आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन राय आणि भारत अनमोल पार्टीचे शिवप्रकाश तिवारी यांची मागणी

मुंबई / रमेश औताडे 

नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा झाली, किती नवीन बँक खाती उघडण्यात आली, संशयास्पद व्यवहारांवर काय कारवाई झाली आणि जुन्या नोटांची नेमकी कशी विल्हेवाट लावण्यात आली, याची सविस्तर माहिती केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन राय आणि भारत अनमोल पार्टीचे शिवप्रकाश तिवारी यांनी केली. 

या मागणीसाठी १५ ऑगस्टनंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नोटाबंदीनंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत अवघ्या पाच दिवसांत जुन्या ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटांद्वारे सुमारे ७४५.५८ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली होती. या व्यवहारांची अंतिम चौकशी, निष्कर्ष आणि त्यानंतर झालेल्या कारवाईचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

२०१६ ते २०२६ या कालावधीतील नोटांची वर्षनिहाय व मूल्यवर्गनिहाय छपाई, वितरण, परतावा आणि नष्ट केलेल्या नोटांचा संपूर्ण हिशेब भारतीय रिझर्व्ह बँक  आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर करावा. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात रोकड जमा झालेल्या खात्यांवरील तपासाची सद्यस्थितीही स्पष्ट करावी.
उपलब्ध आकडेवारीच्या आधारे कोणताही राजकीय नेता किंवा सरकार गैरव्यवहारात सहभागी असल्याचा थेट निष्कर्ष काढता येत नसला, तरी सर्व बाबींची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे मनोरंजन राय यांनी स्पष्ट केले. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १५ ऑगस्टनंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश