देशभरातील एकूण श्रीमंतापैकी सर्वाधिक श्रीमंत मुंबईत


मुंबई / रमेश औताडे

देशातील १ हजार ८१० श्रीमंत व्यक्तींपैकी मुंबईत ४६५ श्रीमंत आहेत. त्यानंतर नवी दिल्ली २३६ आणि बेंगळुरू १२९ असा क्रमांक आहे. एम ३ एम श्रीमंत भारतीय यादी प्रसिद्ध झाली असून या यादीतील व्यक्तींची एकूण संपत्ती तब्बल १८७.५ लाख कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गौतम अदानी ९.२३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वाधिक श्रीमंत ठरले आहेत. त्यानंतर मुकेश अंबानी  ८.६३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एल. एन. मित्तल ३.३९ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

या यादीत ३९१ डॉलर अब्जाधीश असून, गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या २७ ने वाढली आहे. विशेष म्हणजे, यादीतील सुमारे ७० टक्के श्रीमंतांनी स्वतःच्या कर्तृत्वावर व्यवसाय उभा केला आहे. महिलांची संख्याही वाढून १३१ झाली आहे. यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय क्षेत्रातील १९ श्रीमंत व्यक्तींचा प्रथमच यादीत समावेश झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान