दिव्यांग शाळा अनुदानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच चा इशारा
मुंबई / रमेश औताडे
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
दिव्यांग शाळांच्या अनुदानासह दिव्यांग कल्याण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित पारदर्शक व गतिमान कार्यवाही होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाशी संबंधित चेतन गिरसे व मनीष पाटील यांच्या भूमिकेबाबत स्वतंत्र चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे.
दिव्यांग शाळांच्या अनुदानाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. अनुदानास पात्र शाळांची एकत्रित व अंतिम यादी निश्चित करून, आवश्यक शासनमान्यता घेऊन सर्व पात्र शाळांच्या अनुदानाचा एकत्रित निर्णय घेणे अपेक्षित असताना मंत्री अतुल सावे सकारात्मक असताना त्याच्या कार्यालयाशी संबंधित चेतन गिरासे व मनिष पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे यात पेच निर्माण होत असल्याचा आरोप डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे.
पात्र सर्व शाळांच्या अनुदानाचा एकत्रित निर्णय घेऊन अनुदान तातडीने वितरित करावे. तसेच सचिव माणिक गुरसाळ यांना या बाबतीत प्रत्यक्ष भेटून ८ सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे. उपसचिव विष्णुदास घोडके यांनाही निवेदन दिले आहे. पाठपुराव्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री तसेच मुख्यसचिव दिव्यांग मंत्रालय सचिव यांची भेट घेणार असल्याचे डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले.
Comments
Post a Comment