मुंबईत २२ जुलै रोजी अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा


मुंबई / रमेश औताडे 

अखिल भारतीय किसान सभा (AIKS) यांच्या वतीने विविध प्रलंबित शेतकरी प्रश्नांसाठी २२ जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जाणार आहे.

राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले,  राज्याध्यक्ष उमेश देशमुख, उपाध्यक्ष डाॅ. उदय नारकर, अजय बुरांडे, उद्धव पौळ, कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना, सुभाष चौधरी यांनी व इतर पदाधिकारी, शेतकरी यांनी वारंवार आंदोलने केली. मोर्चे काढले. बैठका घेतल्या.  शेवटी काय मिळाले ? सरकारला जाग का येत नाही ? असा सवाल शेतकरी करत आहेत.

मोर्चामध्ये देवस्थान इनाम जमिनी खालसा करणे, गायरान अतिक्रमणे नियमित करणे, पिकविमा तातडीने देणे आणि घराच्या तळाच्या जमिनी नावावर करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत.

किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा मोर्चा महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या मागण्यांबाबत राज्य सरकारची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मोर्चानंतर सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे शेतकरी संघटनांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश