गुणवंत कामगारांना एसटी प्रवास व टोलमाफीची सवलत द्या

मुंबई  / रमेश औताडे 

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील गुणवंत कामगारांनी एकत्र येऊन “राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र” या संस्थेची नोंदणी केली आहे. सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाकडून “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार” मिळालेल्या कामगारांना अद्याप विशेष सुविधा मिळत नसल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

पुरस्कारप्राप्त गुणवंत कामगारांना एसटी बस प्रवासात विशेष सवलत तसेच टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने शासनाकडे केली आहे. इतर पुरस्कारार्थींना विविध सुविधा मिळतात, मात्र गुणवंत कामगारांना सुविधा न मिळणे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुरेश केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा सुरू असून, मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गुणवंत कामगारांना सन्मानासोबतच आवश्यक सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान