वय नव्हे , नव्या सुरुवातीची तयारी महत्त्वाची : ‘ आरंभ ' चा संदेश

मुंबई  / रमेश औताडे 

आयुष्यात नव्याने सुरुवात करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हा प्रेरणादायी संदेश देत जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे कला, अध्यात्म आणि आत्मचिंतनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारी डॉ. नलिनी दीदी (दीदी माँ) यांनी रेखाटलेल्या श्रीकृष्णाच्या आकर्षक चित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले.

या चित्रांमधून श्रीकृष्णाच्या विविध भावविश्वाचे दर्शन घडत असतानाच, अंतर्मनातून आलेली दृष्टी आणि सकारात्मक विचार आयुष्यभर प्रेरणा देऊ शकतात, हा संदेशही अधोरेखित झाला.

याच सोहळ्यात ‘Echoes Of The Soul – Reflections For A Conscious Life’ या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. अधिक सजग, सकारात्मक आणि अर्थपूर्ण जीवनाची सुरुवात कोणत्याही क्षणी करता येते, या विचारांवर पुस्तक आधारित आहे.

‘आरंभ’—It’s Never Too Late In Life हा या कार्यक्रमाचा मध्यवर्ती विचार होता. आयुष्यात किती उशीर झाला यापेक्षा नव्याने सुरुवात करण्याची तयारी आहे का, हे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

कला, अध्यात्म आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून उपस्थितांना नव्या सुरुवातीची प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उपक्रमाने ‘पुन्हा सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर होत नाही’, ही सकारात्मक भावना अधोरेखित केली.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान