अनेक आघाड्यांवर इतिहास रचणारा भागवत एकादशी दिवशीचा अनोखा वारकरी महोत्सव ….

P R news  / रमेश औताडे 

आज मुंबई उपनगरात एक अभिनव उपक्रम घडला … 

हजारो मुंबईकरांना त्यांच्या ऑफिस मधे अविरतपणे आणि वेळेत घरगुती जेवण पोचवणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांसाठीचा … 

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत तर ह्या डबेवल्या बांधवांचा वैद्यकीय तपास आणि उपचार झालेच पण केवळ त्यावर न थांबता ह्या सर्व डबेवाल्यांचे पाद्यपूजन सुद्धा संपन्न झाले !!!

नागरिकांनी ह्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच शिवाय अनेक मान्यवरांनी सुद्धा अत्यंत तन्मयतेने डबेवाल्यांची पाद्यपूजा केली … बोरिवली विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय उपाध्याय , दहिसर विधानसभेच्या कर्तुत्ववान आमदार मनीषा चौधरी , डबेवाल्यांचे आमदार अशी अनोखी ओळख असलेले आमदार श्रीकांत भारतीय तसेच जेष्ठ नाट्यकलावंत श्री प्रदीप कबरे आणि सिनेनाट्य कलाकार श्री अरुण नलावडे हे देखील सहभागी झाले . उपक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागसंघचालक डॉ मकरंद शिंदे तसेच भाग कार्यवाह उदय आंबावकर यांची सुद्धा उपस्थिती लाभली . 

भागवत एकादशी निमित्ताने उपस्थित सर्वांना साबुदाणा खिचडी चा प्रसाद देण्यात आला . तसेच २५० डबेवाला बांधवांना पावसाळी मौसमासाठी रेनकोट वितरित करण्यात आले . सर्वात लक्षणीय ठरले ते हा सर्व उपक्रम घडत असताना मागे उपस्थितांना थेट पंढरपूर वरून होणाऱ्या विठ्ठल रखुमाई चे दर्शन !!!! 

नाना पालकर स्मृती समिती , श्री मोरेश्वर सेवा संघ आणि जीएसबी टेम्पल ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाद्यपूजनाचा हा उपक्रम हा मुंबई महानगराच्याच नव्हे तर डबेवाल्यांच्या १३५ वर्षांच्या इतिहासात सुद्धा पहिल्यांदाच घडला !!! 

डबेवाले बांधव आणि त्यांचे पाद्यपूजन करणारे लोक आत्मिक आनंदाने प्रसंगी सद्गतीत झालेले आज पहावयास मिळाले ! आज भागवत एकादशी दिवशी बोरीवलीत पंढरपूर अवतरले असेच म्हणावे लागेल!!

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश