्र दिले आहे.

आदेश चाचण यांचे पूर्वजांना गट क्रमांक २२७ मधील क्षेत्र शासनाने एक साल कबुलायतीने दिले होते. तद्नंतर १९६८ मध्ये त्यातील पाच एकर जमीन ठेवण्याबाबत तहसीलदार यांनी पत्र दिले.  परंतु सदर जमीन काढून घेण्याबाबत कोणतेही पत्र दिले नव्हते. त्यामुळे याबाबतही शासन न्याय देईल तसेच अशोकराव टाव्हरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे आदेश चाचण व भाऊसाहेब चाचण यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान