पर्यावरण रक्षक समिती चे अध्यक्ष किसान कदम यांचे आवाहन
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
विशेष प्रतिनिधी
अध्यक्ष किसन कदम यांची माहिती .......
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी तसेच समृद्ध नैसर्गिक वारसा देण्यासाठी पर्यावरण रक्षक समितीतर्फे राज्यभर व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
"एक वडाचे झाड लावा आणि ५०० वर्षांचे पुण्य कमवा" हा संदेश केवळ घोषवाक्य नसून भविष्यातील पर्यावरण संरक्षणाचा ठोस संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या वाढत्या काँक्रीटीकरणामुळे निसर्गाचे अस्तित्व धोक्यात आले असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे मोकळी जागा नाही त्यांनी वडाची काडी प्लास्टिकच्या कुंडीत किंवा पिशवीत लावून ती ४ ते ५ फूट उंच होईपर्यंत जपावी. त्यानंतर मंदिर परिसर, गावातील मोकळी जागा किंवा वनक्षेत्रात सुरक्षितपणे तिची लागवड करावी. अशा प्रकारे लावलेले झाड पुढील अनेक शतकांपर्यंत पर्यावरणाचे संरक्षण करू शकते.
लग्न, वाढदिवस, स्मृतिदिन किंवा इतर शुभप्रसंगी वृक्षारोपण करून निसर्गाला अमूल्य भेट द्यावी, असेही समितीने म्हटले आहे. प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्यास १० ते १५ वर्षांत परिसराचे स्वरूप बदलू शकते. यामुळे शुद्ध ऑक्सिजन, भूजल संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नैसर्गिक खतनिर्मितीला मोठी चालना मिळेल.
अध्यक्ष किसन कदम यांनी सांगितले की, ही केवळ वृक्षलागवडीची मोहीम नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी हरित आणि समृद्ध पृथ्वी निर्माण करण्याची लोकचळवळ आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
7021777291
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
Comments
Post a Comment